शहरं
Join us  
Trending Stories
1
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
2
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
3
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
4
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
5
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
6
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
7
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
8
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
9
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
10
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
11
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
12
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
13
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
14
Travel : निसर्गाची मुक्त हस्ताने उधळण! भारताच्या 'या' ४ सुंदर ठिकाणांपुढे स्वित्झर्लंडही पडेल फिके
15
चेहऱ्यावर मास्क, खांद्यावर बंदूक...; भारतात येणाऱ्या जहाजावर इराणी कमांडोंनी कसा केला कब्जा? बघा भरसमुद्रातला थरारक VIDEO
16
पुणेकर...! म्हाडाची २९५ घरे घेणार का ? प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य... कुठे, कुठे आहेत...
17
डोनाल्ड ट्रम्प यांच्या ‘हेलहोल’ टिप्पणीवर भारताची सावध भूमिका; परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले...
18
हर्षवर्धन सपकाळ मातोश्रीवर गेले, उद्धव ठाकरे यांची भेट घेतली; कोणत्या विषयावर काय चर्चा झाली?
19
काळाचा घाला! उत्तराखंडच्या चंबा-कोटी रोडवर भीषण अपघात; बस दरीत कोसळून ८ जणांचा मृत्यू
20
कर्नाटक सरकारचे मराठी संपवण्याचे षडयंत्र! १० वीच्या निकालातून 'मराठी' शब्द गायब; सीमाभागात संताप
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रगीतासाठी सक्तीने उभे करणे हा न्यायालयाचा मूर्खपणा!

By admin | Updated: December 28, 2016 02:41 IST

‘चित्रपटगृहांमध्ये प्रत्येक खेळाच्या आधी राष्ट्रगीत वाजविले जावे आणि त्या वेळी प्रत्येकाने आदराने उभे राहावे, अशी सक्ती करणारा सर्वोच्च न्यायालयाने दिलेला

नवी दिल्ली : ‘चित्रपटगृहांमध्ये प्रत्येक खेळाच्या आधी राष्ट्रगीत वाजविले जावे आणि त्या वेळी प्रत्येकाने आदराने उभे राहावे, अशी सक्ती करणारा सर्वोच्च न्यायालयाने दिलेला आदेश हा मूर्खपणा आहे व ही न्यायालयाने आपले अधिकारक्षेत्र सोडून केलेली ढवळाढवळ आहे,’ अशी टीका ख्यातनाम इतिहासतज्ज्ञ एमजीएस नारायणन यांनी केली आहे.‘मातृभूमी’ या साप्ताहिकास दिलेल्या मुलाखतीत नारायणन म्हणाले की, ‘खरे तर न्यायालयाच्या या आदेशावर टीका करण्याची गरजही नाही. कारण लोकांच्या मनात राष्ट्रभावना नसेल, तर ते हा आदेश पाळणार नाहीत व तो निरर्थक ठरेल हे उघड आहे.’ ते म्हणाले की, ‘लोक चित्रपटगृहांमध्ये मनोरंजनासाठी येतात. तेथे त्यांना राष्ट्रप्रेमाचे डोस बळजबरीने पाजण्याची गरज नाही.’प्राचीन भारतीय इतिहासाचे तज्ज्ञ असलेले नारायणन भारतीय इतिहास संशोधन परिषद या केंद्र सरकारच्या अखत्यारितील संस्थेचे अध्यक्ष होते व राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या या आधीच्या सरकारने त्यांची नेमणूक केली होती.नारायणन म्हणाले की, भारत हे इतिहासात कधी एका विचाराने बांधलेले राष्ट्र होते, असे निदान मी तरी मानत नाही. फार तर आपण भारताला अठरापगड राष्ट्रीयत्वांचा महासंघ, असे म्हणू शकू.राष्ट्रीयता आणि राष्ट्रभक्तीच्या सक्तीचे असे होणारे प्रयत्न हे मूठभरांच्या हुकूमशाहीचे द्योतक आहे व लोकशाहीच्या विरोधी आहे, असेही ते म्हणाले.त्यांचे असेही म्हणणे होते की, भारतीय राज्यघटनेच्या अनुच्छेद ५१(१) मधील भाषा पाहिली, तर देश आणि राष्ट्रीय प्रतीके यांच्याविषयीचा आदर न्यायालयीन सक्तीने निर्माण केला जाऊ शकत नाही, हे स्पष्ट होईल. स्वत: सर्वोच्च न्यायालयासही याचे भान आहे व म्हणूनच ‘जेओव्हाज विटनेस’ या ख्रिश्चन समाजातील मुलांना शाळेत राष्ट्रगीत म्हणण्याच्या सक्तीच्या विरोधात न्यायालयाने १९८६ मध्ये निकाल दिला होता. एवढेच नव्हे, तर आपली संस्कृती आणि धार्मिक तत्त्वज्ञान आपल्याला सहिष्णुततेची शिकवण देते, हेही न्यायालयोन त्या निकालात अधोरेखित केले होते. (लोकमत न्यूज नेटवर्क)मुळात लोकांच्या मनात राष्ट्रीयत्वाची भावना असेल, तर राष्ट्रगीताला अर्थ आहे. तसे असेल तर राष्ट्रगीताविषयी आदरही आपोआप व्यक्त होईल. राष्ट्रीयत्वाची भावना बळजबरीने निर्माण केली जाऊ शकत नाही. असे सक्तीचे प्रयत्न झाले, तर त्याचा उलटा परिणाम होईल.- एमजीएस नारायणन, प्राचीन भारतीय इतिहासाचे तज्ज्ञ