कडक सॅल्यूट! ASI ची लेक झाली IAS अधिकारी, स्वप्न पूर्ण करून वडिलांचं नाव केलं मोठं

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 21, 2025 13:27 IST2025-03-21T13:27:17+5:302025-03-21T13:27:43+5:30

Rupal Rana : रुपलला यश सहजासहजी मिळालेलं नाही. ती पहिल्या दोन वेळा यूपीएससी परीक्षेत नापास झाली. हार न मानता चुकांमधून शिकली.

success story of ias rupal rana policeman asi daughter who cleared civil services exam in 3rd attempt | कडक सॅल्यूट! ASI ची लेक झाली IAS अधिकारी, स्वप्न पूर्ण करून वडिलांचं नाव केलं मोठं

कडक सॅल्यूट! ASI ची लेक झाली IAS अधिकारी, स्वप्न पूर्ण करून वडिलांचं नाव केलं मोठं

रुपल राणा ही मूळची उत्तर प्रदेशातील बागपत जिल्ह्यातील आहे आणि तिने २०२४ च्या यूपीएससी नागरी सेवा परीक्षामध्ये २६ वा रँक मिळवून इतिहास रचला. तुमच्यात काहीतरी चांगलं करण्याची जिद्द असेल तर तुम्ही अडचणींवर मात करू शकता आणि मोठं यश मिळवू शकता हे तिने दाखवून दिलं आहे. रुपलची गोष्ट त्या तरुणांसाठी प्रेरणादायी आहे ज्यांना त्यांची स्वप्नं पूर्ण करायची आहेत.

रुपलचं शिक्षण बागपत येथील जेपी पब्लिक स्कूलमधून झालं. तिने हायस्कूलच्या परीक्षेत १० सीजीपीए गुण मिळवले. यानंतर तिने बिर्ला इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड सायन्स, पिलानी येथून अकरावी आणि बारावीचं शिक्षण पूर्ण केलं. त्यानंतर दिल्ली विद्यापीठाच्या देशबंधू कॉलेजमधून बी.एस्सी केलं. पदवी पूर्ण केली.  रूपल विद्यापीठात टॉपर होती.

रुपलच्या आयुष्यात एक दुःखद वळण आलं, तिने तिच्या आईला गमावलं. तिचे वडील जसवीर राणा हे दिल्ली पोलिसात असिस्टंट सब-इन्स्पेक्टर (एएसआय) आहेत. त्यांनी रुपलला खूप आधार दिला. तिच्या भावांनी आणि बहिणींनीही तिला पाठिंबा दिला. रुपलने तिच्या अभ्यासावर लक्ष केंद्रित केलं आणि यश मिळवलं. 

रुपलला यश सहजासहजी मिळालेलं नाही. ती पहिल्या दोन वेळा यूपीएससी परीक्षेत नापास झाली. हार न मानता चुकांमधून शिकली. रुपलला तिच्या दृढनिश्चयाचं आणि कठोर परिश्रमाचं फळ मिळालं आणि तिने अखेर तिसऱ्या प्रयत्नात परीक्षा उत्तीर्ण केली. अशाप्रकारे तिने आयएएस अधिकारी होण्याचे स्वप्न पूर्ण केलं.

रुपल राणाची यशोगाथा जगभरातील लाखो विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी आहे. कौटुंबिक मूल्ये, समर्पण आणि योग्य वातावरण किती महत्त्वाचं आहे हे यातून दिसून येतं. वडिलांच्या सततच्या पाठिंब्यामुळे तिला यश मिळालं.
 

Web Title: success story of ias rupal rana policeman asi daughter who cleared civil services exam in 3rd attempt

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.