टीम इंडियाच्या पराभवामुळे क्रिकेट चाहत्याने केली आत्महत्या
By Admin | Updated: March 26, 2015 19:57 IST2015-03-26T19:57:08+5:302015-03-26T19:57:08+5:30
वर्ल्डकप सेमीफायनलमध्ये भारताचा पराभव झाल्याने हताश झालेल्या लखनौतील क्रिकेट चाहत्याने सातव्या मजल्यावरुन उडी मारुन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना गुरुवारी संध्याकाळी घडली.

टीम इंडियाच्या पराभवामुळे क्रिकेट चाहत्याने केली आत्महत्या
>ऑनलाइन लोकमत
लखनौ, दि. २६ - वर्ल्डकप सेमीफायनलमध्ये भारताचा पराभव झाल्याने हताश झालेल्या लखनौतील क्रिकेट चाहत्याने सातव्या मजल्यावरुन उडी मारुन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना गुरुवारी संध्याकाळी घडली. तर वेल्लोर येथे भारताला विजय मिळावा यासाठी एका चाहत्याने स्वतःची जीभ कापून घेतल्याचा प्रकार समोर आला आहे.
उत्तरप्रदेशमधील सिंचन विभागात चतुर्थ श्रेणी कामगार म्हणून कार्यरत असलेले उमेश चंद्र (वय ५० वर्ष) हे क्रिकेटचे चाहते होते. गुरुवारी भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया सामन्यात महेंद्रसिंह धोनी बाद झाल्यावर चंद्र निराश झाले. त्यांनी सामना बघणे बंद करुन कार्यालयाबाहेर निघाले. निराशेच्या भरात त्यांनी कार्यालयाच्या सातव्या मजल्यावरुन उडी मारुन आत्महत्या केली. तर तामिळनाडूतील वेल्लोर येथे राहणा-या एका तरुणाने भारताने सामना जिंकावा यासाठी चक्क स्वतःची जीभ कापून घेतली. ऑस्ट्रेलियाने ३२९ धावांचे लक्ष्य दिल्यावर सुधाकरने भारताच्या विजयासाठी प्रार्थना केली. देवाकडे नवस म्हणून या महाशयाने स्वतःची जीभच कापून घेतली. काही वेळाने त्याच्या शेजारी राहणा-यांना हा प्रकार समजला व त्यांनी सुधाकरला रुग्णालयात दाखल केले.