सुनंदा पुष्कर यांची हत्याच

By Admin | Updated: January 6, 2015 14:53 IST2015-01-06T14:48:48+5:302015-01-06T14:53:43+5:30

माजी केंद्रीय मंत्री शशी थरुर यांची पत्नी सुनंदा पुष्कर यांची हत्या झाली होती असा दावा दिल्ली पोलिसांनी केला आहे.

Sunanda Pushkar's assassination | सुनंदा पुष्कर यांची हत्याच

सुनंदा पुष्कर यांची हत्याच

ऑनलाइन लोकमत

नवी दिल्ली, दि. ६ - माजी केंद्रीय मंत्री शशी थरुर यांची पत्नी सुनंदा पुष्कर यांची हत्या झाली होती असा दावा दिल्ली पोलिसांनी केला आहे. याप्रकरणी दिल्ली पोलिसांनी अज्ञात व्यक्ती विरोधात हत्येचा गुन्हा दाखल केल्याची माहिती दिल्ली पोलिस आयुक्त बी. एस. बस्सी यांनी दिली आहे.   
काँग्रेस नेते आणि माजी केंद्रीय मंत्री शशी थरुर यांची पत्नी सुनंदा पुष्कर यांचा गेल्या वर्षी दिल्लीतील पंचतारांकीत हॉटेलमध्ये संशयास्पद मृत्यू झाला होता. सुरुवातीला सुनंदा पुष्कर यांचा मृत्यू नैसर्गिक असल्याचे सांगितले जात होते. मात्र ऑक्टोबरमध्ये पुष्कर यांच्या व्हिसेराच्या चाचणीत त्यांचा मृत्यू विषबाधेमुळे झाल्याचे उघड झाले होते. त्यामुळे सुनंदा पुष्कर यांच्या मृत्यूविषशी संशय व्यक्त होत होता. अखेरीस दिल्ली पोलिसांनी तब्बल वर्षभरानंतर पुष्कर यांच्या मृत्यूप्रकरणी हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. एम्सच्या मेडिकल बोर्डाने दिलेल्या अहवालानुसार पुष्कर यांचा मृत्यू विषबाधेने झाला होता. तोंडाद्वारे किंवा इंजेक्शनद्वारे त्यांना विष दिले गेले असावे असे बस्सी यांनी सांगितले.  याप्रकरणी जी आवश्यक कारवाई लागेल ती आम्ही करु असेही त्यांनी सांगितले. 

Web Title: Sunanda Pushkar's assassination

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.