शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
4
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
5
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
6
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
7
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
8
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
9
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
10
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
11
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
12
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
13
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
14
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
15
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
16
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
17
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
18
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
19
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
20
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
Daily Top 2Weekly Top 5

Suicide : नर्सिंगच्या विद्यार्थींनीची आत्महत्या, सुसाईड नोट वाचून पोलिसांचेही डोळे पाणावले

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 4, 2021 09:06 IST

Suicide : मी या जगदुनियेला परेशान झाले होते, ही दुनिया खूप स्वार्थी आहे. तुम्ही कितीही चागंलं वागा, पण लोक ते समजणार नाहीत. लहानपणी ज्याप्रमाणे माझ्या चुकांना माफी दिली, तशीचा या चुकीलाही माफ करा

ठळक मुद्देझुंझूनुची रहिवाशी असलेली प्रियंका इंद्रा मार्केटमध्ये एका खोलीत भाड्याने राहात होती. रविवारी सकाळी खूप वेळ झाला तरी ती रुममधून बाहेर आली नाही. घरमालकाने दरवाजा वाजवून पाहिलं पण आतमधून काहीच आवाज आला नाही.

जयपूर - राजस्थानच्या चुरू येथे एका नर्सिंग महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या युवतीने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. बीएससी नर्सिंगच्या तिसऱ्या वर्षाला शिकणाऱ्या या मुलीने आत्महत्येपूर्वी सुसाईड नोट लिहून ठेवली असून त्यामध्ये आई-वडिलांना आय लव्ह यू म्हटलं आहे. या भावनिक सुसाईड नोट आणि मुलीने अचानक उचललेल्या टोकाच्या पावलामुळे कुटुंबीयांना मोठा धक्का बसला आहे. प्रियंका कटेवा असे या तरुणीचे नाव असून ती २२ वर्षांची होती. प्रियंकाच्या भावनिक सुसाईड नोटमुळे पोलिसांचे डोळे पाणावले होते. 

मी या जगदुनियेला परेशान झाले होते, ही दुनिया खूप स्वार्थी आहे. तुम्ही कितीही चागंलं वागा, पण लोक ते समजणार नाहीत. लहानपणी ज्याप्रमाणे माझ्या चुकांना माफी दिली, तशीचा या चुकीलाही माफ करा. जगात आई-वडिलांसारखं प्रेम दुसरं कोणीचा करू शकत नाही. आय लव्ह यू मम्मी-पापा, अँड माय ऑल फॅमिली... कुछ तो लोग कहेंगे, लोगों का काम है कहना... अशी भावनिक चिठ्ठी लिहून प्रियंकाने आत्महत्या केली. 

झुंझूनुची रहिवाशी असलेली प्रियंका इंद्रा मार्केटमध्ये एका खोलीत भाड्याने राहात होती. रविवारी सकाळी खूप वेळ झाला तरी ती रुममधून बाहेर आली नाही. घरमालकाने दरवाजा वाजवून पाहिलं पण आतमधून काहीच आवाज आला नाही. त्यामुळे, खिडकीतून डोकावून पाहिले असता तिचे शरीर एका दोरीला लटकल्याचे दिसल्याने सर्वांनाच मोठा धक्का बसला. याबाबत, घरमालकाने पोलिसांना खबर दिली. त्यानंतर, काही वेळातच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला. 

दरम्यान, शनिवारी बीएससी नर्सींगच्या सेकंड इयरचा निकाल लागला होता. संध्याकाळी प्रियंकाने आई-वडिलांसह नातेवाईकांशी फोनवरुन संवादही साधला. त्यानंतर, नेमकं काय झालं हे कुणालाच माहिती नाही. प्रियंकांच्या आत्महत्येमुळे कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला असून पोलीस तपास करत आहेत.  

टॅग्स :Rajasthanराजस्थानPoliceपोलिसDeathमृत्यूCrime Newsगुन्हेगारी