शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली महिला आयोगातून २२३ कर्मचाऱ्यांना तडकाफडकी काढले; उपराज्यपालांचे आदेश
2
माढा, सोलापूरात महाविकास आघाडीला धक्का; देवेंद्र फडणवीसांच्या खेळीनं भाजपाला फायदा
3
'अस्वस्थ झाला असतात तर ८४ वर्ष जगला नसता';नारायण राणेंचं शरद पवारांना प्रत्युत्तर
4
मतदानाच्या टक्केवारीत अचानक ११ दिवसांनी वाढ कशी?; संजय राऊतांनी व्यक्त केली शंका
5
कोरोना लसीकरण सर्टिफिकेटवरून PM नरेंद्र मोदींचा फोटो गायब? तांत्रिक बिघाड की आणखी काही कारण...
6
अखिलेश यादव यांचा समाजवाद की परिवारवाद? कुटुंबातील एवढे सदस्य लोकसभेच्या रिंगणात 
7
Fact Check : "मोदी जिंकले तर आरक्षण संपुष्टात येईल"; 'ती' क्लिप खोट्या दाव्यासह व्हायरल, जाणून घ्या 'सत्य'
8
'माझा भाऊ नाराज नाही', किरण सामंतांनी फोटो, बॅनर हटविल्यावरून उदय सामंतांची प्रतिक्रिया
9
विराट-अनुष्काचा मुलगा 'अकाय' कसा दिसतो? टीव्ही अभिनेता आमिर अली म्हणाला...
10
टेक कंपन्यांत मंदीचे वारे! एप्रिलमध्ये ७०००० कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढले; गुगल, टेस्ला ही यादीत
11
"मी भाग्यवान..."; निवडणूक प्रचारासाठी बहिणींकडून गहू, पैसे मिळाल्यावर शिवराज सिंह चौहान भावूक
12
बलात्कार पीडितेला मदत करणाऱ्या शिक्षकाचं हादरवणारं कृत्य; पोलिसांनी ठोकल्या बेड्या
13
दक्षिण भारतातील सर्वात तरुण उमेदवार! जाणून घ्या कोण आहेत मोहित रेड्डी? 
14
राष्ट्रीय पुरस्कार मिळालेल्या सिनेमामुळे प्रसाद झाला होता कर्जबाजारी; विकावं लागलं घर; म्हणाला, 'कर्जाचे हप्ते, बँकेचे फोन..';
15
अमित शाहांच्या बनावट व्हिडिओ प्रकरणी पोलीस ॲक्शन मोडवर, 3 बड्या नेत्यांना पाठवली नोटीस 
16
‘मोदी, भाजपा २७२ किंवा ३०० पार का म्हणत नाही? ४०० पार म्हणजे…’ संभाजीराजेंनी सांगितला संभाव्य धोका
17
Godrej Inside Story : कुलूप आणि चावीनं सुरुवात, मग इंग्रजांसाठी बनवली तिजोरी; गोदरेजचा यशाच्या शिखरापर्यंतचा रंजक प्रवास
18
हिट अँड रन: सुरेश रैनावर दु:खाचा डोंगर, कारने स्कूटीला धडक दिल्याने अपघात, मामेभावाचा मृत्यू   
19
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची तेजीसह सुरुवात; BPCL मध्ये तेजी, Kotal Bank घसरला
20
भेटायला गेले अन् पक्षप्रवेश करून घेतला; सकाळी शिंदे गटात, संध्याकाळी ठाकरे गटात

Sukma Naxal Attack: बेपत्ता कोब्रा कमांडोला हातही लावणार नाही, पण त्याचा 'प्राण' हवा; नक्षलवाद्यांनी फोन करून ठेवली अट

By ऑनलाइन लोकमत | Published: April 05, 2021 2:54 PM

Naxal attack at Sukma-Bijapur border in Chhattisgarh, one Cobra Jawan missing: कुख्यात नक्षलवादी हिडमा याला पकडण्यासाठी जवान रविवारी त्याच्या परिसरात गेले होते. यावेळी एका तुकडीला घेरुन नक्षलवाद्यांनी मोठा हल्ला केला होता.

