चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 7, 2025 19:13 IST2025-11-07T19:11:08+5:302025-11-07T19:13:39+5:30
क्रिकेटपटू मोहम्मद शमीची पत्नी हसीन जहाँ हिने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. तिने दरमहा १० लाख रुपये पोटगी मिळावी अशी मागणी केली. याबाबत न्यायालयाची नोटीस बजावण्यात आली आहे.

चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीची पत्नी हसीन जहाँने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. तिने स्वतःसाठी आणि तिच्या मुलीसाठी सध्याच्या ४ लाख रुपयांऐवजी १० लाख रुपये मासिक पोटगीची मागणी केली आहे. दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाने शमी आणि पश्चिम बंगाल सरकारला नोटीस बजावली आहे. हसीन जहाँ अनेक वर्षांपासून मोहम्मद शमीपासून वेगळी राहत आहे आणि त्यांची मुलगीही तिच्यासोबत राहते.
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
जहानने कोलकाता उच्च न्यायालयाच्या मागील निर्णयाला आव्हान दिले, यामध्ये तिला दरमहा १.५ लाख रुपये आणि तिच्या मुलीच्या काळजीसाठी २.५ लाख रुपये देण्याचे आदेश देण्यात आले होते. ही रक्कम अपुरी असल्याचा तिचा युक्तिवाद होता. ती रक्कम वाढवून १० लाख रुपये करावी अशी मागणी तिने केली. जहानची अपील न्यायमूर्ती मनोज मिश्रा आणि उज्जल भुयान यांच्या खंडपीठासमोर दाखल करण्यात आली. उच्च न्यायालयाने दिलेले ४ लाख रुपये तिच्यासाठी पुरेसे नाहीत का असा प्रश्न खंडपीठाने विचारला.
याचिकेत हसीन जहाँने शमीचे उत्पन्न लक्षात घेता ही रक्कम अपुरी असल्याचा युक्तिवाद केला आणि न्यायालयाला पोटगी वाढवण्याची विनंती केली. तिचा पती खूप पैसे कमवतो. प्रतिज्ञापत्रांच्या आधारे, त्याच्याकडे शेकडो कोटी रुपयांची मालमत्ता आहे, त्याच्याकडे आलिशान गाड्या आहेत, तो वारंवार परदेशात प्रवास करतो, असा युक्तिवाद जहाँच्या वकिलांनी न्यायालयात केला.
शमी आणि त्याची पत्नी हसीन जहाँ यांच्यात २०१८ पासून वाद सुरू आहेत. जहानने शमीवर घरगुती हिंसाचार आणि हुंड्यासाठी छळ असे अनेक आरोप केले आहेत.
दरम्यान, मोहम्मद शमीचा दक्षिण आफ्रिकेविरुद्ध नुकत्याच जाहीर झालेल्या टीम इंडियाच्या कसोटी संघात समावेश नाही. त्याने अलिकडेच बंगालसाठी तीन रणजी ट्रॉफी सामन्यांमध्ये चांगली कामगिरी केली, परंतु पुन्हा एकदा कसोटी संघात स्थान मिळवण्यात तो अपयशी ठरला.