शहरं
Join us  
Trending Stories
1
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
2
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
3
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
4
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
5
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
6
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
7
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
8
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
9
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
10
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
11
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
12
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
13
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
14
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
15
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
16
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
17
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
18
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
19
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
20
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
Daily Top 2Weekly Top 5

मराठीसह २२ भाषांमध्ये उपलब्ध हाेणार सर्वाेच्च न्यायालयाचे निकाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 26, 2023 06:53 IST

प्रजासत्ताक दिनापासून विविध भारतीय अनुसूचित भाषांमध्ये सर्वोच्च न्यायालयाचे निकाल देण्यास प्रारंभ करणारी सेवा सुरू करण्याची घोषणा

नवी दिल्ली :

प्रजासत्ताक दिनापासून विविध भारतीय अनुसूचित भाषांमध्ये सर्वोच्च न्यायालयाचे निकाल देण्यास प्रारंभ करणारी सेवा सुरू करण्याची घोषणा सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड यांनी बुधवारी केली.

दिवसासाठी खंडपीठ एकत्र येताच, सरन्यायाधीशांनी वकिलांना सांगितले की, सर्वोच्च न्यायालय अनुसूचित भाषांमध्ये विनामूल्य उपलब्ध निकाल उपलब्ध करून देण्यासाठी गुरुवारपासून इलेक्ट्रॉनिक-सुप्रीम कोर्ट रिपोर्टस् (ई-एससीआर) प्रकल्प कार्यान्वित करील. त्यात सध्या जवळपास ३४ हजार निकाल उपलब्ध आहेत. शिवाय त्यात शोध सुविधाही (सर्च) आहे. आमच्याकडे आता प्रादेशिक भाषांमध्ये १,०९१ निवाडे आहेत जे प्रजासत्ताकदिनी उपलब्ध केले जातील.

अनुसूचित २२ भाषाआसामी, बंगाली, गुजराती, हिंदी, कन्नड, काश्मिरी, कोकणी, मल्याळम, मणिपुरी, मराठी, नेपाळी, उडिया, पंजाबी, संस्कृत, सिंधी, तमिळ, तेलगू, उर्दू, बोडो, संथाली, मैथिली आणि डोगरी, अशा २२ भाषा राज्यघटनेच्या आठव्या अनुसूचीमध्ये आहेत. 

मराठीत १४ निकाल‘आमच्याकडे ओरियामध्ये २१, मराठीमध्ये १४, आसामीमध्ये ४, कन्नडमध्ये १७, मल्याळममध्ये २९, नेपाळीमध्ये ३, पंजाबीमध्ये ४, तमिळमध्ये ५२, तेलगूमध्ये २८ आणि उर्दूमध्ये ३ निकाल उपलब्ध आहेत,’ असे सरन्यायाधीशांनी सांगितले.

वेबसाइटवर निकाल ई-एससीआर प्रकल्पाचा भाग म्हणून हे निकाल सर्वोच्च न्यायालयाच्या वेबसाइटवर, मोबाइल ॲपवर आणि नॅशनल ज्युडिशियल डेटा ग्रिडच्या (एनजेडीजी) जजमेंट पोर्टलवर उपलब्ध आहेत.

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालय