शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान मध्यस्थ होण्याच्या लायक नाही! इराणने बुरखा फाडला; ट्रम्प म्हणाले, इराणच्या पाईपलाईन्स फुटणार... 
2
तेहरानमध्ये भीषण संकट! इंधन टाक्यांच्या स्फोटात ८ कोटी लीटर तेल वाया; राज्यपालांचे नागरिकांना महत्त्वाचे आवाहन
3
आधी बिर्याणी, मग कलिंगड खाल्लं... मुंबईतील एकाच कुटुंबात चौघांचा मृत्यू, घटनेमुळे खळबळ
4
Top Marathi News Live: उत्तर महाराष्ट्र अन् मराठवाड्याला 'हीट वेव्ह'चा इशारा; मुंबईसह उत्तर कोकणात उकाडा असह्य होणार
5
अनिल अंबानींच्या 'या' कंपनीचा शेअर ४८% नं वधारला; ३० रुपयांच्या वर पोहोचला स्टॉक, तुमच्याकडे आहे का?
6
३४९,३९९ चे रिचार्ज नाही, २० रुपयांचा बॅलन्स तुमचे सिम कार्ड ठेवणार अॅक्टिव्ह...! ट्रायने सर्वच कंपन्यांना घालून दिलाय हा नियम...
7
भारताला हरवण्यात अपयशी ठरल्याने पाकिस्तानचा अफगाणिस्तानशी संघर्ष; अहवालातून खळबळजनक माहिती
8
Watch Video: टिम डेव्हिड, रोमारियो शेफर्ड यांनी चाहत्यांसोबत खेळलं 'गल्ली क्रिकेट', व्हिडीओ व्हायरल!
9
रेकॉर्डब्रेकर रिंकू, IPL मध्ये रचला 'असा' विक्रम, युवराज, जडेजाही पडले मागे, मोडणं आहे कठीण 
10
'चला हवा येऊ द्या'च्या दुसऱ्या सीझनमध्ये परत तीच टीम का नव्हती? श्रेया बुगडे म्हणाली...
11
बिहारमध्ये मुख्यमंत्री सम्राट चौधरी यांच्या घराच्या पायऱ्या तोडल्या; बुलडोझर कारवाई बेधडक सुरु
12
Swapna Shastra: भीतीदायक स्वप्नांचा असतो भविष्याशी संबंध? नक्की काय सांगतं स्वप्न शास्त्र?
13
मराठी सक्ती निर्णयाची अंमलबजावणी ६ महिने ते १ वर्ष पुढे ढकलावी; संजय निरुपमांची नवी मागणी
14
Ilma Afroz : वडिलांचं छत्र हरपलं, शेतात घाम गाळला; आईने पणाला लावलं आयुष्य, लेक झाली IPS अधिकारी
15
"आज सासऱ्यांना मिस करतेय, रिंकूची खेळी त्यांच्यासाठी होती"; KKR जिंकल्यावर प्रिया सरोज भावूक
16
बर्थडे पार्टीत रक्ताचा सडा! चेहऱ्याला केक लावल्याच्या रागातून भाजप नेत्याच्या भावांसह तिघांची हत्या
17
तब्बल २५ एकरचा कॅम्पस, २८९ कोटी खर्च, मोदींनी केलं होतं उद्घाटन, पण या संस्थेत अवघे १५ विद्यार्थी 
18
Home Loan घेण्यासाठी किमान किती असावा लागेल Credit Score; अर्ज करण्यापूर्वी लक्षात ठेवा 'या' गोष्टी
19
आपच्या त्या सात फुटीर खासदारांबाबत राज्यसभा सभापतींनी घेतला मोठा निर्णय, विलिनिकरणाबाबत दिले असे आदेश    
Daily Top 2Weekly Top 5

बोअरवेलमध्ये पडलेल्या सुजीतला वाचवण्याचे प्रयत्न अपयशी; तीन दिवसांनंतर मृतदेह हाती

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 29, 2019 07:52 IST

तीन दिवसांपूर्वी बोअरवेलमध्ये पडलेल्या सुजीतचा मृत्यू

चेन्नई: जवळपास तीन दिवसांपासून बोरवेलमध्ये अडकलेल्या दोन वर्षांच्या सुजीत विल्सनचा मृत्यू झाला आहे. सुजीतला वाचवण्यासाठी गेल्या तीन दिवसांपासून अथक प्रयत्न सुरू होते. बोरवेलमध्ये अडकलेल्या सुजीतचा मृतदेह पहाटेच्या सुमारास बाहेर काढण्यात आला. सुजीतच्या सुखरुप सुटकेसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यासह अनेक दिग्गजांनी प्रार्थना केल्या होत्या. मात्र सुजीतला सुखरुप बाहेर काढण्यात अपयश आलं. तमिळनाडूच्या तिरुचिरापल्ली जिल्ह्यातल्या एका गावात असलेल्या बोरवेलमध्ये सुजीत विल्सन गेल्या तीन दिवसांपासून अडकला होता. त्याला वाचवण्यासाठी प्रशासनाचे प्रयत्न सुरू होते. मात्र हे प्रयत्न अपुरे ठरले. पहाटेच्या सुमारास सुजीतचा मृतदेह बाहेर काढण्यात आला. वाहतूक विभागाचे प्रधान सचिव जे. राधाकृष्णन यांनी याबद्दलची माहिती दिली. 'सुजीतचा मृतदेह हाती लागला आहे. त्याला जिवंत बाहेर काढण्याचे प्रयत्न अपयशी ठरले. मृतदेह बाहेर काढला तेव्हा तो चांगल्या स्थितीत नव्हता. त्यातून दुर्गंध येत होता,' अशी माहिती राधाकृष्णन यांनी दिली. गेल्या तीन दिवसांपासून सुजीतच्या सुखरुप सुटकेसाठी प्रयत्न सुरू होते. पंतप्रधान मोदींनी याबद्दल ट्विटदेखील केलं होतं. 'मुख्यमंत्री ई. पलानिसामी यांच्याकडून मुलाच्या बचावासाठी केल्या जात असलेल्या प्रयत्नांची माहिती घेतली आहे. मी सुजीत विल्यनसाठी प्रार्थना करतो. तो सुरक्षित राहावा, यासाठी हरतऱ्हेचे प्रयत्न केले जात आहेत,' असं मोदींनी ट्विटमध्ये म्हटलं होतं. दोन वर्षांचा सुजीत विल्सन 25 ऑक्टोबरला बोरवेलमध्ये पडला. त्यानंतर त्याच्या बचावासाठी प्रशासनानं प्रयत्न सुरू केले. बोरवेलमध्ये पडलेला सुजीत काही वेळानं बेशुद्ध झाला. त्याला वाचवण्यासाठी एनडीआरएफ, एसडीआरएफ, पोलीस आणि स्थानिक प्रशासन कामाला लागलं होतं. सुजीत आधी 26 फूट खोल खड्ड्यात पडला होता. मात्र तिथून तो आणखी खाली घसरला आणि 70 फूट खोलवर जाऊन अडकला.