शहरं
Join us  
Trending Stories
1
१५ मिनिटाच्या अंतरासाठी ५-६ तास कोंडीत; प्रवाशांचे अताेनात हाल, विदारक स्थितीत मुंबईकर अडकले
2
ठाकरेंच्या खेळीनं विधानपरिषद निवडणुकीत ट्विस्ट; काँग्रेस देणार उमेदवार, दोन्ही NCP साधणार डाव?
3
बंगालची ‘ममता’ कमळावर, तामिळनाडूवर द्रमुकचीच सत्ता; एक्झिट पोलचा अंदाज, ४ मे रोजी मतमोजणी
4
"हे खूप भयंकर आहे.... कृपया मदत करा"; अभिनेत्री सोनाली कुलकर्णीही पाच तास कोंडीत
5
IPL 2026 : MI चा संघर्ष संपता संपेना! तरीही स्वबळावर Playoffs ची आशा जिवंत; जाणून घ्या समीकरण
6
२ वर्षांचं प्रेम, लग्नाला प्रेयसीच्या आईचा विरोध; संतापलेल्या प्रियकरानं दोघांना संपवलं, मग...
7
‘apk’ फाइलचे देशभरातील सर्व्हर मुंबई पोलिसांनी केले ‘शटडाउन’; १० वी नापास आरोपी निघाले मास्टरमाइंड
8
मुंबईतील दहशतवादी हल्लाप्रकरणी अन्सारीला हायकोर्टाचा दिलासा नाही; पोलिस क्लिअरन्सची मागणी फेटाळली
9
"अवघ्या दहा फुटांवर होता मृत्यू आणि मी जिवंत परत आलो...; विकासाच्या नावाखाली जातोय बळी" 
10
ठेकेदाराच्या निष्काळजीपणाने चव्हाण कुटुंबाचा 'आधार' गेला; क्रेन पडून पोलिसाचा मृत्यू
11
Ryan Rickelton Record : MI कडून जे रोहित-सचिनलाही जमलं नाही, ते रिकल्टननं करून दाखवलं!
12
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
13
कोण आहे Allah Ghazanfar? अभिषेक शर्माचं वादळ रोखत ईशान किशनला गोल्डन डकवर धाडलं तंबूत!
14
MI vs SRH : वानखेडेवर Ryan Rickelton ची विक्रमी सेंच्युरी! तिलक वर्मासह जयसूर्याचा विक्रम मोडला
15
'No more Mr. Nice Guy', बंदुकीसह फोटो पोस्ट करत डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला पुन्हा धमकी
16
आसाममध्ये भाजपा हॅटट्रिक करणार, काँग्रेस वनवास अद्यापही कायम; Exit Pollचे कल काय सांगतात?
17
“छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी मान्य आहे का? एकनाथ शिंदे गप्प का?”: हर्षवर्धन सपकाळ
18
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
19
AI VS Humans : एआय की माणूस, कोण स्वस्त? दिग्गज टेक कंपनी NVIDIA सगळंच सांगितलं!
20
‘ही’ आहे पाकिस्तानची हायस्पीड ट्रेन, किती वेगाने जाते? वंदे भारत ट्रेनला देते का टक्कर? पाहा
Daily Top 2Weekly Top 5

पाणी चोरीप्रकरणी उपअभियंता राठोड यास जामीन

By admin | Updated: August 20, 2015 22:09 IST

सोलापूर : महापालिकेच्या उजनी जलवाहिनीवरील पाणी चोरीप्रकरणात सहकार्य केल्याप्रकरणी टेंभुर्णी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असलेल्या पाणीपुरवठा विभागातील उपअभियंता विजयकुमार राठोड (वय 47, रा. प्रतापनगर, सोलापूर) यास पोलीस तपासकामी मदत करण्याच्या अटीवर जिल्हा व सत्र न्यायाधीश व्ही. बी. कंकणवाडी यांनी अटकपूर्व जामीन मंजूर केला.

सोलापूर : महापालिकेच्या उजनी जलवाहिनीवरील पाणी चोरीप्रकरणात सहकार्य केल्याप्रकरणी टेंभुर्णी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असलेल्या पाणीपुरवठा विभागातील उपअभियंता विजयकुमार राठोड (वय 47, रा. प्रतापनगर, सोलापूर) यास पोलीस तपासकामी मदत करण्याच्या अटीवर जिल्हा व सत्र न्यायाधीश व्ही. बी. कंकणवाडी यांनी अटकपूर्व जामीन मंजूर केला.
उजनी जलवाहिनीवरून पाणी चोरी होत असल्याची माहिती मिळाल्यावर आयुक्त विजयकुमार काळम-पाटील यांनी शोध मोहीम राबविली. यात महापालिकेत काम करणारा मजूर किसन कापसे व चालक ज्योतीबा काकडे या दोघांनी संगनमत करून शेतकर्‍यांना कनेक्शन दिल्याचे उघड झाले. याप्रकरणी त्या दोघा कर्मचार्‍यांसह 26 शेतकर्‍यांवर टेंभुर्णी व मोहोळ पोलीस ठाण्यात पाणीचोरीचे गुन्हे दाखल करण्यात आले. अटक केलेल्या काकडे व कापसे यांच्या जबाबात पाणी चोरीप्रकरणात उपअभियंता राठोड यांचे सहकार्य असल्याची माहिती दिल्यावर त्यांचेही नाव गुन्हय़ात समाविष्ट करण्यात आले.
या प्रकरणात अटक होईल या भीतीपोटी उपअभियंता राठोड यांनी अँड. शशी कुलकर्णी, अँड. प्रशांत नवगिरे, अँड. गुरुदत्त बोरगावकर, अँड. देवदत्त बोरगावकर, अँड. स्वप्नील सरवदे यांच्यामार्फत अटकपूर्व जामिनासाठी न्यायालयात धाव घेतली. पाणी चोरीप्रकरण उघडकीस आणण्यास राठोड यांनीच मदत केली आहे. केवळ राजकीय दबावापोटी त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. ते सरकारी अधिकारी असल्याने कोठेही पळून जाणार नाहीत असा युक्तिवाद केला. सरकारतर्फे जिल्हा सरकारी वकील प्रवीण शेंडे यांनी काम पाहिले.