शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Porsche Accident News : 'बाळा'च्या रक्ताचे नमुने कचऱ्यात फेकले; दुसऱ्याचे लॅबला पाठवले, डॉक्टरांचे बिंग फुटले
2
Maharashtra SSC 10th Result 2024 : दहावीचा निकाल ९५.८१ टक्के; 'कोकण-कन्या' अव्वल, १८७ विद्यार्थ्यांना 'शत-प्रतिशत'
3
शरद पवारांचे २ युवा शिलेदार अजित पवारांकडे; 'तुतारी' खाली ठेवत हाती 'घड्याळ' बांधणार
4
उत्तर प्रदेश, बिहार आणि महाराष्ट्रात भाजपचे कुठे आणि किती नुकसान? प्रशांत किशोर यांचा मोठा दावा
5
Pune Porsche Accident News इतर लॅबमध्ये डीएनए टेस्टिंग केल्यावर रक्ताचे सॅम्पल बदलल्याचे समोर; पोलीस आयुक्तांची माहिती
6
"स्वाती मालीवाल जबरदस्तीने मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानात घुसल्या", विभव कुमारांच्या वकिलाचा न्यायालयात युक्तिवाद! 
7
दिवाळीपूर्वीच विधानसभा निवडणूक, राजकीय पक्षांकडून तयारी सुरू; अजित पवार, बावनकुळेंच्या हालचाली
8
"भाजपा १५० च्या वर जाणार नाही", माजी केंद्रीय मंत्र्यांचा मोठा दावा
9
IPL संपताच जय शाह यांची मोठी घोषणा; Ground Staff कर्मचाऱ्यांना मिळाले मोठे बक्षीस
10
जादू की झप्पी! जवळच्या व्यक्तीला मिठी मारा अन् 'या' आरोग्यविषयक तक्रारींपासून राहा दूर
11
Pune Porsche Accident News रक्ताचे नमुने बदलण्यासाठी डॉ. श्रीहरी हलनोरने घेतले ३ लाख; पुणे पोलिसांची माहिती
12
गौतम गंभीर तर आहेच... पण, कोलकाता नाईट रायडर्सच्या चॅम्पियन बनण्याच्या प्रवासातील हेही शिलेदार
13
Fact Check: PM मोदींनी रॅलीत ‘अपशब्द’ वापरले नाहीत; व्हायरल व्हिडिओ फेक, जाणून घ्या सत्य
14
अश्विनी कासारला लोकलमध्ये महिलेने मारली लाथ, पोलिसांना टॅग करत शेअर केला व्हिडिओ
15
गेल्या महिन्यापासून देशात विरोधकांची हवा; जोरदार टक्कर दिल्याची अमित शाह यांची कबुली
16
Mukesh Ambani News : मुकेश अंबानींची 'या' देशातील टेलिकॉम इंडस्ट्रीवर नजर, पाहा काय आहे प्लान?
17
“पुतिन अन् शेख हसीना यांनी केले तेच आता मोदी करु पाहात आहेत”; अरविंद केजरीवाल यांची टीका
18
देख रहा है बिनोद...!अवघ्या काही तासात रिलीज होणार 'पंचायत 3', जाणून घ्या नेमकी वेळ
19
Pune Porsche Accident News पुणे पोलिसांची मोठी कारवाई! ससूनच्या डॉक्टरांनी बिल्डर 'बाळा'चे रक्ताचे नमुने बदलले; दोघांना अटक
20
Uma Bharti : "मोदी 400 नाही, तर 500 पार करतील..."; भाजपाच्या जागांवर उमा भारती यांचा मोठा दावा

31 आठवड्यांच्या गर्भवतीला सर्वोच्च न्यायालयानं गर्भपाताची दिली परवानगी

By ऑनलाइन लोकमत | Published: September 06, 2017 3:39 PM

सर्वोच्च न्यायालयानं बुधवारी 13 वर्षांच्या एका 31 आठवड्यांच्या गर्भवतीला गर्भपातासाठी परवानगी दिली आहे.

