"२०२४ आणि २०२९ मध्येही भाजपा जिंकणार", सुब्रमण्यम स्वामींचा मोदी सरकारला सल्ला 

By ऑनलाइन लोकमत | Published: September 5, 2020 04:24 PM2020-09-05T16:24:35+5:302020-09-05T16:26:44+5:30

सुब्रमण्यम स्वामी यांनी ट्विटरच्या माध्यमातून हा दावा केला असून यासाठी केंद्रातील मोदी सरकारला काही विशेष बदल करण्याचा सल्लाही त्यांनी दिला आहे.

bjp mp subramanian swamy claim bjp will be voted in 2024 and 2029 lok sabha election message for teachers day | "२०२४ आणि २०२९ मध्येही भाजपा जिंकणार", सुब्रमण्यम स्वामींचा मोदी सरकारला सल्ला 

"२०२४ आणि २०२९ मध्येही भाजपा जिंकणार", सुब्रमण्यम स्वामींचा मोदी सरकारला सल्ला 

Next
ठळक मुद्देभाजपाचे नेते सुब्रमण्यम स्वामी हे नेहमीच हिंदूंच्या अधिकाराविषयी बोलत असतात. याआधी हिंदुत्वासाठी युद्ध १६ मे २०१४ पासून सुरू झाले, असे सुब्रमण्यम स्वामी यांनी म्हटले होते.

नवी दिल्ली : २०२४ आणि २०२९ च्या लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीमध्ये भाजपाची सत्ता येईल, असा दावा भाजपा खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी केला आहे. सुब्रमण्यम स्वामी यांनी ट्विटरच्या माध्यमातून हा दावा केला असून यासाठी केंद्रातील मोदी सरकारला काही विशेष बदल करण्याचा सल्लाही त्यांनी दिला आहे. 

सुब्रमण्यम स्वामी यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की, "२०२४ आणि २०२९ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपा सत्तेत येईल. मात्र, भाजपाला जनादेशचा वापर ब्रिटिश राजशाहीने तयार केलेला भारतीय इतिहास सुधारण्यासाठी आणि येणाऱ्या पिढींमध्ये राष्ट्रवाद आणि हिंदुस्थानविषयी अभिमानाची भावना निर्माण करण्यासाठी केला पाहिजे." तसेच, शिक्षक दिनानिमित्त हा माझा संदेश आहे, असे सुब्रमण्यम स्वामी यांनी म्हटले आहे.

गेल्या काही दिवसांपूर्वी सुब्रमण्यम स्वामी यांनी एका निवेदनात म्हटले होते की, "एखाद्या देशाचा इतिहास त्याबद्दलच्या विदेशी तपशीलांवर आधारित असू शकत नाही आणि भारतीय लोकांसाठी पौराणिक सूत्रांना गांभीर्याने घेण्याची वेळ आली आहे. भारतीयांद्वारे घेतलेला भारताचा इतिहास आत्मसात करा." सुब्रमण्यम स्वामींच्या म्हणण्यानुसार, हिंदुस्थान हा राज्यकारभाराची कला, दरबारीची शैली, युद्धाच्या पद्धती, शेती आधार देखभाल व माहितीचा प्रसार यामध्ये वैचारिकदृष्ट्या एक होता.

दरम्यान, भाजपाचे नेते सुब्रमण्यम स्वामी हे नेहमीच हिंदूंच्या अधिकाराविषयी बोलत असतात. याआधी हिंदुत्वासाठी युद्ध १६ मे २०१४ पासून सुरू झाले, असे सुब्रमण्यम स्वामी यांनी म्हटले होते. दरम्यान, १६ मे २०१४ ला पहिल्यांदा काँग्रेसला पराभूत करून केंद्रात नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वात भाजपाचे सरकार स्थापन करण्यात आले."ब्रिटीश साम्राज्यवादापासून भारताच्या स्वातंत्र्याचे पहिले युद्ध १८५७ मध्ये झाले. २१ ऑक्टोबर १९४३ रोजी दुसरे युद्ध झाले. देशातील छुप्या पश्चिमीकरणापासून स्वातंत्र्याचे तिसरे युद्ध १५ ऑगस्ट १९४७ रोजी सुरु झाले आणि १६ मे २०१४ रोजी हिंदुत्वासाठी युद्ध सुरू झाले", असे ट्विट सुब्रमण्यम स्वामी यांनी केले होते.

आणखी बातम्या...

- BSNL कंपनी २० हजार कर्मचाऱ्यांची कपात करणार, खर्चात काटकसर करण्याचे आदेश

- एकतर ती संस्कारानेच कृतघ्न किंवा मानसिक संतुलन ढासळलेले; धनंजय मुंडेंची कंगनाला चपराक    

-'...अन्यथा कंगनाच्या सिनेमाचे सेट जाळून टाकू', करणी सेनेचा इशारा

- कंगनाने मुंबईला शहाणपण शिकवण्याची गरज नाही; भाजपाचा 'यू-टर्न'

मुंबईत येतेय, कोणाच्या बापात हिंमत असेल तर थांबवा; कंगनाचे खुले आव्हान

पोकळ धमक्या देत नाही, अ‍ॅक्शन घेतो; संजय राऊतांचा कंगना राणौतवर हल्लाबोल     

Web Title: bjp mp subramanian swamy claim bjp will be voted in 2024 and 2029 lok sabha election message for teachers day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.