शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

तिहार जेल कर्मचाऱ्यांना दिलेल्या १२.५ कोटी लाचेची पूर्ण माहिती देण्याचे सुप्रीम कोर्टाचे आदेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 15, 2022 10:47 IST

सुकेश चंद्रशेखरला जेलमध्ये पैसे कोणी दिले, कोठून आले, कोणाला दिले?

डॉ. खुशालचंद बाहेती२०२१ पासून तिहार जेलमध्ये असणाऱ्या सुकेश चंद्रशेखर या फसवणुकीतील आरोपीस जेल अधिकाऱ्यांना दिलेले साडेबारा कोटींचा स्रोत व वाटपाची सविस्तर माहिती देण्याचे आदेश सुप्रीम कोर्टाने न्या. यू. यू. ललित, एस. रवींद्र भट व शुधांशु धुळीया यांनी दिले आहेत.

सुकेश चंद्रशेखर याने तिहार जेल अधिकाऱ्यांपासून धोका आहे म्हणून दुसऱ्या जेलमध्ये पाठवण्याची विनंती करणारी याचिका दाखल केली आहे. याचिकेच्या सुनावणीवेळी त्याने आतापर्यंत साडेबारा कोटी रुपयांची लाच जेल कर्मचाऱ्यांना दिली आहे; पण आता तो पैसे देऊ शकत नाही. त्यामुळे त्याला त्रास देण्यात येत आहे. त्याच्या जीवाला धोका आहे, असा दावा केला आहे. 

दिल्ली पोलीस व इडीने याची केस विरोध करताना सुकेश चंद्रशेखर जेलमधून खंडणीचे रॅकेट चालवत होता. दर महिन्याला जेल अधिकाऱ्यांना दीड कोटी लाच देत होता. या बदल्यात त्याला मोबाईल, स्वतंत्र बरॅक व खंडणी रॅकेटसाठी सुविधा मिळत होत्या. ८० जेल अधिकाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल आहे. अनेक निलंबित केले आहेत. १० अटक व अनेकांची बदली केली आहे. यामुळे मद्रास किंवा बेंगलोर येथील जेलमध्ये राहून आपला धंदा चालवण्याचा त्याचा विचार आहे, असे म्हणत याचिकेला विरोध केला.

सुप्रीम कोर्टाने सुकेश चंद्रशेखरला साडेबारा कोटी कोणी दिले, कोठून आले, कोणाला दिले, याची सविस्तर माहिती मागितली आहे. त्याच्या वकिलाने माहिती उघडपणे देता येणार नाही म्हणताच कोर्टाने ती द्यावीच लागेल, असे ठणकावले. तुम्ही सुरू केले आहे. याच्या मुळाशी गेल्याशिवाय राहणार नाही, असे म्हणत आता झाले ते पुन्हा होणार नाही, हे आम्ही पाहू, असे न्यायालयाने म्हटले आहे. न्यायालयाने यासाठी २६ जुलैपर्यंत वेळ दिला आहे. कोण आहे सुकेश चंद्रशेखर?

  • बेंगलोर येथे जन्मलेल्या ३२ वर्षीय सुकेशचे शिक्षण १२ वी पर्यंत आले आहे. स्वत:ला व्यावसायिक, राजकारणी व उद्योजक म्हणवतो. १५ फसवणुकीचे गुन्हे त्याच्यावर दाखल आहेत.
  • मद्रास कॅफेमधील नायिका लीना मारीया पावलो हिच्याशी लग्न केले. त्याच्याकडे मद्रास बीचवर बंगला व अनेक महागड्या कारचा ताफा आहे.
  • जॅकलीन फर्नांडिस, नोरा फतेहसह अनेकांची यापूर्वी इडीने सुकेशच्या प्रकरणांत चौकशी केली आहे.
टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालयBribe Caseलाच प्रकरण