नवी दिल्ली, दि. 6 - सर्वोच्च न्यायालयानं बुधवारी 13 वर्षांच्या एका 31 आठवड्यांच्या गर्भवतीला गर्भपातासाठी परवानगी दिली आहे. तत्पूर्वी सर्वोच्च न्यायालयानं या अल्पवयीन मुलीच्या आरोग्याची वैद्यकीय चाचणी घेण्यासाठी एक मेडिकल बोर्डही स्थापन केलं आहे. न्यायमूर्ती एस. ए. बोबडे आणि न्यायमूर्ती एल. नागेश्वर राव यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. सुनावणीदरम्यान त्यांनी त्या अल्पवयीन मुलीला गर्भपाताची परवानगी दिली. तसेच या मुलीच्या प्रकृतीच्या चौकशीसाठी मुंबईस्थित सर जे. जे. ग्रुप ऑफ मेडिकल बोर्डाची स्थापना केली आहे. हा बोर्ड मुलीची वैद्यकीय चाचणी करून गर्भपातासाठी सहमती देणार आहे. न्यायमूर्ती बोबडे आणि न्यायमूर्ती नागेश्वर यांच्या खंडपीठानं या प्रकरणात सुनावणी स्थगित केली. मेडिकल बोर्डाच्या सल्ल्यानंतर मुलीला गर्भपात करता येणार आहे. दुसरीकडे 20 आठवड्यानंतर महिलेला गर्भपात करण्यासाठी प्रतिबंध आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी सर्वोच्च न्यायालयानं 28 जुलै रोजी एका 10 वर्षांच्या गर्भवती अल्पवयीन मुलीला 31 आठवड्यांचा गर्भ पाडण्यासाठी नकार दिला होता. र्भपातसंबंधित प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने एक मोठा निर्णय दिला आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी न्यायालयाने 26 आठवड्यांच्या गर्भवती महिलेला गर्भपाताची परवानगी दिली होती. ही महिला पश्चिम बंगालची राहणारी असून तिच्या गर्भातील बाळाला ह्रदयाचा गंभीर आजार झाला होता. महिला आणि तिच्या पतीने यामुळेच गर्भपाताची मागणी केली होती. हा आजार आईच्या आरोग्यासाठीही घातक असल्याचं त्यांनी सांगितलं होतं. न्यायालयाने महिलेची तपासणी करण्यासाठी सात डॉक्टरांचं एक पथक गठीत केलं होतं. या डॉक्टरांच्या पथकाने दिलेल्या रिपोर्टच्या आधारेच न्यायालयाने गर्भपाताची परवानगी दिली होती.  डॉक्टरांनी न्यायालयात सादर केलेल्या आपल्या रिपोर्टमध्ये सांगण्यात आलं होतं की, "गर्भात वाढत असलेल्या बाळाचा जन्म होऊ न देणे आई आणि बाळासाठी योग्य आहे. गर्भपात करणं गरजेचं असून तसं न केल्यास आईला मानसिक धक्का बसू शकतो. तसंच जर बाळाचा जन्म झाला तर ह्रदयाच्या आजारामुळे त्याची अनेकदा सर्जरी करावी लागेल". या रिपोर्टच्या आधारेच न्यायाधीश दीपक मिश्रा आणि ए. एम. खानविलकर यांच्या खंडपीठाने गर्भपाताचा निर्णय दिला होता. याप्रकरणी सुनावणी करताना सर्वोच्च न्यायालयाने गेल्या आठवड्यात केंद्र सरकारला नोटीस पाठवत त्यांचं मत मागितलं होतं. कोलकाताच्या या महिलेने एमपीटी अॅक्ट 1971 मधील सेक्शन 3 ला आव्हान दिलं होतं. कायद्यानुसार 20 आठवड्यांहून जास्त काळ लोटला असताना गर्भपात केल्यास बेकायदेशीर समजलं जातं. महिलेने न्यायालयात सांगितलं होतं की, 25 मे रोजी जेव्हा आपल्या बाळाला गंभीर आजार असल्याची माहिती मिळाली, तेव्हा 20 आठवडे उलटून गेले होते. त्याच्या एक आठवड्यानंतर आपल्याला या आजाराबद्दल कळलं. गर्भपात करण्यासाठी महिलेच्या वकिलाने प्रसिद्ध हार्ट सर्जन डॉ देवी शेट्टी यांचं प्रमाणपत्र सादर केलं होतं.