भारीच! शेतकऱ्याच्या लेकीची नेत्रदिपक कामगिरी, वयाच्या अवघ्या २४ व्या वर्षी झाली IAS अधिकारी
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2025 14:02 IST2025-01-30T14:01:14+5:302025-01-30T14:02:53+5:30
वयाच्या अवघ्या २४ व्या वर्षी यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण केली आहे. ईश्वर्या रामनाथन ही आयएएस अधिकारी झाली आहे.

भारीच! शेतकऱ्याच्या लेकीची नेत्रदिपक कामगिरी, वयाच्या अवघ्या २४ व्या वर्षी झाली IAS अधिकारी
यूपीएससी ही देशातील सर्वात कठीण परीक्षांपैकी एक मानली जाते. दरवर्षी लाखो तरुण या परीक्षेला बसतात पण काही मोजकेच तरुण यश मिळवू शकतात. याच दरम्यान शेतकऱ्याच्या लेकीने नेत्रदिपक कामगिरी केली आहे. वयाच्या अवघ्या २४ व्या वर्षी यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण केली आहे. ईश्वर्या रामनाथन ही आयएएस अधिकारी झाली आहे.
ईश्वर्याने वयाच्या अवघ्या २४ व्या वर्षी दोनदा यूपीएससी सिव्हिल सर्व्हिसेस परीक्षा उत्तीर्ण केली. ईश्वर्या रामनाथन ही भारतातील सर्वात तरुण आयएएस अधिकाऱ्यांपैकी एक आहे. २०१९ ची यूपीएससी परीक्षा ४७ व्या रँकने उत्तीर्ण केली. सध्या ती तामिळनाडूच्या तिरुवल्लूमध्ये सब कलेक्टर, एसडीएम म्हणून तैनात आहे.
तामिळनाडूच्या कुड्डालोर येथील रहिवासी असलेल्या ईश्वर्याने लहानपणापासूनच पूर, चक्रीवादळ आणि मुसळधार पाऊस यासारख्या अनेक नैसर्गिक आपत्ती पाहिल्या आहेत. विशेषतः २००४ च्या त्सुनामीचा तिच्यावर खोलवर परिणाम झाला.
ईश्वर्याला तिच्या आर्थिक परिस्थितीनेही प्रेरणा मिळाली. तिचे वडील आर.रामनाथन हे शेतकरी आहेत. मोठी स्वप्ने घेऊन, ईश्वर्याने २०१७ मध्ये चेन्नईतील अण्णा विद्यापीठातून डिग्री पूर्ण केली. कॉलेजच्या काळात यूपीएससी कोचिंग घेऊन नागरी सेवा परीक्षेची तयारी सुरू केली. पहिल्याच प्रयत्नात ऑल इंडिया ६३० रँक होता आणि तिची रेल्वेतील सेवेसाठी निवड झाली.
२०१९ मध्ये दुसऱ्या प्रयत्नात, ईश्वर्याने ऑल इंडिया ४७ व्या रँकह यूपीएससी परीक्षा यशस्वीरित्या उत्तीर्ण केली आणि आयएएस अधिकारी होण्याचं स्वप्न पूर्ण केलं. तिच्यापासून आता अनेकांना प्रेरणा मिळत आहे. ती सोशल मीडियावर एक्टिव्ह असून तिचे खूप फॉलोअर्स देखील आहेत.