ग्रामपंचायतीच्या कार्यालयातून येत होते चित्रविचित्र आवाज, ग्रामस्थ डोकावले तेव्हा दिसलं असं काही...
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2025 15:46 IST2025-02-17T15:45:51+5:302025-02-17T15:46:14+5:30
Jharkhand Gram Panchayat News: झारखंडमधील धनबाद जिल्ह्यातील एग्यारकुंड दक्षिण ग्रामपंचायतीच्या कचेरीमधून एक धक्कादायक प्रकाक समोर आला आहे. येथे अश्लील चाळे करत असलेल्या प्रेमी युगुलाला ग्रामस्थांनी रंगेहात पकडले.

ग्रामपंचायतीच्या कार्यालयातून येत होते चित्रविचित्र आवाज, ग्रामस्थ डोकावले तेव्हा दिसलं असं काही...
झारखंडमधील धनबाद जिल्ह्यातील एग्यारकुंड दक्षिण ग्रामपंचायतीच्या कचेरीमधून एक धक्कादायक प्रकाक समोर आला आहे. येथे अश्लील चाळे करत असलेल्या प्रेमी युगुलाला ग्रामस्थांनी रंगेहात पकडले. मिळालेल्या माहितीनुसार ग्रामपंचायतीच्या कार्यालयातून चित्रविचित्र आवाज येत होते. याची कुणकुण लागल्यानंतर ही माहिती गावभर पसरली आणि ग्रामपंचायतीच्या कार्यालयाबाहेर गावकऱ्यांनी गर्दी केली.
या प्रकाराबाबत स्थानिक लोकप्रतिनिधींनी माहिती देताना सांगितले की, हे प्रेमी युगुल एकमेकांचे नातेवाईक आहे. यातील प्रियकर प्रेयसीला ग्रामपंचायतील घेऊन येत असे. या प्रकाराला ग्रामस्थांनी आधीही विरोध केला होता. मात्र असं असलं तरी हा प्रकार थांबला नव्हता. दरम्यान, रविवारी दुपारी प्रियकर प्रेयसीला घेऊन ग्रामपंचायतीच्या कार्यालयात आला. त्यानंतर त्याने कार्यालयाला टाळं लावून आतून कुलूप लावं. त्यानंतर कार्यालयातून आवाज येऊ लागले होते.
हे आवाज ऐकून ग्रामस्थांनी ग्रामपंचायतीच्या कार्यालयाजवळ धाव घेतली. ग्रामस्थांनी या प्रकाराची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत खूप प्रयत्नानंतर पोलिसांनी या जोडप्याला ग्रामपंचायतीच्या कार्यालयातून बाहेर काढले. दरम्यान, सार्वजनिक ठिकाणी अशा प्रकारचं कृत्य केल्याने त्यांच्याविरोधात कारवाई करण्यात यावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
दरम्यान, गावचे सरपंच अजय राम यांनी सांगितले की, जर ग्रामपंचायतीच्या कार्यालयात कर्मचारी नियमितपणे बसले असते तर असा प्रकार घडला नसता. कार्यालयात कर्मचाऱ्यांना बसवण्याबाबत मी अधिकाऱ्यांकडे तक्रारही केली आहे. मात्र असं असलं तरी विभागाने त्याबाबत कुठलाही पुढाकार घेतलेला नाही, अशी तक्रार त्यांनी केली.