CoronaVirus News: पेट्रोल पंपवर एक जण खोकल्यानं खळबळ; प्रकरण वाढल्यानं पोलिसांना बोलावण्याची वेळ

By ऑनलाइन लोकमत | Published: June 7, 2020 06:12 PM2020-06-07T18:12:08+5:302020-06-07T18:16:47+5:30

दुचाकीस्वाराला कोरोना झाल्याचा संशय; पेट्रोल पंप कर्मचाऱ्याचा पेट्रोल भरण्यास नकार

coronavirus man started coughing on petrol pump owner refuses to give petrol | CoronaVirus News: पेट्रोल पंपवर एक जण खोकल्यानं खळबळ; प्रकरण वाढल्यानं पोलिसांना बोलावण्याची वेळ

CoronaVirus News: पेट्रोल पंपवर एक जण खोकल्यानं खळबळ; प्रकरण वाढल्यानं पोलिसांना बोलावण्याची वेळ

Next

कानपूर: कोरोनाचा प्रादुर्भाव सातत्यानं वाढत असल्यानं प्रत्येक जण सतर्क झाला आहे. कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी शक्य तितकी काळजी घेतली जात आहे. साधा ताप किंवा खोकला आल्यानंतरही व्यक्तीकडे संशयानं पाहिलं जाऊ लागलं आहे. उत्तर प्रदेशच्या कानपूरच्या बर्रा पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या पेट्रोल पंपवर याचीच प्रचिती आली. दुचाकीमध्ये पेट्रोल भरण्यासाठी आलेल्या एका व्यक्तीला खोकला आला. त्यानंतर पेट्रोल पंपवरील कर्मचाऱ्यानं दुचाकीत पेट्रोल टाकण्यास नकार दिला. 

दुचाकीस्वाराला आलेला खोकला, त्यामुळे कर्मचाऱ्यानं पेट्रोल पंप कर्मचाऱ्यानं पेट्रोल भरण्यास दिलेला नकार यावरून वाद निर्माण झाला. वाद विकोपाला गेल्यानं व्यवस्थापकानं ११२ क्रमांकावरुन संपर्क साधून पोलिसांना घटनेची माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून भांडणाऱ्या दोघांना शांत केलं. पोलिसांनी बाटलीत पेट्रोल भरून संबंधित दुचाकीस्वाराला घरी जाऊन आराम करण्याची सूचना केली. 

गुजैनी भागात राहणारा दुचाकीस्वार बर्रा बायपासजवळील पेट्रोल पंपवर पेट्रोल भरण्यास गेला होता, अशी माहिती पोलीस ठाण्याचे प्रभारी निरीक्षक रंजीत राय यांनी दिली. दुचाकी उभी करताना त्याला खोकला येऊ लागला. त्याला उभं राहतानाही त्रास होत होता. त्यामुळे संबंधित व्यक्तीला कोरोनाची लागण झाली असावी असा संशय व्यवस्थापक विनोद यांना आला. त्यामुळे त्यांनी दुचाकीत पेट्रोल भरण्यास नकार दिला, असं राय यांनी सांगितलं.

दुचाकीस्वार आणि पेट्रोल पंपवरील कर्मचाऱ्यांवरील वादाची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले. त्यांनी दोघांनाही शांत केलं. पेट्रोल पंपवर उपस्थित असलेल्या व्यवस्थापकानं दुचाकीस्वाराची थर्मल टेस्ट केली. त्याच्या शरीराचं तापमान नॉर्मल होतं. पोलिसांनी दुचाकीस्वाराला घरी जाण्याचा सल्ला दिला. पोलिसांनी संबंधित दुचाकीस्वाराच्या फोटोसह त्याची माहितीदेखील घेऊन ठेवली आहे.

"येत्या काही दिवसांत कोरोना रुग्णांची संख्या झपाट्यानं वाढणार; पण..."

...अन् आरोग्य कर्मचाऱ्यांनी कोरोनाबाधिताचा मृतदेह खड्ड्यात फेकला; व्हिडीओ व्हायरल

रुग्णालयानं कोरोना चाचणी अहवाल येण्याआधीच मृतदेह ताब्यात दिला, 500 जणांच्या उपस्थितीत अंत्यविधी झाला अन्...

"कोरोना संकट काळात मोदींसारखं नेतृत्त्व लाभणं हे देशाचं भाग्य"

Web Title: coronavirus man started coughing on petrol pump owner refuses to give petrol

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.