'सनी देओल असो वा सनी लिओनी, सर्व उडून जातील'

By ऑनलाइन लोकमत | Published: May 3, 2019 01:09 PM2019-05-03T13:09:29+5:302019-05-03T13:15:36+5:30

'सनी देओल यांना घेऊन येऊ दे अथवा पॉर्नस्टार सनी लिओनीला, तरी ते जिंकू शकणार नाहीत'

Sunny Deol Or Sunny Leone, The BJP Will Lose In Punjab: Congress Leader | 'सनी देओल असो वा सनी लिओनी, सर्व उडून जातील'

'सनी देओल असो वा सनी लिओनी, सर्व उडून जातील'

Next

पंजाब : भाजपाचे उमेदवार आणि अभिनेता सनी देओल यांच्याबाबत काँग्रेसचे नेते राजकुमार चब्बेवाल यांनी वादग्रस्त विधान केले आहे. निवडणुकीच्या रिंगणात भाजपासनी देओल यांना घेऊन येऊ दे अथवा पॉर्नस्टार सनी लिओनीला, तरी ते जिंकू शकणार नाहीत, असे वक्तव्य राजकुमार चब्बेवाल यांनी एका आयोजित प्रचारसभेत केले आहे.  

पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकार अपयशी ठरले आहे. त्यांना पंजाबमध्ये तीन जागांवर उमेदवार मिळाला नाही. भाजपाने गुरुदासपूरमधून सनी देओल यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरविले आहे. मात्र, भाजपाने सनी देओल यांना घेऊन यावे अथवा सनी लिओनी हिला आणावे. काँग्रेसच्या वादळात सर्वजण उडून जातील, असे वक्तव्य राजकुमार चब्बेवाल यांनी यावेळी केले आहे.   


अभिनेता विनोद खन्ना यांच्या निधनानंतर भाजपाने अभिनेता सनी देओल यांना लोकसभा निवडणुकीच्या मैदानात उतरविले आहे. त्यांना पंजाबमधील गुरुदासपूर लोकसभा मतदार संघातून भाजपाने उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे आता राजकीय आखाड्यात सनी देओल आपले नशीब आजमावणार आहेत. सनी देओल यांच्यासमोर काँग्रेसचे उमेदवार सुनील जाखड यांचे आव्हान आहे. सुनील जाखड विद्यमान खासदार आहेत. 

सनी देओल यांचे वडील व ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र हे भाजपाशी जोडले गेलेले आहेत. 2004 मध्ये भाजपाच्या तिकिटावर त्यांनी राजस्थानच्या बिकानेरमधून निवडणूक लढवली होती. त्यांनी खासदार म्हणून निवडून गेल्यानंतर स्वत: ला राजकारणापासून वेगळे केले होते; परंतु ते मागील काही दिवसांपासून मथुरेत पत्नी हेमामालिनी यांच्यासाठी जो निवडणूक प्रचार करीत होते, ते पाहता राजकारणाबाबत त्यांचे मन बदलत आहे की काय, अशी चर्चा सुरू झाली आहे. 

सनी देओल यांचा 'गड्डी लेकर' प्रचार
सनी देओल यांनी आपला रोड शो डेरा बाबा नानकपासून श्री गुरुद्वारा साहिबचे दर्शन घेऊन केला. गेल्या बुधवारी गुरुदासपूरमधील अनेक भागातून सनी यांचा रोड शो झाला. यावेळी सनी देओल ट्रकच्या छतावर बसून जनतेला मतदान करण्याचे आवाहन करत होते. जागोजागी सनी देओलचे स्वागत होत होते. परंतु, युवकांमध्ये सनी देओल यांच्याविषयी फारसा उत्साह दिसून आला नसल्याचे समजते.

हिन्दुस्तान जिंदाबाद था, है, और रहेगा!, मोदींच्या हातात 'ढाई किलोचा हात'
अभिनेता सनी देओलने पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली होती. त्यावेळी मोदींनी सनी देओल सोबतचा आपला फोटो ट्विटरवर शेअर करत, आम्ही दोघेही 'हिंदुस्थान जिंदाबाद था, है, और रहेगा'साठी एकत्र असल्याचे म्हटले होते. 

सनी देओल फिल्मी, पण मी खरा फौजी; कॅप्टन अमरिंदर सिंह यांचा टोला
अभिनेता सनी देओल यांच्यावर पंजाबचे मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे नेते कॅप्टन अमरिंदर सिंह यांनी निशाना साधला होता. यावेळी अमरिंदर सिंह यांनी सनी देओल केवळ फिल्मी असल्याचे सांगत, आपण असली फौजी असल्याचे म्हटले होते. यावर सनी देओलकडून  काहीही प्रतिक्रिया देण्यात आली नव्हती. 
 

Web Title: Sunny Deol Or Sunny Leone, The BJP Will Lose In Punjab: Congress Leader

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.