रायपूर: छत्तीसगडच्या बिजापूरमध्ये 25 लाखांचा इनाम असलेल्य़ा नक्षलवाद्याला पकडण्यास गेलेल्या 200 सुरक्षा जवानांच्या एका तुकडीला घेरून नक्षलवाद्यांनी जोरदार हल्ला (Sukma Naxal Attack) केला. यामध्ये 24 जवान शहीद झाले असून एक जवान बेपत्ता झाला आहे. हा बेपत्ता जवान आपल्या ताब्यात असल्याचा फोन नक्षलवाद्यांनी (Naxalite) एका पत्रकाराला करून अट ठेवल्याने खळबळ उडाली आहे. (Chhattisgarh: 24 jawans killed, 31 injured in anti-Naxals operation in Sukma. One missing Cobra commando in Naxal leader's Custody.)

या नक्षलवाद्यांनी जवानाला कोणतेही नुकसान करणार नसल्याचे सांगितले आहे. कुख्यात नक्षलवादी हिडमा याला पकडण्यासाठी जवान रविवारी त्याच्या परिसरात गेले होते. 2000 जवानांची मोठी टीम वेगवेगळ्या भागात हिडमाला पकडण्यासाठी जंगलात घुसत होती. मात्र, नक्षलवाद्यांनी या जवानांना कोणत्याही प्रकारे न रोखता आतमध्ये जाऊ दिले आणि घात केला. सुरक्षा दलाच्या काही टीम तयार करण्यात आल्या होत्या. घनदाट जंगलात त्यांना कोपरान कोपरा शोधायचा होता. मात्र, नक्षलवादी त्यांची वाटच पाहत होते. अनेट तुकड्यांपैकी एका तुकडीला नक्षलवाद्यानी तीन बाजुंनी घेरले आणि हिडमाच्या बटालियनने हल्ला केला. यामध्ये हे जवान शहीद झाले. हिडमाची बटालियन डोंगररांगांतून फायरिंग करत होती. यामुळे खाली असलेले जवान सहज लक्ष्य ठरले. तिन्ही बाजुंनी घेरलेल्या जवानांनी त्या ही परिस्थितीत हिडमाच्या मोक्याच्या जागी लपलेल्या आणि हल्ला करत असलेल्या नक्षलवाद्यांना चोख प्रत्यूत्तर दिले.

Sukma Naxal Attack: घनदाट जंगलात जवानांना आधी शांततेत घुसू दिले, नंतर घात केला; रॉकेट लाँचर, एके ४७...सुकमा हल्ल्याचे फोटो

बेपत्ता असलेला जवानहा राजेश्वर सिंह मनहास (Rajeshwar singh Manhas) असून तो जम्मू-काश्मीरच्या आहे. हा जवान अत्यंत घातक अशा कोब्रा बटालियनचा आहे. नक्षलवाद्यांनी पत्रकाराला फोन करून याची माहिती दिली. तसेच ते या जवानाला सोडण्यास तयार आहेत. परंतू राजेश्वर सिंह यांनी इथीन सोडल्यावर सुरक्षा दलामधून निवृत्ती घ्यावी आणि नोकरी सोडून दुसरे कोणतेही काम करावे, अशी अट घातली आहे. 

दुसरीकडे राजेश्वर सिंहांचे कुटुंबीय चिंतेत आहेत. कंट्रोल रुमकडून ते बेपत्ता असल्याचे सांगितले जात आहे तर न्यूज चॅनलवर ते नक्षल्यांच्या ताब्यात असल्याचे दाखविले जात आहे. राजेश्वर यांच्या जम्मूतील घरी त्याचे नातेवाईक जमा होण्यास सुरुवात झाली आहे. राजेश्वर यांच्या पत्नीने छत्तीसगड सरकारला नक्षलवाद्यांची जी काही मागणी आहे ती पूर्ण करून पतीला सोडविण्य़ाची विनंती केली आहे. माझे पती गेल्या चार वर्षांपासून कोब्रा कमांडोमध्ये कार्यरत आहेत. सरकारला आपला जवान कोणत्याही किंमतीवर परत आणावा लागेल. ते माझे पतीच नाहीत, तर देशाचे जवान आहेत. माझ्या सासऱ्यांनीही सीआरपीएफमध्ये प्राणांची आहुती दिली आहे, असे त्या म्हणाल्या. 

टॅग्स :naxaliteनक्षलवादीMartyrशहीदPoliceपोलिस