शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
3
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
4
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
5
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
6
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
7
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
8
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
9
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
10
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
11
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
12
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
13
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
14
पोलिसाच्या घरातच चोरी; सोन्याचे मंगळसूत्र, २ मोबाईलसह मौल्यवान वस्तू घेऊन चोर फरार!
15
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार
16
सोन्याच्या दरात मोठी घसरण; १० ग्रॅम सोन्यासाठी किती करावा लागणार खर्च, जाणून घ्या
17
पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
18
"पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी नव्हेत तर स्वातंत्र्यसैनिक’’, पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांचं विधान 
19
Pahalgam Terror Attack : पहलगाममधील भाजपा कार्यकर्त्यासाठी नजाकत बनला 'देवदूत'; पत्नीचा, लेकीचा वाचवला जीव
20
चीननं उचललं मोठं पाऊल, भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर्स क्रॅश; विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग

आरक्षण मर्यादा वाढविण्यासाठी राज्यांचा पाठिंबा; सुप्रीम कोर्टात ३ राज्य एकवटली

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2021 04:22 IST

मराठा आरक्षण : सुप्रीम कोर्टात तमिळनाडू, कर्नाटक, उत्तर प्रदेशची भूमिका

नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयात बुधवारी तामिळनाडू, कर्नाटक, उत्तर प्रदेश व इतर राज्यांनी आरक्षणाबाबत बाजू मांडली आणि सर्व राज्यांनी ५० टक्के आरक्षणाची मर्यादा वाढवणे योग्य आहे, असा युक्तिवाद केला. याचाच अर्थ महाराष्ट्रामधील मराठा आरक्षणाला या सर्व राज्यांनी समर्थन दिले, असा काढला जात आहे. मराठा आरक्षणाच्या वतीने काही लोकांनी युक्तिवाद केला व गुरुवारी पुन्हा एकदा सुनावणी ठेवण्यात येणार आहे.

महाराष्ट्र सरकारचा मराठा आरक्षणाचा कायदा संवैधानिक असल्याचे केंद्र सरकारने मंगळवारी स्पष्ट केले होते. केंद्र सरकारच्या वतीने सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी सुप्रीम कोर्टात बाजू मांडली. १०२ व्या घटना दुरुस्तीच्या मुद्यावर हा कायदा संवैधानिक असल्याचं केंद्र सरकारने म्हटले. याआधी ॲटर्नी जनरल के.के. वेणूगोपाल यांनी कायदेतज्ञ म्हणून आपले मत व्यक्त केले होते. 

१०२ व्या घटना दुरुस्तीनुसार राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाची स्थापना झाली. मात्र, या त्यानंतरही राज्यांना आरक्षणासंदर्भातील अधिकार कायम असल्याचे एक प्रकारे केंद्र सरकारने म्हटले. ५० टक्के आरक्षण मर्यादेच्या मुद्यावर महाराष्ट्राला अनेक राज्यांनी पाठिंबा दिला. बिहार, झारखंड, कर्नाटक पंजाब, राजस्थान, तमिळनाडू, आंध्र प्रदेश या राज्यांनी कोर्टात अधिकृत भूमिका मांडताना ५० टक्क्यांवर आरक्षणाचे समर्थन केले.

तो निकाल एकमताचा नव्हतातमिळनाडू, छत्तीसगढ, कर्नाटकची बाजू मांडताना ज्येष्ठ विधिज्ञ मुकुल रोहतगी म्हणाले की, आरक्षण ५० टक्क्यांहून अधिक असू नये, हा इंद्रा सहानी प्रकरणात न्यायालयाचा निकाल एकमताचा नव्हता. 

आरक्षणाचे प्रमाण किती व कसे असावे, यावरून न्यायाधीशांमध्ये भिन्न मते होती. त्यामुळे ५० टक्क्यांचा आग्रह धरता येणार नाही किंवा तेवढ्याच मर्यादेचे समर्थनही करता येणार नाही. घटनेतील कलम ३७१ (जे) चा संदर्भ हैदराबाद-कर्नाटकपुरता आहे. आणि ते नंतरही आलेले आहे. सिक्कीमसाठीही वेगळी तरतूद आहे. भारत देशात सर्व गोष्टी एकसंघ आहेत.

वेगळा विचार करण्याची गरजकेरळची बाजू मांडताना विधिज्ञ जयदीप गुप्ता म्हणाले की, ५० टक्क्यांची मर्यादा वाढविण्यावर आता विचार व्हावा. कारण इंद्रा सहानी प्रकरणावेळी केवळ ऐतिहासिकदृष्ट्या मागास समोर ठेवण्यात आले होते. आर्थिकदृष्ट्या मागास वर्ग (ईडब्ल्यू  एस) समोर नव्हता. त्याचा वेगळा विचार करण्याची गरज निर्माण झाली आहे. ईडब्ल्यू  एस म्हणजे ५० टक्क्यांचा भाग समजला जाऊ नये.

 

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालयMaratha Reservationमराठा आरक्षण