Sunny Leone : सनी लिओनीला 'नो एन्ट्री'! मथुरेत नवं वर्षाच्या कार्यक्रमावरुन साधू-संत आक्रमक; आंदोलनाचा इशारा
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2025 11:20 IST2025-12-30T11:19:43+5:302025-12-30T11:20:05+5:30
Sunny Leone : नवीन वर्षाच्या निमित्ताने मथुरेत आयोजित सनी लिओनीच्या कार्यक्रमाला कडाडून विरोध केला आहे.

Sunny Leone : सनी लिओनीला 'नो एन्ट्री'! मथुरेत नवं वर्षाच्या कार्यक्रमावरुन साधू-संत आक्रमक; आंदोलनाचा इशारा
नवीन वर्षाच्या स्वागतासाठी उत्तर प्रदेशात ठिकठिकाणी विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. मात्र मथुरेतील अशाच एका कार्यक्रमानंतर वातावरण चांगलंच तापलं आहे. येथील साधू-संतांनी या कार्यक्रमावर तीव्र नाराजी व्यक्त केली असून तो रद्द करण्याची जोरदार मागणी केली आहे. या संदर्भात त्यांनी प्रशासनाला पत्र लिहून आंदोलनाचा इशाराही दिला आहे.
श्रीकृष्ण जन्मभूमी प्रकरणातील मुख्य याचिकाकर्ते दिनेश फलाहारी महाराज यांनी नवीन वर्षाच्या निमित्ताने मथुरेत आयोजित सनी लिओनीच्या कार्यक्रमाला कडाडून विरोध केला आहे. 'हॉटेल ललिता ग्रँड' आणि 'हॉटेल द ट्रक' मध्ये होणारे हे आयोजन म्हणजे ब्रजभूमीला कलंकित करण्याचा कट असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.
"अश्लीलता पसरवण्यास परवानगी दिली जाणार नाही"
सोमवारी साधू-संतांनी 'जिंदाबाद-मुर्दाबाद'च्या घोषणा देत निदर्शने केली आणि हा कार्यक्रम तातडीने रद्द करण्याची मागणी केली. दिनेश फलाहारी महाराज यांनी पत्रात म्हटलं आहे की, "ही दिव्य गोलोक भूमी योग, साधना आणि भजनाची आहे. येथे अश्लीलता पसरवण्यास परवानगी दिली जाणार नाही."
कडक कारवाई करण्याची मागणी
अशी अभिनेत्री जिचा संबंध पॉर्न फिल्म्सशी राहिला आहे, तिचं ब्रजभूमीमध्ये येणे म्हणजे धार्मिक भावना दुखावण्यासारखं आहे, असा तर्क संतांनी मांडला आहे. त्यांनी प्रशासनाकडे आयोजकांवर कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे. सध्या हा वाद चांगलाच चिघळला असून पोलीस प्रशासनही सतर्क झालं आहे.