"हा तर फक्त टीझर" सुकेश चंद्रशेखरची अरविंद केजरीवालांना इशारा; म्हणाला, 'लवकरच...'
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2023 14:00 IST2023-04-02T13:59:01+5:302023-04-02T14:00:24+5:30
सुकेश चंद्रशेखरने एक पत्र लिहून दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना धमकीच दिली आहे.

"हा तर फक्त टीझर" सुकेश चंद्रशेखरची अरविंद केजरीवालांना इशारा; म्हणाला, 'लवकरच...'
महाठग सुकेश चंद्रशेखरने (Sukesh Chandrashekhar) आणखी एक लेटर बॉम्ब टाकले आहे. यामधून त्याने पुन्हा दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. 'केजरीवालांचा खेळ आता संपला आहे. ते लवकरच तिहारमध्ये येतील' असा दावा सुकेश याने केला आहे. उत्पादन शुल्क घोटाळ्यात नाव आलेल्या बीआरएस नेत्या के. कविता यांच्यापासून अनेक मद्य व्यावसायिकांशी अरविंद केजरीवाल यांचे संबंध आहेत, असेही त्याने म्हटले आहे.
सुकेश चंद्रशेखरने एक पत्र लिहून दावा केला आहे की, केजरीवाल यांनी २०२० मध्ये हैदराबादच्या टीआरएस कार्यालयात १५ कोटी रुपये पाठवण्यास सांगितले होते. त्या चॅट्सचे जवळपास ७०० पेज आपल्याकडे आहेत. येत्या आठवड्यात चॅट्सचे ट्रेलर दाखवण्यात येईल असा इशाराही त्याने दिलाय.
हा तर केवळ टीझर
सुकेशने पत्रात म्हटले आहे की, मिस्टर केजरीवाल, मी २०२० शी संबंधित चॅटचा ट्रेलर रिलीज करणार आहे. यात तुम्ही आणि सत्येंद्र जैन यांनी १५ कोटींसाठी १५ किलो घी हा कोडवर्ड ठरवला होता. हा निव्वळ टीझर असल्याचे सांगून आपण लवकरच या चॅटचा तपशील जाहीर करणार आहोत, असेही तो म्हणाला. सुकेशने विधिज्ञ अनंत मलिक यांच्यामार्फत हे पत्र जारी केले आहे.