शहरं
Join us  
Trending Stories
1
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
2
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
3
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
4
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
5
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
6
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
7
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
8
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
9
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
10
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
11
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
12
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
13
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
14
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
15
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
16
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
17
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
18
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
19
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
20
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
Daily Top 2Weekly Top 5

अ‍ॅम्बी व्हॅली आमच्या ताब्यात द्या, सुप्रीम कोर्टाचा आदेश; पत्र लिहिण्यावरून सहाराला खडसावले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 13, 2017 00:41 IST

गुंतवणूकदारांचे पैसे परत करण्यासाठी लिलाव पुकारण्यात आलेल्या सहारा उद्योग समूहाच्या पुणे जिल्ह्यातील अ‍ॅम्बी व्हॅलीचा ताबा ४८ तासांत मुंबई उच्च न्यायालयाच्या ‘आॅफिशियल लिक्विडेटर’कडे दिला जाईल

नवी दिल्ली : गुंतवणूकदारांचे पैसे परत करण्यासाठी लिलाव पुकारण्यात आलेल्या सहारा उद्योग समूहाच्या पुणे जिल्ह्यातील अ‍ॅम्बी व्हॅलीचा ताबा ४८ तासांत मुंबई उच्च न्यायालयाच्या ‘आॅफिशियल लिक्विडेटर’कडे दिला जाईल याची महाराष्ट्राच्या पोलीस महासंचालकांनी खात्री करावी, असा आदेश सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी दिला.सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार ‘आॅफिशियल लिक्विडेटर’ अ‍ॅम्बी व्हॅलीच्या लिलावाचे काम करीत आहेत. सरन्यायाधीश दीपक मिस्रा, न्या. रंजन गोगोई व न्या. ए. के. सिक्री यांच्या खंडपीठापुढे हे प्रकरण पुढील सुनावणीसाठी आले तेव्हा ‘सेबी’तर्फे ज्येष्ठ वकील अरविंद दातार यांनी असे निदर्शनास आणले की, सहारा समूहाने आधीच्या आदेशानुसार अ‍ॅम्बी व्हॅलीचा ताबा ‘आॅफिशियल लिक्विडेटर’कडे न देता पुणे ग्रामीणच्या पोलीस अधीक्षकांना पत्र लिहून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उपस्थित होण्याची शक्यता व्यक्त केली. त्यामुळे ताबा पोलिसांकडे देण्यात आला.याचा प्रतिवाद करताना सहाराचे ज्येष्ठ वकील मुकुल रोहतगी यांनी दावा केला की, अ‍ॅम्बी व्हॅलीचा ताबा पोलिसांकडे देण्यात आलेला नाही व कोर्टाचे मन कलुषित करण्यासाठी चुकीची माहिती हेतुपुरस्सर दिली जात आहे. लिलावाच्या कामात सहारा समूह अडथळे आणत असल्याने त्यांच्याविरुद्ध न्यायालयीन अवमानाची (कन्टेम्प्ट आॅफ कोर्ट) कारवाई करावी, असा अर्ज ‘सेबी’ने केला आहे. आम्ही आताच ‘कन्टेम्प्ट’ची कारवाई करत नाही. पण कोणीही लिलावाच्या कामात अडथळा आणला तर गय न करता त्याला तुरुंगात पाठविले जाईल, असे खंडपीठाने बजावले.न्या. ओकांकडे सूत्रे-‘आॅफिशियल लिक्विडेटर’ने कोणाचाही मुलाहिजा न ठेवता लिलावाचे काम ठरल्याप्रमाणे सुरू ठेवावे आणि गरज पडेल तेव्हा त्यासाठी उच्च न्यायालयाचे न्या. अभय ओक यांच्याकडून आदेश घ्यावेत, असेही सर्वोच्च न्यायालयाने सांगितले.

टॅग्स :aamby valleyअ‍ॅम्बी व्हॅलीSupreme Courtसर्वोच्च न्यायालय