केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना समन्स; २२ फेब्रुवारीला हजर राहण्याचे आदेश
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 21, 2021 06:52 IST2021-02-21T02:13:28+5:302021-02-21T06:52:57+5:30
भाजपच्या एका रॅलीत अमित शहा यांनी तृणमूल संसद सदस्यांविरुद्ध काही अपमानकारक वक्तव्ये केली होती, असा आरोप आहे.

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना समन्स; २२ फेब्रुवारीला हजर राहण्याचे आदेश
कोलकाता : तृणमूल काँग्रेसचे संसद सदस्य अभिषेक बॅनर्जी यांनी दाखल केलेल्या मानहानी प्रकरणात प.बंगालमधील एका न्यायालयाने केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना समन्स जारी केले असून, २२ फेब्रुवारी रोजी व्यक्तिगत अथवा वकिलाच्या माध्यमातून हजर होण्यास सांगितले आहे. ११ ऑगस्ट, २०१८ रोजी कोलकाताच्या मेयो रोडवर आयोजित भाजपच्या एका रॅलीत अमित शहा यांनी तृणमूल संसद सदस्यांविरुद्ध काही अपमानकारक वक्तव्ये केली होती, असा आरोप आहे.