शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
6
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
7
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
8
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
9
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
10
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
11
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
12
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
13
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
14
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
15
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
16
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
17
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
18
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
19
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
20
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

UPSC ची तयारी करणाऱ्या तरुणाने संपवलं आयुष्य; 'अ‍ॅलेक्स'ने वाचवण्याचा प्रयत्न केला, पण...

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 9, 2023 13:35 IST

मालकाच्या मृत्यूनंतर पाळीव कुत्रा अ‍ॅलेक्सचाही मृत्यू झाला. जाणून घ्या कारण.

UP News: केंद्रीय लोकसेवा आयोगाची (UPSC) तयारी करणाऱ्या तरुणाने उत्तर प्रदेशातील झाशीत आत्महत्या केली. 23 वर्षांच्या मुलासोबत घरात फक्त एक पाळीव कुत्रा होता. मुलाने फाशी घेतल्यानंतर त्या मुक्या जनावराने आपल्या मालकाला वाचवण्याचा प्रयत्न केला. पण तो अखेर अयशस्वी ठरला. माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले. मात्र कुत्र्याने कोणालाही आत जाऊ दिले नाही. 

एका पोलीस उपनिरीक्षकाने घरात घुसण्याचा प्रयत्न केला असता कुत्र्याने त्यांच्यावर हल्ला करुन जखमी केले. मात्र, नंतर कुत्र्याला ताब्यात घेण्यात पालिकेच्या पथकाला यश आले. झाशीच्या कोतवाली पोलिस स्टेशन हद्दीतील पंचवटी कॉलनीत हा प्रकार घडला. येथील नालंदा ओम गार्डनमध्ये राहणाऱ्या आनंद अग्निहोत्री यांचा एकुलता एक मुलगा संभव अग्निहोत्री याने सोमवारी गळफास घेऊन आत्महत्या केली. संभव अग्निहोत्री नागरी सेवांची तयारी करत होता. नातेवाईकांनी सांगितले की, मृत संभवचे वडील आनंद अग्निहोत्री हे रेल्वे डीआरएम कार्यालय झाशी येथे अधिकारी आहेत.

कुटुंबीय भोपाळला गेलेपोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आनंद अग्निहोत्री यांची पत्नी काही दिवसांपासून गंभीर आजाराने त्रस्त आहे. त्यासाठी ते भोपाळ (मध्य प्रदेश) येथे उपचारासाठी गेले होते. घरात त्यांचा मुलगा संभव आणि पाळीव कुत्रा अॅलेक्स होते. काल संध्याकाळी वडिलांनी संभवच्या मोबाईलवर अनेकदा फोन केला, पण तो फोन उचलत नव्हता. त्यानंतर त्यांनी शेजाऱ्यांना फोन करुन सांगितले. शेजारी जेव्हा त्यांच्या घरी पोहोचले तेव्हा पाळीव कुत्रा घराच्या पोर्चमध्ये बसला होता, तो कोणालाही आत येऊ देत नव्हता.

अ‍ॅलेक्सनही जीव सोडला...कुत्रा सर्वांना ओळखत होता, पण त्यावेली तो खूप विचित्र वर्तन करत होता. कुत्र्याच्या बदललेल्या वागणुकीमुळे अनुचित प्रकार घडल्याची भीती शेजाऱ्यांना वाटली आणि त्यांनी पोलिसांना माहिती दिली. अलेक्सने सुमारे 4 तास कोणालाही घरात प्रवेश करू दिला नाही. पोलिसांनी पालिकेच्या पथकाला पाचारण केले. खूप प्रयत्नांनंतर अॅलेक्सला पकडले आणि नंतर बेशुद्धीचे इंजेक्शन दिले. यानंतर अॅलेक्सचाही मृत्यू झाला. मृत्यूचे कारण ऍनेस्थेसियाचा ओव्हरडोस असल्याचे मानले जात आहे. कुत्र्याला आटोक्यात आणल्यानंतर पोलीस घरात घुसले तेव्हा तेथील दृश्य पाहून ते थक्क झाले. 

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशDeathमृत्यूdogकुत्राPoliceपोलिस