शहरं
Join us  
Trending Stories
1
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
2
राहुल आणि सिद्धरामय्या यांचा कार्टून व्हिडिओ; काँग्रेसची जेपी नड्डांसह तीन BJP नेत्यांविरुद्ध तक्रार
3
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण
4
'राणेंचा प्रचार करायला लागतोय यातच राज ठाकरेंचा विजय'; काँग्रेस नेत्याची बोचरी टीका
5
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
6
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
7
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
8
धक्कादायक! कोविड सारख्या 'या' गंभीर आजारामुळे हजारो 'श्वान' मरणाच्या दारात!
9
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
10
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
11
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
12
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
13
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
14
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
15
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या
16
अभिनेते क्षितीज झारापकर यांचे निधन, ५४व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
17
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
18
करिअरच्या उच्च शिखरावर असताना सोडलं बॉलिवूड; लारा दत्ता म्हणाली, 'वाढत्या वयासोबत...'
19
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
20
'तेजस्वी सूर्या गुंडगिरी करतात, मासे खातात'; काँग्रेसवर टीका करताना कंगनाने भाजप नेत्याला केलं लक्ष!

CoronaVirus : NEET परीक्षा पुढे ढकलण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार, 13 सप्टेंबरला देशव्यापी परीक्षा होणार

By ऑनलाइन लोकमत | Published: September 09, 2020 3:32 PM

"क्षमस्व, आम्हाला ऐकायचे नाही," असं म्हणत सर्वोच्च न्यायालयानं याचिका फेटाळून लावल्या.

नवी दिल्लीः  नीट परीक्षा पुढे ढकलण्यास सर्वोच्च न्यायालयानं नकार दिला आहे. 13 सप्टेंबरला होणारी नीट परीक्षा पुढे ढकलण्यासाठी किंवा रद्द करण्याची विनंती करणार्‍या याचिकांवर सुनावणी करण्यास सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी नकार दिला. न्यायमूर्ती अशोक भूषण यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने म्हटले आहे की, वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी कोरोना या जागतिक महामारी (corona)च्या दरम्यान नीट परीक्षा घेण्यासाठी अधिकारी सर्व आवश्यक पावले उचलणार आहेत.  "क्षमस्व, आम्हाला ऐकायचे नाही," असं म्हणत सर्वोच्च न्यायालयानं याचिका फेटाळून लावल्या.नीट आणि जेईई परीक्षेच्या मार्गासह नीट आणि जेईईच्या परीक्षेस परवानगी देणा-या 17 ऑगस्टच्या आपल्या आदेशाचा पुनर्विचार करण्याच्या निर्णयासह सहा गैर-भाजपाशासित राज्यांच्या मंत्र्यांच्या याचिकेसह सर्व याचिका कोर्टाने चार सप्टेंबर रोजी फेटाळून लावल्या. देशभरातील अभियांत्रिकी प्रवेश परीक्षा जेईई मेन यशस्वीरित्या पूर्ण केल्यानंतर आता नीट परीक्षेची तयारी सुरू झाली आहे. नॅशनल टेस्टिंग एजन्सीने (एनटीए) परीक्षा आयोजित करण्यासाठी पूर्ण तयारी केली आहे. संपूर्ण देशात 13 सप्टेंबरला नीट परीक्षा घेण्यात येणार असून, यासाठी 15 लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे.एनटीए अधिका-याने सांगितले की, कोरोना साथीच्या आजारामुळे परीक्षा दोनदा रद्द झाल्यानंतर सप्टेंबरमध्ये या महत्त्वपूर्ण परीक्षा घेण्यात येत आहेत. ते म्हणाले की, 15.97 लाख विद्यार्थ्यांनी नीटसाठी नोंदणी केली आहे. जेईईची वैद्यकीय प्रवेश परीक्षा पेन आणि पेपरनं युक्त असेल. सामाजिक अंतर लक्षात घेऊन एनटीएने परीक्षा केंद्रांची संख्या 2,546 वरून 3,843केली आहे. त्याचबरोबर प्रत्येक वर्गातील विद्यार्थ्यांची संख्या 24 वरून 12 करण्यात आली आहे. परीक्षा केंद्रापासून प्रवेशद्वार आणि बाहेर जाण्यासाठी लागणा-या सामाजिक अंतरांची दक्षता घेण्याची व्यवस्था केली आहे. विद्यार्थ्यांसाठी मास्क, सॅनिटायझर व्यतिरिक्त सेफ्टी प्रोटोकॉलची काळजी घेण्यासाठी सल्लागार देखील नियुक्त केले आहेत.  

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याSupreme Courtसर्वोच्च न्यायालय