भाजपाच्या आयटी सेलवर स्वामी बरसले; म्हणाले, 'बनावट अकाऊंट तयार करून माझ्यावर हल्लाबोल'

By ऑनलाइन लोकमत | Published: September 7, 2020 05:02 PM2020-09-07T17:02:19+5:302020-09-07T17:18:50+5:30

जर माझे समर्थक असे करण्यास सुरूवात करतील तर मी त्यासाठी जबाबदार राहणार नाही, असे सुब्रमण्यम स्वामी यांनी म्हटले आहे.

subramanian swamy attacks bjp it cell amit malviya twitter war | भाजपाच्या आयटी सेलवर स्वामी बरसले; म्हणाले, 'बनावट अकाऊंट तयार करून माझ्यावर हल्लाबोल'

भाजपाच्या आयटी सेलवर स्वामी बरसले; म्हणाले, 'बनावट अकाऊंट तयार करून माझ्यावर हल्लाबोल'

googlenewsNext
ठळक मुद्देअनेकदा विरोधी पक्षांनी अमित मालवीय यांच्यावर चुकीची व वादग्रस्त मोहिम चालविल्याचा आरोप करत भाजपाला घेराव घातला आहे.

नवी दिल्ली : भाजपाचे राज्यसभेचे खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी आपल्याच पार्टीच्या आयटी सेलवर निशाणा साधला आहे. भाजपाचे आयटी सेल बनावट अकाऊंट तयार करून माझ्यावर हल्लाबोल करीत आहे. जर माझे समर्थक असे करण्यास सुरूवात करतील तर मी त्यासाठी जबाबदार राहणार नाही, असे सुब्रमण्यम स्वामी यांनी म्हटले आहे.

यासंदर्भात सुब्रमण्यम स्वामी यांनी ट्विट केले आहे. "भाजपाचा आयटी सेल निरुपयोगी झाला आहे. काही सदस्य बनावट आयडी बनवून माझ्यावर हल्लाबोल करत आहेत, जर माझे समर्थक असे करण्यास उतरले, तर मी त्यासाठी जबाबदार राहणार नाही. तसेच, माझ्यावर हल्लाबोल करण्यासाठी भाजपाला जबाबदार धरले जाऊ शकत नाही."

सुब्रमण्यम स्वामी यांनी यावेळी भाजपा आयटी सेलचे प्रमुख अमित मालवीय यांना लक्ष्य केले. मी याकडे दुर्लक्ष करीत आहे पण भाजपाने त्यांना त्वरित हटविले पाहिजे, असे सुब्रमण्यम स्वामी यांनी म्हटले आहे. याशिवाय, मालवीय पात्र ही संपूर्ण गडबड करीत आहेत. आम्ही रावण किंवा दुशासन नव्हे तर मर्यादा पुरुषोत्तम रामाची पार्टी आहोत, असेही सुब्रमण्यम स्वामी यांनी लिहिले आहे.

दरम्यान, सुब्रमण्यम स्वामी असे एकमेव भाजपा खासदार आहेत, जे पार्टीत राहून अशी विधाने करतात. ज्यामुळे कधीकधी पार्टीसाठी अडचणीचा सामना करावा लागतो. मात्र, यावेळी त्यांनी अमित मालवीय यांच्या विरोधात मोर्चा वळविला आहे. ट्विटरवर अनेक समर्थकांना उत्तर देताना भाजपाचे अध्यक्ष जेपी नड्डा यांनी तातडीने आयटी सेलच्या प्रमुखपदावरून अमित मालवीय यांना हटवावे, असे सुब्रमण्यम स्वामी यांनी म्हटले आहे.

अनेकदा विरोधी पक्षांनी अमित मालवीय यांच्यावर चुकीची व वादग्रस्त मोहिम चालविल्याचा आरोप करत भाजपाला घेराव घातला आहे. मात्र, या संपूर्ण वादावरुन भाजपाकडून अद्याप कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आलेली नसली, तरी आता पक्षांतर्गतच मोर्चा उघडण्यात आला आहे.

आणखी बातम्या...

"माझी ताकद काय आहे, ते १०५ आमदार असूनही विरोधी पक्षात बसलेल्यांना विचारा!"    

- दाऊदचा हस्तक बोलतोय, उद्धव ठाकरेंशी बोलायचंय; 'मातोश्री'वर दुबईहून फोन    

- दिपेश सावंतच्या अटकेप्रकरणी 'एनसीबी' अडचणीत, कोर्टाने मागितले उत्तर    

- सहा सरकारी बँकाच्या खासगीकरणावर भाजपाचा डोळा, राष्ट्रवादीच्या नेत्याचा आरोप    

राष्ट्रवादीला काँग्रेसमध्ये विलीन करा अन् शरद पवारांना अध्यक्ष बनवा; रामदास आठवलेंची सूचना    

- 'ना भूले हैं, ना भूलने देंगे'; सुशांतच्या मृत्यूवरून राजकारण, भाजपाने छापले स्टिकर्स    

- "२०२४ आणि २०२९ मध्येही भाजपा जिंकणार", सुब्रमण्यम स्वामींचा मोदी सरकारला सल्ला     

मुंबईत येतेय, कोणाच्या बापात हिंमत असेल तर थांबवा; कंगनाचे खुले आव्हान

Web Title: subramanian swamy attacks bjp it cell amit malviya twitter war

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.