Cyclone Amphan : पश्चिम बंगालमध्ये 'अम्फान'चे थैमान! अनेकांचा मृत्यू, कोट्यवधीचं नुकसान

By ऑनलाइन लोकमत | Published: May 21, 2020 08:19 AM2020-05-21T08:19:18+5:302020-05-21T08:23:35+5:30

Cyclone Amphan : अम्फानचे संकट पाहता, हवामान खात्याने ओडिशा आणि आसामसाठी हाय अलर्ट जारी केला आहे. तर पश्चिम बंगाल, तामिलनाडू, आंध्र प्रदेश, पुदुच्चेरी, त्रिपुरा, मिजोरम, मणिपुर आणि जम्मू काश्मीरसाठी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे.

super cyclone amphan hits west bengal many killed SSS | Cyclone Amphan : पश्चिम बंगालमध्ये 'अम्फान'चे थैमान! अनेकांचा मृत्यू, कोट्यवधीचं नुकसान

Cyclone Amphan : पश्चिम बंगालमध्ये 'अम्फान'चे थैमान! अनेकांचा मृत्यू, कोट्यवधीचं नुकसान

Next

कोलकाता - देशावर कोरोना महामारीचे संकट घोंगावत असतानाच 'अम्फान' या चक्रीवादळामुळे लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पश्चिम बंगालमध्ये 'अम्फान'ने थैमान घातले असून अनेकांचा मृत्यू झाला आहे. तसेच कोट्यवधीचे नुकसान देखील झाले आहे. अम्फानचे संकट पाहता, हवामान खात्याने ओडिशा आणि आसामसाठी हाय अलर्ट जारी केला आहे. तर पश्चिम बंगाल, तामिलनाडू, आंध्र प्रदेश, पुदुच्चेरी, त्रिपुरा, मिजोरम, मणिपुर आणि जम्मू काश्मीरसाठी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. अम्फान वादळात 10 ते 12 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे.

बंगालच्या उपसागरात निर्माण झालेलं 'अम्फान सुपर सायक्लोन' हे चक्रीवादळ बुधवारी अखेर पश्चिम बंगालच्या किनाऱ्याला धडकलं आहे. या चक्रीवादळामुळे किनाऱ्यालगत असणारे अनेक घरं जमीनदोस्त झाले आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी याच पार्श्वभूमीवर अम्फान चक्रीवादळाचा धोका असणाऱ्या परिसरातील लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवलं आहे. पश्चिम बंगालमधील दिघा आणि बांगलादेशातील हतिया बेटावर दुपारी अडीच वाजता थडकल्यानंतर चक्रीवादळ अधिक विक्राळ होत घरे भुईसापट करीत आणि झाडे, विजेचे खांब उखडत पश्चिम बंगालच्या किनारपट्टीच्या दिशेने अग्रेसर झाले. 

अम्फान चक्रीवादळाची स्थिती आणि दिशेचा अंदाज लागल्याने चक्रीवादळ थडकण्याआधीच पश्चिम बंगाल आणि ओडिशातील किनारपट्टीलगतच्या 6 लाख 58 हजार लोकांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले. हावडा आणि उत्तर 24 परगणा जिल्ह्यातील मीनाखान भागात झाडे कोसळून दोन महिलांचा मृत्यू झाला. ओडिशातील पुरी, जगतसिंहपूर, कटक, केंद्रपाडा, जाजपूर, गंजम, भद्रक आणि बालासोर जिल्ह्यांतील अनेक भागाला जोरदार पावसाने झोडपले.

राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाचे (एनडीआरएफ) महासंचालक एस. एन. प्रधान यांनी दिल्लीत पत्रकार परिषदेत दिलेल्या माहितीनुसार, चक्रीवादळाच्या वेगाने बदलत असलेल्या स्थितीवर आम्ही बारकाईने लक्ष ठेवून आहोत. मदत व बचाव कार्यासाठी ओडिशा आणि पश्चिम बंगालमध्ये एनडीआरएफची 40 पथके तैनात करण्यात आली आहेत. कोविड-19 चा धोका ध्यानात घेऊनच एनडीआरएफला आत दुहेरी संकटाचा मुकाबला करायचा आहे.

महत्त्वाच्या बातम्या

CoronaVirus News : कोरोनाग्रस्ताच्या मृतदेहात किती वेळ जिवंत राहतो व्हायरस?; ICMR ने दिलं उत्तर

CoronaVirus News : ...म्हणून मजुरांना आपल्या राज्यापेक्षा केरळ वाटतंय जास्त सुरक्षित

CoronaVirus News : धोका वाढला! 4 दिवसांत 400 नवे रुग्ण; 'या' राज्यात येणारी चौथी व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह

बाप रे बाप! 8 दिवसांत घरातून निघाली सापाची तब्बल 123 पिल्ले; लोकांचा उडाला थरकाप

कौतुकास्पद! डॉ. हर्षवर्धन यांचा देशाला अभिमान; जागतिक आरोग्य संघटनेत मिळालं मानाचं स्थान

CoronaVirus News : काय सांगता? संगीत ऐकून कोरोनाग्रस्त बरे होणार; 'ही' थेरेपी फायदेशीर ठरणार

Web Title: super cyclone amphan hits west bengal many killed SSS

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.