सेना-नौदल-वायुसेनेची ताकद वाढणार; ₹79,000 कोटींच्या संरक्षण खरेदीला केंद्राची मंजुरी
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 29, 2025 17:26 IST2025-12-29T17:25:24+5:302025-12-29T17:26:29+5:30
केंद्राच्या या निर्णयानंतर लष्करी आधुनिकीकरणाला गती मिळणार आहे.

सेना-नौदल-वायुसेनेची ताकद वाढणार; ₹79,000 कोटींच्या संरक्षण खरेदीला केंद्राची मंजुरी
नवी दिल्ली : संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी(दि.29) झालेल्या संरक्षण अधिग्रहण परिषद (DAC) बैठकीत तिन्ही सशस्त्र दलांशी संबंधित सुमारे ₹79,000 कोटींच्या संरक्षण खरेदी प्रस्तावांना ‘मंजुरी’ देण्यात आली.
भारतीय सेनेसाठी अत्याधुनिक शस्त्रसज्जता
बैठकीत भारतीय सेनेसाठी पुढील संरक्षण प्रणालींच्या खरेदीला मंजुरी देण्यात आली:
लॉइटर म्यूनिशन सिस्टम
लो लेव्हल लाइट वेट रडार
पिनाका मल्टीपल लॉन्च रॉकेट सिस्टमसाठी लॉन्ग रेंज गाइडेड रॉकेट
इंटीग्रेटेड ड्रोन डिटेक्शन अँड इंटरडिक्शन सिस्टम (मार्क-II)
लॉइटर म्यूनिशन प्रणालीमुळे शत्रूच्या ठिकाणांवर अत्यंत अचूक हल्ले करता येणार आहेत. लो लेव्हल रडारमुळे कमी उंचीवर उडणाऱ्या ड्रोनची ओळख व निगराणी अधिक प्रभावी होईल. पिनाका रॉकेटसाठीच्या नवीन गाइडेड रॉकेटमुळे त्याची मारक क्षमता व अचूकता वाढणार असून, ड्रोन डिटेक्शन सिस्टममुळे लष्कराच्या महत्त्वाच्या ठिकाणांची सुरक्षा अधिक मजबूत होणार आहे.
The Defence Acquisition Council (DAC) meeting held today accorded Acceptance of Necessity (AoN) for various proposals of the three Services amounting to a total of about Rs 79,000 crore.
— Rajnath Singh (@rajnathsingh) December 29, 2025
The MoD under the leadership of PM Shri @narendramodi is working tirelessly to strengthen…
नौदलाच्या सागरी सामर्थ्यात वाढ
भारतीय नौसेना साठी पुढील प्रस्तावांना मंजुरी देण्यात आली आहे:
बोलार्ड पुल टग्स
हाय फ्रिक्वेन्सी सॉफ्टवेअर डिफाइंड रेडिओ (मॅनपॅक)
हाय एल्टिट्यूड लॉन्ग रेंज रिमोटली पायलटेड एअरक्राफ्ट सिस्टम (HALE ड्रोन) – लीजवर
बोलार्ड पुल टग्समुळे युद्धनौका आणि पाणबुड्यांचे बंदरांमधील सुरक्षित संचालन सुलभ होईल. हाय फ्रिक्वेन्सी रेडिओमुळे दीर्घ पल्ल्याचे सुरक्षित दळणवळण शक्य होणार आहे. HALE ड्रोनमुळे हिंद महासागर क्षेत्रात सातत्यपूर्ण देखरेख ठेवता येणार असून सागरी सुरक्षेला मोठी चालना मिळेल.
वायुसेनेसाठी हायटेक प्रणाली
भारतीय वायुसेना साठी खालील संरक्षण प्रणालींच्या खरेदीला मंजुरी देण्यात आली:
ऑटोमॅटिक टेक-ऑफ व लँडिंग रेकॉर्डिंग सिस्टम
अस्त्र Mk-II क्षेपणास्त्र
तेजस लढाऊ विमानासाठी फुल मिशन सिम्युलेटर
SPICE-1000 लॉन्ग रेंज गाइडन्स किट
या प्रणालींमुळे उड्डाण सुरक्षेत सुधारणा होणार आहे. अस्त्र Mk-II क्षेपणास्त्राच्या वाढीव मारक क्षमतेमुळे शत्रूच्या विमानांवर दूरवरूनच अचूक मारा शक्य होईल. तेजससाठीचा सिम्युलेटर पायलट प्रशिक्षण अधिक सुरक्षित व किफायतशीर करेल, तर SPICE-1000 किटमुळे वायुसेनेची अचूक आणि दीर्घ पल्ल्याच्या हल्ल्याची क्षमता अधिक बळकट होईल.
लष्करी आधुनिकीकरणाला वेग
या निर्णयांमुळे भारताच्या तिन्ही सशस्त्र दलांची रणनैतिक क्षमता, तांत्रिक सामर्थ्य आणि सुरक्षा सज्जता अधिक मजबूत होणार असून, बदलत्या जागतिक सुरक्षा परिस्थितीत भारत अधिक सक्षमपणे उभा राहील, असा विश्वास संरक्षण मंत्रालयाने व्यक्त केला आहे.