धक्कादायक! हेडफोन लावून रेल्वे रुळावर बसणं ठरलं जीवघेणं; विद्यार्थ्याचा मृत्यू, काय घडलं?
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 31, 2024 11:03 IST2024-10-31T10:57:28+5:302024-10-31T11:03:09+5:30
हेडफोन लावून रेल्वे रुळावर बसल्याने एका विद्यार्थ्याने जीव गमावला आहे.

धक्कादायक! हेडफोन लावून रेल्वे रुळावर बसणं ठरलं जीवघेणं; विद्यार्थ्याचा मृत्यू, काय घडलं?
मध्य प्रदेशची राजधानी भोपाळमध्ये हेडफोन लावून रेल्वे रुळावर बसल्याने एका विद्यार्थ्याने जीव गमावला आहे. ट्रेनच्या धडकेत त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. हबीबगंज-इटारसी ट्रॅकवर ही घटना घडली. २० वर्षीय बीबीएचा विद्यार्थी मानराज तोमर याचा ट्रेनच्या धडकेने मृत्यू झाला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मानराज हा त्याच्या मित्रासोबत दानापाणी परिसरात रेल्वे ट्रॅकवर बसला होता. दोन्ही मित्र वेगवेगळ्या रुळांवर बसून मोबाईल बघत होते. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
मानराजनेही हेडफोन लावले होते. याच दरम्यान तो ज्या ट्रॅकवर बसला होता, तिथे एक ट्रेन आली. मात्र मोबाईलमध्ये मग्न असलेल्या दोन्ही मित्रांनी ट्रेनकडे लक्ष दिलं नाही आणि मानराजला ट्रेनची धडक बसली.
मानराज हा शहरातील एका खासगी महाविद्यालयातून बीबीएचे शिक्षण घेत होता. मानराजला बॉडी बिल्डिंग आणि रील बनवण्याची आवड होती. शवविच्छेदनानंतर मृतदेह कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात आला आहे. मानराज हा त्याच्या आई-वडिलांचा एकुलता एक मुलगा होता