शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

संजीव भट्ट यांना न्यायालयाचा मोठा झटका; 3 याचिका फेटाळल्या अ्न 3 लाखांचा दंड ठोठावला!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 3, 2023 14:17 IST

संजीव भट्ट यांनी भेदभावाचा आरोप करत सर्वोच्च न्यायालयात तीन नवीन याचिका दाखल केल्या होत्या. 

नवी दिल्ली : ड्रग्ज प्रकरणात माजी आयपीएस (भारतीय पोलीस सेवा) अधिकारी संजीव भट्ट यांना ड्रग्ज प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा मिळालेला नाही. सर्वोच्च न्यायालयाने ड्रग्ज जप्ती प्रकरणाबाबत संजीव भट्ट यांच्या तीन याचिकांवर प्रत्येकी एक लाख रुपये (एकूण तीन लाख) दंड ठोठावला आहे. संजीव भट्ट यांनी भेदभावाचा आरोप करत सर्वोच्च न्यायालयात तीन नवीन याचिका दाखल केल्या होत्या. 

सर्वोच्च न्यायालयाने तीन प्रकरणांसाठी प्रत्येकी एक लाख रुपयांचा दंड ठोठावत या याचिका फेटाळून लावल्या आहेत. तसेच, सर्वोच्च न्यायालयाने संजीव भट्ट यांना फटकारले. "तुम्ही सर्वोच्च न्यायालयात किती वेळा आला आहात? किमान एक डझन वेळा? गेल्या वेळी न्यायमूर्ती बी.आर. गवई यांनी तुमच्या याचिकेवर 10 हजार रुपयांचा दंड ठोठावला होता. तुमच्यासाठी विशेष आदेश काढावा अशी तुमची इच्छा आहे", असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले.

दरम्यान, प्रशासकीय आदेशांचे पालन केले जात नसल्याचा आरोप संजीव भट्ट यांच्या वकिलाने केला. गुजरात उच्च न्यायालयाच्या टिप्पणीवर आक्षेप घेत संजीव भट्ट यांच्या खटल्याला विलंब केला जात आहे, असे वकील म्हणाले. तसेच, संजीव भट्ट यांच्या वकिलाच्या विनंतीवरूनही सर्वोच्च न्यायालयाने दंड कमी करण्यास नकार दिला. सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे की, संजीव भट्ट यांनी गुजरात उच्च न्यायालय अॅडव्होकेट असोसिएशनच्या खात्यात 3 लाख रुपये दंड जमा करावा.

काय आहे संपूर्ण प्रकरण?हे प्रकरण 1996 मध्ये सुरू होते, जेव्हा राजस्थानमधील एका वकिलाला बनासकांठा पोलिसांनी राजस्थानमधील पालनपूर येथील त्याच्या हॉटेलच्या खोलीतून ड्रग्ज जप्त केल्यानंतर अटक केली होती. यावेळी संजीव भट्ट बनासकांठामध्ये पोलीस अधीक्षक होते. परंतु अटकेनंतर, राजस्थान पोलिसांनी आरोप केला की संजय भट्ट यांच्या टीमने मालमत्तेच्या वादात वकिलाला चुकीच्या पद्धतीने त्रास देण्यासाठी खोटा गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणी संजीव भट्ट यांना सप्टेंबर 2018 मध्ये अटक करण्यात आली होती आणि तेव्हापासून ते कोठडीत आहेत.

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालयPoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारी