शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
2
आजचे राशीभविष्य, १४ एप्रिल २०२६: कामात यश मिळेल, घरात सुख-शांती नांदेल, नशिबाची साथ मिळेल.
3
उद्यापासून उष्णतेच्या लाटेचा तडाखा, अकोला @ ४३.८
4
यंदा कसा असेल पाऊस? हवामान खात्याने मान्सूनबाबत दिली चिंता वाढवणारी माहिती
5
बिहारमध्ये नवीन सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग, उद्या शपथविधी सोहळा होण्याची शक्यता
6
पूर्ववैमनस्यातून पत्नीच्या डोळ्यांसमोर दादरमध्ये तरुणाची निर्घृण हत्या
7
९ महिने तपास रखडवला, मुलीचा सांगाडाच हाती; २८ पोलीस निलंबित
8
अवैध प्रवासी वाहतूक बेतली जिवावर, ११ जणांचा मृत्यू, कल्याण-मुरबाड महामार्गावर नेमका कसा घडला अपघात?
9
मतदारसंघ पुनर्रचना अत्यंत धोकादायक अन् संविधानावर हल्ला, सोनिया गांधींची टीका
10
नाकाबंदी : इराणची आर्थिक कोंडी करणारी व्यूहरचना
11
अमेरिकेकडून होर्मुझची नाकाबंदी सुरू; समुद्रात गस्त वाढवली, युद्ध भडकणार
12
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
13
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
14
"मी साडी नेसलेली होती, त्यात अश्लीलता कुठे होती?", ती तरुणी ढसाढसा रडली, ट्रोलिंगनंतर 'धक-धक' गर्ल काय म्हणाली?
15
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
16
Praful Hinge नं सांगून पहिल्याच बॉलवर काढली Vaibhav Suryavanshi ची विकेट; मॅचनंतर म्हणाला...
17
बालमैत्रिणीसाठी आशाताई दोनदा आल्या गडहिंग्लजला! महिला बँकेचे उद्घाटन, महाविद्यालयाच्या मदतीसाठी विनामूल्य कार्यक्रम 
18
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
19
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
20
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

केरळमध्ये दहशतवादाचे क्लासेस सुरु असल्याची धक्कादायक माहिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 30, 2016 17:54 IST

केरळमध्ये दहशतवादाचे क्लासेस सुरु असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. दाईश या दहशतवादी संघटनेने अशा प्रकारचे क्लासेस चालू केल्याचे उघड झाले आहे.

ऑनलाइन लोकमत
केरळ, दि. ३० - केरळमध्ये दहशतवादाचे क्लासेस सुरु असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. दाईश या दहशतवादी संघटनेने अशा प्रकारचे क्लासेस चालू केल्याचे उघड झाले आहे.
दिल्ली विमानतळावरुन २ ऑगस्ट रोजी काबूलला जाणा-या यास्मीन अहमद या शिक्षिकेला पोलिसांनी अटक केली असून तिची चौकशी करताना तिने यासंदर्भात माहिती दिली आहे. 
राष्ट्रीय सुरक्षा यंत्रणेसमोर पाकिस्तानी दहशतवादी संघटनांपेक्षा दाईश या दहशतवादी संघटनेचा मोठा धोका आहे.  भारतातून पळून गेलेला अब्दुल राशिद याने दाईश या दहशतवादी संघटनेत ४० तरुणांना भरती होण्यासाठी  काही तत्वे शिकविली आहेत. तसेच, त्यांच्यावर दहशतवादी संघटनेत सामील होण्यासाठी प्रभाव टाकला आहे. मुंबईतील पदवीधर अशफाक अब्दुल माजिद याला दाईश दहशतवादी संघटनेत सामील होण्यासाठी अब्दुल राशिद यानेच प्रभावित केल्याचे सांगण्यात येत आहे. अशफाक अब्दुल माजिद २ जूनला भारत सोडून गेला आहे. 
यास्मीन अहमद ही मुळची बिहारची असून तीन वर्षापूर्वी केरळला आली होती. केरळमधील मलाप्पुरम येथील पीस इंटरनॅशनल स्कूलमध्ये शिक्षिका असताना तिची भेट अब्दुल राशिदशी झाली, असे एनआयएच्या एका अधिका-यांने सांगितले. 
दिल्लीत २ ऑगस्टला यास्मीनला केरळच्या विशेष पोलीस पथकाने अटक केली. त्यानंतर तिची चौकशी करतांना तिने केरळमध्ये दहशतवादाचे क्लासेस सुरु असून ४० जणांवर दहशवादी संघटनेत सामील होण्याचा प्रभाव पडल्याची माहितीही यावेळी दिली.