शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरे म्हणाले, 'आता माझी सटकली, आता तुमची...' एकनाथ शिंदेंनी दिलं असं प्रत्युत्तर
2
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
3
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
4
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप
5
मोबाईलवर मुलांशी बोलते म्हणून ओरडला, १४ वर्षांच्या मुलीने कुऱ्हाडीने मोठ्या भावाचा गळा कापला  
6
निवडणूक ‘यांची’, प्रतिष्ठा पणाला ‘त्यांची’; मुलगी, मुलगा, बहीण, सुनेसाठी करावी लागतेय अपार मेहनत
7
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
8
कोव्हिशिल्डमुळेच आलाय श्रेयस तळपदेला हार्ट अटॅक?, अभिनेता म्हणाला - "लस घेतल्यानंतरच..."
9
अपोफिस लघुग्रहामुळे ‘दुसरे लोणार’ नाही; दा. कृ. सोमण यांची माहिती
10
राधाकृष्ण विखे आणि मल्लिकार्जुन खर्गेंमध्ये झाली गुप्त बैठक, प्रकाश आंबेडकरांचा सनसनाटी दावा
11
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
12
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते
13
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
14
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
15
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
16
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
17
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
18
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
19
"आई आणि बायकोच्या राड्यात...", कुशल बद्रिकेची 'ती' पोस्ट चर्चेत
20
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप

'अमित मालवीय यांना पदावरून हटवा', सुब्रमण्यम स्वामींचा भाजपा आयटी सेलविरोधात मोर्चा

By ऑनलाइन लोकमत | Published: September 09, 2020 8:12 PM

अमित मालवीय यांना आयटी सेलच्या प्रमुखपदावरून हटविण्यासाठी सुब्रमण्यम स्वामी यांनी एक दिवसाचा अल्टिमेटम दिला आहे. 

ठळक मुद्देसुब्रमण्यम स्वामी यांनी भाजपाच्या आयटी सेलवर हल्ला करण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वीही त्यांनी आयटी सेलवर टीका केली आहे.

नवी दिल्ली : भाजपाचे राज्यसभेचे खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी आपल्या पक्षाचे नेते आणि भाजपा आयटी सेलचे प्रमुख अमित मालवीय यांच्याविरोधात मोर्चा उघडला आहे. अमित मालवीय यांना आयटी सेलच्या प्रमुखपदावरून हटविण्यासाठी सुब्रमण्यम स्वामी यांनी एक दिवसाचा अल्टिमेटम दिला आहे. 

सुब्रमण्यम स्वामी यांनी बुधवारी ट्विटमध्ये लिहिले की, "उद्यापर्यंत आयटी सेल प्रमुख अमित मालवीय यांना हटवले नाही तर याचा अर्थ असा होईल की पार्टीला माझा बचाव करायचा नाही." सुब्रमण्यम स्वामी यांनी मंगळवारपासून अमित मालवीय यांच्याविरोधात मोर्चा उघडला आहे. बुधवारी सकाळी त्यांनी आपल्या ट्विटमध्ये असेही लिहिले की, "पार्टीमध्ये कोणताही मंच नाही आहे, ज्याठिकाणी कार्यकर्त्यांचे मत जाणून घेऊ शकेल. त्यामुळे मला माझा बचाव करावा लागेल."

सुब्रमण्यम स्वामी यांनी भाजपाच्या आयटी सेलवर हल्ला करण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वीही त्यांनी आयटी सेलवर टीका केली आहे. "भाजपाचा आयटी सेल निरुपयोगी झाला आहे. काही सदस्य बनावट आयडी बनवून माझ्यावर हल्लाबोल करत आहेत, जर माझे समर्थक असे करण्यास उतरले, तर मी त्यासाठी जबाबदार राहणार नाही. तसेच, माझ्यावर हल्लाबोल करण्यासाठी भाजपाला जबाबदार धरले जाऊ शकत नाही," असे सुब्रमण्यम स्वामी यांनी ट्विट केले होते.

'२०२४ आणि २०२९ मध्येही भाजपा जिंकणार'२०२४ आणि २०२९ च्या लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीमध्ये भाजपाची सत्ता येईल, असा दावा भाजपा खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी केला होता. सुब्रमण्यम स्वामी यांनी ट्विटरच्या माध्यमातून हा दावा करत यासाठी केंद्रातील मोदी सरकारला काही विशेष बदल करण्याचा सल्लाही त्यांनी दिला होता. सुब्रमण्यम स्वामी यांनी ट्विटमध्ये म्हटले होते की, "२०२४ आणि २०२९ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपा सत्तेत येईल. मात्र, भाजपाला जनादेशचा वापर ब्रिटिश राजशाहीने तयार केलेला भारतीय इतिहास सुधारण्यासाठी आणि येणाऱ्या पिढींमध्ये राष्ट्रवाद आणि हिंदुस्थानविषयी अभिमानाची भावना निर्माण करण्यासाठी केला पाहिजे." तसेच, शिक्षक दिनानिमित्त हा माझा संदेश आहे, असे सुब्रमण्यम स्वामी यांनी म्हटले होते.

आणखी बातम्या...

- महाविकास आघाडीला मराठा समाज माफ करणार नाही, विनायक मेटेंची टीका

- जम्मू-काश्मीरमध्ये आधीच लोकशाहीची हत्या झालीय, महबूबा मुफ्तींचा केंद्र सरकारवर निशाणा  

- "जलयुक्त शिवारमध्ये १० हजार कोटी रुपये बुडवणाऱ्या देवेंद्र फडणवीसांनी राजीनामा द्यावा"    

- सरकारी नोकरीची सुवर्णसंधी, ऑईल इंडिया लिमिटेडमध्ये निघाली भरती   

- मोदी सरकार IRCTC मधील हिस्सा विकण्याच्या तयारीत, दोन दिवसांत शेअर ७ टक्क्यांनी घसरला    

टॅग्स :Subramanian Swamyसुब्रहमण्यम स्वामीBJPभाजपा