शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या विमान अपघातातील २५ गंभीर जखमींची यादी आली; विमानाचे प्रवासी की इंटर्न डॉक्टर, रहिवासी...
2
विमानातील कुणीही बचावलं असण्याची शक्यता नाही; सर्वांचा मृत्यू झाल्याची भीती! पोलीस आयुक्त म्हणाले...
3
५ जूनलाच केलेली मोठ्या विमान अपघाताची भविष्यवाणी; अ‍ॅस्ट्रो शर्मिष्ठाची पोस्ट होतेय व्हायरल... 
4
Air India Plane Crash: वडिलांचा व्यवसाय सांभाळण्यासाठी केले होते MBA; विमान अपघातात भाऊ-बहिणीचा दुर्दैवी मृत्यू
5
Ahmedabad Plane Crash : सुनील तटकरे यांच्या कुटुंबातील व्यक्ती एअर इंडियाच्या अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर...
6
Ahmedabad Plane Crash: विमानाने टेक ऑफ केले अन् काही वेळात क्रॅश झाले; त्या ८ मिनिटांत नेमके काय झाले?
7
"माझ्या मुलाने दुसऱ्या मजल्यावरून मारली उडी अन्...! ज्या वस्तिगृहावर विमान कोसळलं तेथेच जेवणासाठी गेला होता"
8
अहमदाबाद विमान अपघातावर पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया, बिलावल भुट्टो म्हणाले...
9
Air India Plane Crash: अनेकांचे गेले जीव, आतापर्यंत १०० जणांचे मृतदेह मिळाले! विमान पडले तेव्हा वसतिगृहात होते ५० विद्यार्थी
10
Ahmedabad Plane Crash Live Updates: विमान अपघातातील १०० जणांचे मृतदेह मिळाले, २५ जखमींवर उपचार सुरू
11
Ahmedabad Plane Crash: कोणती अशी २ कारणे, ज्यामुळं टेकऑफ घेताच प्लेन क्रश होऊ शकतं?; तज्ज्ञांनी सांगितले
12
विजय रुपाणींचा विमानात बसलेला फोटो समोर आला; पंतप्रधान नरेंद्र मोदी अहमदाबादकडे रवाना 
13
Air India Plane Crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेत २० मेडिकल विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची भीती
14
Ahmedabad Plane Crash : "माझी वहिनी लंडनला जात होती, १ तासातच मला..."; अपघातानंतर कुटुंबीयांची रुग्णालयात धाव
15
डॉक्टरांच्या वसतिगृहावर कोसळलं एअर इंडियाचं विमान, इमारतीवर अडकलेला दिसला प्लेनचा मागचा भाग
16
MAYDAY कॉल म्हणजे काय?, तो तीन वेळाच का देतात? अहमदाबादहून 'टेक ऑफ'नंतर पायलटने दिलेल्या 'त्या' कॉलबद्दल...
17
भारतातील सर्वात आव्हानात्मक विमानतळ, लँडिंग-टेक ऑफ करताना पायलटचाही हात कापतो
18
Ahmedabad Plane Crash: अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर्सची यादी आली समोर; दोन मराठी नावे, खासदार तटकरेंच्या नातेवाईकांचा समावेश
19
अहमदाबाद विमान अपघात : मृतांच्या कुटुंबियांना किती पैसे मिळतील? जाणून घ्या कायदा काय सांगतो!
20
Plane Crash Incident: पायलटकडे केवळ एका मिनिटाचाच वेळ होता, पण..., एअर इंडियाच्या विमान अपघाताचे कारण समोर आले

बलात्काऱ्यांना घेऊन जाणाऱ्या पोलिसांवर दगडफेक

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 1, 2019 01:06 IST

आरोपींना आमच्या हवाली करा, अशी मागणी जमाव करीत होता.

हैदराबाद : येथे एका पशुवैद्यकीय डॉक्टर तरुणीवर बलात्कार करून नंतर तिला जाळून मारणा-या चार आरोपींना स्थानिक न्यायालयाने १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली असून, दिल्लीतील निर्भया प्रकरणाची आठवण करून देणा-या या घटनेमुळे संतप्त झालेल्या लोकांनी आरोपींना तुरुंगात घेऊन जाणा-या पोलिसांच्या वाहनावर तुफान दगडफेक केली. आरोपींना आमच्या हवाली करा, अशी मागणी जमाव करीत होता.

हैदराबादेतील वातावरण स्फोटक बनले आहे. आरोपींना ठेवलेल्या शादनगर पोलीस ठाण्याबाहेर संतप्त लोक जमले होते. त्यामुळे आरोपींना न्यायालयात नेणे पोलिसांना शक्य झाले नाही. त्याऐवजी कार्यकारी न्यायदंडाधिकाऱ्यांना पोलीस ठाण्यात बोलाविले गेले. न्यायदंडाधिका-यांनी तेथे आरोपींना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली.

चार आरोपींना घेऊन पोलीस तुरुंगाकडे जायला निघाले तेव्हा लोकांनी पोलिसांचे वाहन अडवून आरोपींना आपल्या स्वाधीन करण्याची मागणी करीत दगडफेक केली. जमावाला पांगविण्यासाठी पोलिसांना बळाचा सौम्य वापर करावा लागला. तेलंगणातील अनेक शहरांत विद्यार्थी आणि इतर संघटना तसेच नागरिकांनी निदर्शने केली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी