तावी नदीला अचानक आला पूर, अनेकजण अडकले; SDRF ने अनेकांना वाचवले

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 25, 2025 13:19 IST2025-06-25T13:04:02+5:302025-06-25T13:19:14+5:30

जम्मू जवळ मुसळधार पाऊस सुरू आहे. पावसामुळे तावी नदीच्या पाण्याची पातळी अचानक वाढली. वाढलेल्या पाण्यामुळे काहीजण नदीत अडकल्याचे समोर आले.

Sudden flood in Tawi river, many people stranded; SDRF rescues many | तावी नदीला अचानक आला पूर, अनेकजण अडकले; SDRF ने अनेकांना वाचवले

तावी नदीला अचानक आला पूर, अनेकजण अडकले; SDRF ने अनेकांना वाचवले

जम्मूच्या पर्वतीय भागात मुसळधार पावसामुळे बुधवारी सकाळी तावी नदीच्या पाण्याची पातळी अचानक वेगाने वाढली. त्यामुळे दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये एकूण नऊ जण नदीत अडकले. यावेळी लगेच एसडीआरएफ पथकाने सुमारे एक तास चाललेल्या विशेष बचाव मोहिमेनंतर सर्वांना सुखरूप बाहेर काढले. एसडीआरएफमुळे अनेकांचा जीव वाचला आहे. 

तीन जणांना फाशी, ७०० अटकेत, युद्धविरामानंतर इराणची मोसादच्या हेरांवर कठोर कारवाई

बुधवारी सकाळी १० वाजता नदीत लोक अडकल्याची पहिली घटना समोर आली. तावी नदीत तलब खटिका येथील रहिवासी मदन लाल नावाचा एक व्यक्ती आपल्या घोड्यांसह तावी नदीच्या मंदिर-मशीद पॉईंटजवळ वाळू काढण्यासाठी गेला होता. पाण्याची पातळी अचानक वाढल्यामुळे त्यांचे घोडे कसेतरी सुरक्षित ठिकाणी पोहोचले, पण मदन लाल नदीच्या मध्यभागी अडकले.

अडकलेला व्यक्ती मुख्य पुलाच्या खांबावर पोहोचला, यावेळी त्यांनी खांबाचा आश्रय घेतला. रस्त्याने जाणाऱ्यांनी त्या व्यक्तीला पाहिले. त्यांनी पोलिसांना कळवले, त्यानंतर एसडीआरएफला घटनास्थळी पोहोचले. एसडीआरएफच्या पथकाने आधी मदनलालला दोरी पाठवली, नंतर पुलावरून शिडी टाकून  वरती खेचले आणि सुरक्षितपणे बाहेर काढले.

दुसरी घटना वेअरहाऊस परिसरातील आहे, या ठिकाणी जम्मूमध्ये कामगार म्हणून काम करणारे नेपाळमधील आठ लोक तावी नदीत आंघोळीसाठी गेले होते. पाण्याची पातळी अचानक वाढल्याने ते सर्वजण नदीच्या मध्यभागी असलेल्या एका उंच बेटावर अडकले. माहिती मिळताच एसडीआरएफ पथक घटनास्थळी पोहोचले.दोरीच्या मदतीने मानवी साखळी तयार करून सर्वांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले.

Web Title: Sudden flood in Tawi river, many people stranded; SDRF rescues many