संधिसाधूंचा सुकाळ....... ( कारण... राजकारण... शहर विशेष... स.सो.खंडाळकर)
By Admin | Updated: February 14, 2015 23:50 IST2015-02-14T23:50:24+5:302015-02-14T23:50:24+5:30
तसं तर राजकारण संधिसाधूंचंच म्हटलं जातं. निष्ठावान वा ध्येयनिष्ठांचं ते काम नाही. हे निष्ठावान व ध्येयनिष्ठ जिथल्या तिथंच राहतात. किंबहुना ते नेहमीच मागे पडलेले बघावयास मिळतात आणि ज्यांनी संधी साधली, ते कुठल्या कुठे पोहोचलेले दिसून येतात. औरंगाबादच्या राजकारणात सध्या संधिसाधूंचा सुकाळ बघावयास मिळत आहे. हा सारा प्रकार किळसवाणा वाटल्याशिवाय राहत नाही; पण यालाच तर राजकारण म्हटलं जातं. आगामी काळातील औरंगाबाद महापालिकेची निवडणूक हे या संधिसाधू राजकारणाचं मूळ होय. किमान वॉर्डातील तिकिटाची का होईना हमी घेऊन हे संधिसाधू राजकारण केलं जात आहे. काही जणांना पैसे प्रिय असतात, हा प्र्रकार पुन्हा वेगळा. हे सगळं करताना कुणाला त्याची लाजही वाटत नाही.

संधिसाधूंचा सुकाळ....... ( कारण... राजकारण... शहर विशेष... स.सो.खंडाळकर)
त ं तर राजकारण संधिसाधूंचंच म्हटलं जातं. निष्ठावान वा ध्येयनिष्ठांचं ते काम नाही. हे निष्ठावान व ध्येयनिष्ठ जिथल्या तिथंच राहतात. किंबहुना ते नेहमीच मागे पडलेले बघावयास मिळतात आणि ज्यांनी संधी साधली, ते कुठल्या कुठे पोहोचलेले दिसून येतात. औरंगाबादच्या राजकारणात सध्या संधिसाधूंचा सुकाळ बघावयास मिळत आहे. हा सारा प्रकार किळसवाणा वाटल्याशिवाय राहत नाही; पण यालाच तर राजकारण म्हटलं जातं. आगामी काळातील औरंगाबाद महापालिकेची निवडणूक हे या संधिसाधू राजकारणाचं मूळ होय. किमान वॉर्डातील तिकिटाची का होईना हमी घेऊन हे संधिसाधू राजकारण केलं जात आहे. काही जणांना पैसे प्रिय असतात, हा प्र्रकार पुन्हा वेगळा. हे सगळं करताना कुणाला त्याची लाजही वाटत नाही. सध्या भाजपमध्ये जाण्याची टूम दिसते. भाजपमध्ये जाणार्यांना उद्या हाफ चड्डीतही दिसावं लागेल, याचं भान नाही. भान कशाला हवं? तेही करण्याची तयारी राहील. हाफ काय आणि पूर्ण चड्डी काय? आचार आणि विचार याची जीवनात सुसंगती नसते, तेव्हा कुणी कसाही भरकटतो आणि स्वार्थ साधतो, हेच यातलं अंतिम सत्य. कालचे काँग्रेसवाले आज भाजपवाले होतात, याला काय म्हणायचं? विचाराच्या पातळीवर मग काय फरक राहिला? भाजपसुद्धा काँग्रेस व्हायच्या मार्गावर आहे, हेच खरं! ज्या भाजपला पूर्वी सर्रासपणे जातीय पक्ष म्हणून नावं ठेवली जायची, तोच भाजप आज या संधिसाधूंना कमालीचा गोड वाटत आहे. कारण तो देशाच्या आणि राज्याच्या सत्तेत आहे; पण त्यांनाही कुणीतरी केजरीवाल मध्येच भेटतो आणि तो पानिपत करीत असतो, हेही लक्षात ठेवण्यासारखी आजची परिस्थिती आहे. मोदीची लाट आहे असं म्हणत ऐन विधानसभा निवडणुकीच्या काळात काही नगरसेवक त्याच वेळी भाजपवासी झाले. आता पुन्हा आणखी सहा नगरसेवक भाजपवासी झाले. जुनं लग्न मोडून आज लगेच भाजपचं कुंकू लावायला तयार! म्हणजे त्या लग्नाला काही अर्थच नाही. असं सगळं आचारहीन व विचारहीन होत असताना भाजपलाही वाटायला लागलंय की आता आपली ताकद खूप वाढायला लागली. आपण मोठे भाऊ व्हायला लागलोत; पण गद्दार ते गद्दारच असतात. आज इकडे तर उद्या तिकडे. फक्त स्वार्थ साधला गेला पाहिजे. अन्यथा ते कुणाच्याही तोंडावर थुंकायला तयार! आज भाजपमध्ये चाललेल्यांना उद्या पुन्हा काँग्रेस सत्तेत यायला लागली अशी चाहूल लागायला उशीर... टुणकन पुन्हा काँग्रेसमध्ये उडी!