सनी लिओनी झाली जुळ्यांची आई... सोशल मीडियाला गॉसिपची घाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2018 18:55 IST2018-03-05T18:55:06+5:302018-03-05T18:55:06+5:30

सनी लियोनी ही आपल्या सेक्सी अदाकारांनी नेहमीच चर्चेत असते. परंतु आता एका दुस-या कारणासाठी सनी लिओनी चर्चेत आली आहे. सनी लिओनी सरोगसीच्या माध्यमातून जुळ्या मुलांची आई झाली असून, त्यांच्या घरी दोन बाळांनी जन्म घेतला आहे.

Sunny Leone became the mother of the match ... social media gossip rush | सनी लिओनी झाली जुळ्यांची आई... सोशल मीडियाला गॉसिपची घाई

सनी लिओनी झाली जुळ्यांची आई... सोशल मीडियाला गॉसिपची घाई

मुंबई- सनी लियोनी ही आपल्या सेक्सी अदाकारांनी नेहमीच चर्चेत असते. परंतु आता एका दुस-या कारणासाठी सनी लिओनी चर्चेत आली आहे. सनी लिओनी सरोगसीच्या माध्यमातून जुळ्या मुलांची आई झाली असून, त्यांच्या घरी दोन बाळांनी जन्म घेतला आहे. याची माहिती सनीनं सोशल मीडियाच्या माध्यमातून दिली आहे. त्यानंतर सोशल मीडियावर युझर्स धुमाकूळ घातला आहे.

खरं तर गेल्या वर्षी सनी आणि तिचे पती डेनियल वेबर यांनी एका मुलीला दत्तक घेतलं होतं. जिचं नाव निशा कौर वेबर ठेवलं होतं. सोमवारी सोशल मीडियावर सनीनं पती डेनियल आणि तीन मुलांसह फोटो शेअर केला. त्यानंतर सर्वच आश्चर्यचकित झाले. सनीनं पोस्टमध्ये लिहून सांगितलंय की, त्यांच्या घरी दोन लहान बाळं आली आहेत. याचं नियोजन गेल्या वर्षी जूनमध्ये करण्यात आलं होतं. काही आठवड्यापूर्वीच दोन्ही बाळांचा जन्म झाला आहे. त्याचं नाव नोहा आणि अशर ठेवण्यात आलं आहे.

सनी लिहिते, 21 जून 2017 रोजी मला आणि माझ्या पतीला लवकरच मी तीन मुलांची आई होणार असल्याची बातमी समजली. आता आमचं कुटुंब पूर्ण झालं आहे. सनीच्या इन्स्टाग्राम पोस्ट तासाभरातच दोन लाख लोकांनी पाहिली. आता पोस्ट पाहणा-या युझर्सची संख्या पाच लाखांच्या घरात गेली आहे. सनी आणि डेनियलनं दोन वर्षांच्या निशाला गेल्या वर्षीच दत्तक घेतलं होतं. निशा कौर ही महाराष्ट्रातील लातूरमध्ये जन्मलेली आहे.

Web Title: Sunny Leone became the mother of the match ... social media gossip rush