शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

प्रसिद्धी मिळवण्यासाठी सुप्रीम कोर्टात आलात का? प्रशांत किशोर यांच्या याचिकेवर सरन्यायाधीशांनी फटकारले

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2026 15:16 IST

'तुमच्या पक्षाला लोकांनी नाकारले, म्हणून तुम्ही न्यायालयात आला आहात.'

नवी दिल्ली : बिहार विधानसभा निवडणुकीला आव्हान देणारी प्रशांत किशोर यांच्या जनसुराज पक्षाची याचिका सर्वोच्च न्यायालयाने ऐकण्यास नकार दिला. आज (6 फेब्रुवारी 2026) मुख्य न्यायाधीश सूर्यकांत आणि न्यायमूर्ती जॉयमाल्या बागची यांच्या खंडपीठाने स्पष्ट केले की, संपूर्ण निवडणूक प्रक्रियेलाच आव्हान देणाऱ्या याचिकेवर सुप्रीम कोर्ट सुनावणी करू शकत नाही.

मते मिळाली नाही म्हणून कोर्टात? CJI यांची कठोर टिप्पणी

सुनावणीदरम्यान सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी याचिकाकर्त्याला कठोर शब्दांत फटकारले. तुमच्या पक्षाला किती मते मिळाली? लोकांनी तुम्हाला नाकारले, म्हणून तुम्ही प्रसिद्धी मिळवण्यासाठी कोर्टात आलात का? अशी थेट विचारणा CJI यांनी केली. .

संपूर्ण निवडणूक रद्द करण्याची मागणी ग्राह्य नाही

लाईव्ह लॉच्या वृत्तानुसार, खंडपीठाने स्पष्ट केले की, याचिकेत संपूर्ण निवडणूक रद्द करण्यासाठी व्यापक आदेश मागितले आहेत. मात्र, निवडणूक प्रक्रियेत भ्रष्टाचाराचा आरोप असेल, तर प्रत्येक उमेदवाराविरोधात आणि प्रत्येक मतदारसंघासाठी स्वतंत्र याचिका दाखल करणे आवश्यक आहे. या प्रकारची याचिका दाखल करण्याचा योग्य मंच उच्च न्यायालय (High Court) असल्याचेही कोर्टाने नमूद केले.

मोफत योजनांवर याचिकाकर्त्याचा आक्षेप

जनसुराज पक्षाकडून वरिष्ठ वकील चंदर उदय सिंह यांनी युक्तिवाद केला की, आदर्श आचारसंहिता लागू असताना 25 ते 35 लाख महिलांच्या खात्यात प्रत्येकी 10 हजार रुपये ट्रान्सफर करण्यात आले होते. निवडणुकीच्या अगदी आधी मुख्यमंत्री महिला रोजगार योजनेची घोषणा करण्यात आली. या योजनांचा थेट निवडणूक प्रक्रियेवर परिणाम झाल्याचा दावा याचिकेत करण्यात आला होता.

स्कीम नव्हे, निवडणुकीलाच आव्हान दिले...

या युक्तिवादावर CJI सूर्यकांत यांनी स्पष्ट केले की, तुम्ही योजनेला नव्हे, तर संपूर्ण निवडणुकीलाच आव्हान दिले आहे आणि पुन्हा निवडणूक घेण्याची मागणी केली आहे. मोफत योजनांचा (Freebies) मुद्दा आम्ही आधीपासूनच गांभीर्याने पाहत आहोत. आम्हालाही यावर विचार करायचा आहे, पण निवडणूक हरलेल्या पक्षाच्या सांगण्यावरून नाही. सुप्रीम कोर्टाने याचिकाकर्त्याला स्पष्टपणे सांगितले की, हा संपूर्ण देशाचा मुद्दा नाही, यावर उच्च न्यायालयात अपील करता येईल, तेथे या बाबींचा विचार होऊ शकतो. 

English
हिंदी सारांश
Web Title : Supreme Court rebukes Prashant Kishor: Seeking publicity after election loss?

Web Summary : The Supreme Court dismissed Prashant Kishor's petition challenging the Bihar election. The Chief Justice questioned Kishor's motives, suggesting he sought publicity after voters rejected him. The court advised him to appeal to the High Court.
टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालयPrashant Kishoreप्रशांत किशोरBihar Assembly Election 2025बिहार विधानसभा निवडणूक २०२५