शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

तिरुपती लाडू वादावर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी; याचिकाकर्त्यांने सीबीआय चौकशीची मागणी केली

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 30, 2024 08:02 IST

सुप्रीम कोर्टात आज तिरुपती मंदिरातील लाडू प्रकरणी सुनावणी होणार आहे. तिरुमला येथील लाडू प्रसादममध्ये प्राण्यांची चरबी, माशांचे तेल आणि इतर मांसाहारी पदार्थांचा वापर केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे, असं याचिकाकर्त्याने म्हटले आहे.

काही दिवसापूर्वी तिरुपती मंदिरातील लाडू बनवताना वापरल्या जाणाऱ्या तुपामध्ये प्राण्यांच्या चरबी वापरल्याचा आरोप करण्यात आला. दरम्यान, आता या प्रकरणी हस्तक्षेप करण्याच्या मागणी करणाऱ्या अनेक जनहित याचिकांवर सर्वोच्च न्यायालयात सोमवारी सुनावणी होणार आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या वेबसाइटवर प्रसिद्ध झालेल्या यादीनुसार, न्यायमूर्ती बीआर गवई आणि न्यायमूर्ती केव्ही विश्वनाथन यांच्या खंडपीठासमोर ३० सप्टेंबर रोजी या प्रकरणाची सुनावणी होणार आहे.

यूपीत ११ जिल्ह्यांना पुराचा वेढा; २० लोकांचा मृत्यू, बिहारच्या १३ जिल्ह्यांमध्ये पूरस्थिती

अधिवक्ता सत्यम सिंह यांनी दाखल केलेल्या याचिकेत, मंदिर चालवणाऱ्या तिरुमला तिरुपती देवस्थानम ट्रस्टच्या गुन्हेगारी कट आणि गैरव्यवस्थापनाची सर्वोच्च न्यायालयाच्या माजी न्यायमूर्तींच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करून न्यायालयीन चौकशीची किंवा सीबीआय चौकशीची मागणी करण्यात आली आहे.

याचिकेत म्हटले आहे की, तिरुमला येथील लाडू प्रसादममध्ये प्राण्यांची चरबी, माशांचे तेल आणि इतर मांसाहारी घटकांचा वापर केल्याचे तपासात समोर आले आहे.

हे कृत्य हिंदू धार्मिक प्रथांचे उल्लंघन तर आहेच, शिवाय असंख्य भाविकांच्या भावनाही दुखावल्या आहेत, असंही याचिकेत म्हटले आहे. तिरुमला तिरुपती बालाजी मंदिरातील प्रसादात प्राण्यांच्या चरबीची भेसळ करणे हे धर्मस्वातंत्र्याच्या अधिकाराची हमी देणाऱ्या घटनेच्या कलम २५ चे  उल्लंघन आहे. या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी यापूर्वीच एसआयटी स्थापन केली आहे.

दुसरीकडे, आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री वायएस जगन मोहन रेड्डी यांनी मुख्यमंत्री एन चंद्राबाबू नायडू यांच्या दाव्यांवर पुन्हा प्रश्नचिन्ह उपस्थित केले, यात त्यांनी म्हटले होते की, वायएसआरसीपी सत्तेत असताना तिरुपती लाडू बनवण्यासाठी भेसळयुक्त तूप वापरण्यात आले होते. रविवारी, वायएसआरसीपी प्रमुख म्हणाले की, चंद्राबाबू नायडू यांच्या सरकारने नियुक्त केलेल्या टीटीडी कार्यकारी अधिकाऱ्याची विधाने फक्त मुख्यमंत्र्यांच्या दाव्यांचे खंडन करतात.

जगन मोहन यांनी मुख्यमंत्र्यांना ट्विटरवरील पोस्टमध्ये विचारले, "याचा अर्थ काय? हा पुरावा पुरेसा नाही का? सत्यमेव जयते."

जगन मोहन रेड्डी यांनी टीटीडी ईओ राव यांच्या २३ जुलैच्या विधानाचा हवाला दिला. राव म्हणाले होते की, टीटीडीला वनस्पतीमध्ये भेसळ असलेले तूप सापडले आणि दोन टँकर परत करण्यात आले. १८ सप्टेंबर रोजी सीएम नायडू यांनी लाडू बनवताना तुपाऐवजी प्राण्यांच्या चरबीचा वापर केल्याचा आरोप केला होता.

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालयtirupati balaji mandirतिरुपती बालाजी मंदिर, राजूरघाट