उत्तर प्रदेशची राजधानी लखनौमध्ये एका बसला भीषण आग लागली. ही आग मोहनलालगंज परिसरात दिल्लीहून बिहारला जाणाऱ्या एका स्लीपर बसला लागली. या अपघातात ५ जणांचा मृ्त्यू झाला. तर बसमध्ये सुमारे ६० प्रवासी प्रवास करत होते. चालकाने काच फोडली, बसमधून उडी मारली आणि पळून गेला. आग इतकी भीषण होती की अवघ्या १० मिनिटांत ती पूर्णपणे जळून खाक झाली.
मिळालेल्या माहितीनुसार, लखनौच्या मोहनलालगंज भागातील किसान पथवर ही घटना घडली, दिल्लीहून बिहारला जाणाऱ्या एका खाजगी स्लीपर बसला अचानक आग लागली. बहुतेक प्रवासी गाढ झोपेत असताना हा अपघात झाला. आग इतक्या वेगाने पसरली की अवघ्या १० मिनिटांत संपूर्ण बस जळून खाक झाली.
भाजप-संघातील घटक नाराज; म्हणे, ‘ऑपरेशन सिंदूर’नंतरचा युद्धविराम ही तर चूक, शत्रुत्व थांबले
बसमधील प्रवाशांनी दिलेल्या माहितीनुसार, धुरामुळे त्यांना श्वास घेण्यास त्रास होऊ लागला. आग लागताच गोंधळ उडाला. लोक जीव वाचवण्यासाठी दारे आणि खिडक्यांकडे धावले, पण ड्रायव्हरच्या अतिरिक्त सीटमुळे मार्ग अडला. अनेक प्रवासी त्यात अडकले,बाहेर पडू शकले नाहीत.मिळालेल्या माहितीनुसार, आग भीषण होती. ही आग एक किलोमीटर अंतरावरूनही दिसत होती. अपघाताची माहिती मिळताच आजूबाजूच्या परिसरातील लोक घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी पोलिसांना आणि अग्निशमन दलाला माहिती दिली. माहिती मिळताच अग्निशमन दलाचे पथक घटनास्थळी पोहोचले, प्रयत्नांनंतर आग आटोक्यात आणण्यात आली, पण तोपर्यंत संपूर्ण बस जळून खाक झाली होती. या अपघातात ५ प्रवासी जिवंत जळाले, या प्रवाशांची अद्याप ओळख पटलेली नाही. इतर प्रवाशांना वेळीच बसमधून बाहेर काढण्यात आले.
चालकाची सीट साधी असती तर....
बस चालकाने आधी काच फोडली आणि बसमधून उडी मारून घटनास्थळावरून पळ काढला. अपघातानंतर त्याचा कोणताही पत्ता लागलेला नाही. पोलिसांनी त्याचा शोध सुरू केला आहे.
या घटनेबाबत पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. अपघाताच्या कारणांचा तपास सुरू केला आहे. सुरुवातीच्या तपासात शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचे संभाव्य कारण सांगितले जात आहे, पण फॉरेन्सिक अहवालानंतरच त्याची माहिती मिळेल. ड्रायव्हरची सीट सामान्य असती आणि आपत्कालीन बाहेर पडण्याचा मार्ग मोकळा असता तर कदाचित प्रवाशांचे प्राण वाचले असते.