शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
6
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
7
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
8
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
9
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
10
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
11
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
12
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
13
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
14
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
15
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
16
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
17
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
18
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
19
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
20
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
Daily Top 2Weekly Top 5

दिल्लीत अडकलेला 'तो' चिमुकला एकटाच बंगळुरुत पोहचला, ३ महिन्यानंतर आईला बिलगला

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 25, 2020 21:30 IST

आपल्या हातात 'स्पेशल कॅटेगरी' असा बोर्ड घेऊन तो विमानतळावर चालत होता, त्यावेळी तब्बल दोन महिन्यानंतर त्याच्या आईने त्याला अलगद कवेत घेतले

नवी दिल्ली - लॉकडाऊनमुळे राजधानी दिल्लीत गेल्या २ महिन्यांपासून अडकून पडलेल्या ५ वर्षीय चिमुकल्याने अखेर आपल्या घराकडे प्रस्थान केले. बंगळुरु विमानतळाववर या चिमुकल्या विहान (शर्मा) चं स्वागत करण्यात आलं. येथील केम्पेगौडा विमानतळावर सर्वच प्रवाशांची खबरदारी घेत घरवापसी होत आहे. या विमानतळावर पिवळ्या रंगाचं जॅकेट आणि तोंडावर मास्क घातलेल्या विहानचे आगमन झाले. त्यावेळी, आपल्या चिमुकल्यास घरी नेण्यासाठी त्याची आई मंजिश शर्मा विमानतळावर दाखल होत्या. 

आपल्या हातात 'स्पेशल कॅटेगरी' असा बोर्ड घेऊन तो विमानतळावर चालत होता, त्यावेळी तब्बल दोन महिन्यानंतर त्याच्या आईने त्याला अलगद कवेत घेतले. विहान हा गेल्या २ महिन्यांपासून आपल्या आजोबांसोबत दिल्लीत राहात होता. तर, त्याचे आई-वडिल बंगळुरुत होते. लॉकडाऊनमुळे तो दिल्लीतील आजी-आजोबांकडे अडकला होता. बंगळुरु विमानतळावर आपल्या मुलाल घेऊन जाण्यास आलेल्या आईला आनंदाश्रू अनावर झाले होते. तब्बल ३ महिन्यानंतर माय-लेकराची भेट झाली. 

देशभरात लॉकडाऊनमुळे लाखो प्रवासी अडकून पडले आहेत. सर्वचजण आप-आपल्या घराकडे जाण्यासाठी प्रयत्न करत आहेत. कुणी, बसने, कुणी ट्रेनने, कुणी खासगी वाहनाने घराची वाट पकडत आहेत. लॉकडाऊनमध्ये शिथिलता दिल्यानंतर गेल्या १५ दिवसांत हजारो मजूर कामगार पायीच आपल्या घराकडे निघाले आहेत. विशेष म्हणजे तब्बल दीड हजार किलोमीटर पर्यंतचा प्रवास करुनही काहीजण आपल्या घरी पोहोचले आहेत. या प्रवासात कित्येकांना अनेक संकटांचा सामना करावा लागला. मात्र, मजूरांनी आपली पायपीट सुरुच ठेवल्याचं दिसून आलं. 

टॅग्स :delhiदिल्लीMumbaiमुंबईcorona virusकोरोना वायरस बातम्याBengaluruबेंगळूर