विद्यार्थ्यांचे करियर दीर्घकाळ टांगणीवर ठेवले जाऊ शकत नाही
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 18, 2020 06:54 IST2020-08-18T03:16:06+5:302020-08-18T06:54:53+5:30
विद्यार्थ्यांनाच विचारत न्यायमूर्ती म्हणाले की, परिस्थिती अडचणीची असली तरी जीवन व्यवहार ठप्प राहू शकत नाहीत. योग्य काळजी घेऊन ते चालूच ठेवावे लागतात.

विद्यार्थ्यांचे करियर दीर्घकाळ टांगणीवर ठेवले जाऊ शकत नाही
नवी दिल्ली : महत्त्वाच्या परीक्षा वारंवार पुढे ढकलून विद्यार्थ्यांचे करियर दीर्घकाळ टांगणीवर ठेवले जाऊ शकत नाही, असे मत सुप्रीम कोर्टाने व्यक्त केले. जेईई, नीट आणि जेईई अॅडव्हान्स या प्रवेश परीक्षा पुढे ढकलाव्यात अशी याचिका ११ विद्यार्थ्यांनी केली होती. ती फेटाळताना कोर्टाने हे मत नोंदवले. न्या. अरुण मिश्रा, न्या. भूषण गवई व न्या. कृष्ण मुरारी यांच्या खंडपीठाने म्हटले की, महत्त्वाच्या परीक्षा वारंवार पुढे ढकलून विद्यार्थ्यांचे करियर टांगणीवर ठेवले जाऊ शकत नाही. वर्ष वाया घालवायची तुमची तरी तयारी आहे का, असे याचिकाकर्त्या विद्यार्थ्यांनाच विचारत न्यायमूर्ती म्हणाले की, परिस्थिती अडचणीची असली तरी जीवन व्यवहार ठप्प राहू शकत नाहीत. योग्य काळजी घेऊन ते चालूच ठेवावे लागतात.