शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
4
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
5
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
6
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
7
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
8
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
9
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
10
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
11
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
12
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
13
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
14
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
15
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
16
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
17
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
18
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
19
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
Daily Top 2Weekly Top 5

मुस्लिम रुग्णांवर उपचार करू नका; वैद्यकीय कर्मचाऱ्यांच्या 'त्या' व्हॉट्सअ‍ॅप चॅटमुळे खळबळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 7, 2020 20:42 IST

व्हायरल झालेल्या चॅटच्या स्क्रीनशॉटची पोलिसांकडून दखल; एफआयआर दाखल

जयपूर: मुस्लिम रुग्णांवर उपचार करू नका, अशा आशयाच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅटचे स्क्रीनशॉट्स सध्या व्हायरल झाले आहेत. यानंतर राजस्थान पोलिसांनी प्रकरणाची चौकशी सुरू केली आहे. चुरू जिल्ह्यात हा प्रकार घडला आहे. सोशल मीडियावर रुग्णालयातील कर्मचाऱ्यांच्या व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपमधील चॅटचे स्क्रीनशॉट्स व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी या प्रकाराची दखल घेतली. द इंडियन एक्स्प्रेसनं याबद्दलचं वृत्त दिलं आहे.सरदारशहरमधील डॉ. सुनिल चौधरी यांच्या श्रीचंद्र बराडिया रोग निदान केंद्रात काम करणाऱ्या वैद्यकीय कर्मचाऱ्यांच्या व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपमधील चॅटचे स्क्रीनशॉट्स व्हायरल झाले आहेत. त्यानंतर शनिवारी चौधरी यांनी फेसबुक पोस्टच्या माध्यमातून माफी मागितली. कोणाच्याही धार्मिक भावना दुखावण्याचा रुग्णालयाचा हेतू नसल्याचं चौधरींनी फेसबुक पोस्टमध्ये म्हटलं आहे.'उद्यापासून मुस्लिम रुग्णांचे एक्स-रे काढणार नाही, अशी मी शपथ घेतो,' असा एक मेसेज व्हायरल झालेल्या स्क्रीनशॉटमध्ये आहे. या व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपचं नाव बराडिया राईज असं आहे. 'मुस्लिम रुग्णांवर उपचार करणंच बंद करा,' असंदेखील याच व्यक्तीनं आणखी एका मेसेजमध्ये म्हटलं आहे. 'जर हिंदू पॉझिटिव्ह असते, डॉक्टर मुस्लिम असते, तर हिंदूंना कोणीही पाहिलं नसतं. मी मुस्लिम ओपीडी पाहणार नाही. मॅडम इथे नाहीत, असं सांगून टाका,' असा मजकूर दुसऱ्या एका मेसेजमध्ये आहे.या प्रकरणाची चौकशी सुरू असल्याचं सरदारशहर पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक रमेश पन्नू यांनी सांगितलं. 'दोन दिवसांपूर्वी पोलीस कंट्रोल रुमला याबद्दलची तक्रार मिळाली. व्हायरल झालेल्या चॅटचे स्क्रीनशॉट्स एका धर्मासोबत भेदभाव करणारे आहेत. हे मेसेज लॉकडाऊनच्या काळातील आहेत. याविषयी एफआयआर दाखल करण्यात आला आहे,' असं पन्नू यांनी सांगितलं.पेट्रोल पंपवर एक जण खोकल्यानं खळबळ; प्रकरण वाढल्यानं पोलिसांना बोलावण्याची वेळ"येत्या काही दिवसांत कोरोना रुग्णांची संख्या झपाट्यानं वाढणार; पण..."...अन् आरोग्य कर्मचाऱ्यांनी कोरोनाबाधिताचा मृतदेह खड्ड्यात फेकला; व्हिडीओ व्हायरलरुग्णालयानं कोरोना चाचणी अहवाल येण्याआधीच मृतदेह ताब्यात दिला, 500 जणांच्या उपस्थितीत अंत्यविधी झाला अन्..."कोरोना संकट काळात मोदींसारखं नेतृत्त्व लाभणं हे देशाचं भाग्य"

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याWhatsAppव्हॉट्सअ‍ॅप