शहरं
Join us  
Trending Stories
1
स्लोव्हाकियाचे पंतप्रधान रॉबर्ट फिको यांच्यावर प्राणघातक हल्ला, रुग्णालयात दाखल 
2
Anil Desai, Congress: ठाकरे गटाच्या उमेदवाराशी आधी काँग्रेस कार्यकर्ते भिडले, मग खांद्यावरून घेऊन नाचले; गैरसमजातून वाद, नेमकं काय घडलं?
3
झारखंडचे मंत्री आलमगीर आलम यांना ईडीकडून अटक, सचिवाच्या नोकराच्या घरी सापडली होती कोट्यावधींची रोकड!
4
राहुल गांधींच्या पत्रिकेत पंतप्रधान बनण्याचा योग नाही; भाजप नेत्याचा खोचक टोला...
5
चार प्रमुख उमेदवार, चार फॅक्टर! कोण होणार औरंगाबादचा खासदार?; मतदानानंतर असं दिसतंय 'गणित'
6
Neeraj Chopra : नीरज चोप्राने आणखी एक सुवर्णपदक जिंकले, महाराष्ट्राच्या पाटीलची 'उत्तम' कामगिरी
7
दिव्या खोसलासोबतच्या घटस्फोटाच्या चर्चांवर भूषण कुमार यांनी सोडलं मौन; म्हणाले...
8
पती पत्नीचा असाही 'व्यवसाय'! ती ट्रक चालकांना जाळ्यात फसवायची अन् तो उकळायचा पैसे
9
CAA अंतर्गत भारताचे नागरिकत्व देण्यास सुरुवात, गृहमंत्रालयाने 14 जणांना दिली प्रमाणपत्रे...
10
"फिरायला गेले नव्हते..."! प्रियांका गांधी अमित शाह यांच्यावर भडकल्या; थायलंडला कशासाठी गेल्या होत्या? स्पष्टच सांगितलं
11
इस्रायलचं टेन्शन वाढणार! दक्षिण आफ्रिकेची आंतरराष्ट्रीय कोर्टात याचिका; उद्या होणार सुनावणी
12
ज्या सत्तेला सोनिया गांधींनी नाकारले, त्या सत्तेवर मोदींचा डोळा; मल्लिकार्जुन खरगेंचा हल्लाबोल...
13
एका लग्नाची दुसरी गोष्ट! 75 वर्षीय वडिलांसाठी लेकीने निवडली 60 वर्षांची नवरी
14
स्टार क्रिकेटपटूची बलात्काराच्या प्रकरणातून निर्दोष मुक्तता; ट्वेंटी-२० वर्ल्ड कप खेळण्यास सज्ज
15
धक्कादायक! तरुणी झोपली होती, प्रियकरानं घरात घुसून केली हत्या, घटनेनं शहर हादरलं
16
मुसलमान आणि आमचा DNA एकच; मुलाच्या प्रचारावेळी बोलताना ब्रिजभूषण भावूक  
17
12वी पास कंगनाकडे कोट्यवधींचे हीरे, एकाच दिवसात खरेदी केल्या LIC च्या 50 पॉलिसी, जाणून घ्या किती आहे संपत्ती?
18
गंभीर हसल्याशिवाय क्रशला प्रपोज करणार नाही; तरूणीच्या पोस्टरला भारतीय दिग्गजाचं उत्तर
19
मराठमोळ्या अभिनेत्रीला झालाय गंभीर आजार, व्हिडिओ शेअर करत म्हणाली, 'मी प्रेग्नंट नाही...'
20
"आमच्या घरी ईद साजरी केली जायची"; पंतप्रधान मोदींनी सांगितला मुस्लिम शेजाऱ्यांचा किस्सा

राम मंदिरासाठी देणगी गोळा करण्यासाठी निघालेल्या रॅलीवर दगडफेक, अनेकजण जखमी

By ऑनलाइन लोकमत | Published: December 29, 2020 4:45 PM

Crime News : राम मंदिरासाठी देणगी गोळा करण्यासाठी निघालेल्या रॅलीवर दगडफेक झाल्याची घटना पुन्हा एकदा घडली आहे.

इंदूर - मध्य प्रदेशमध्येराम मंदिरासाठी देणगी गोळा करण्यासाठी निघालेल्या रॅलीवर दगडफेक झाल्याची घटना पुन्हा एकदा घडली आहे. काही दिवसांपूर्वी उज्जैन येथे रॅलीवर दगडफेक झाल्यानंतर आज इंदूरमध्ये अशाच रॅलीवर दगडफेक झाली. एका धर्मस्थळाशेजारी हनुमान चालिसेचे पठण केल्याने वादाला तोंड फुटले. त्यानंतर झालेल्या दगडफेकीत अनेकजण जखमी झाले. परिस्थिती पाहून पोलिस घटनास्थळावर दाखल झाले. आता येथील परिस्थिती नियंत्रणात आहे.ही घटना इंदूरमधील गौतमपूरा ठाणे परिसरातील चांदनखेडी गावात मंगळवारी सकाळी घडली. हिंदुत्ववादी संघटनांनी रॅलीवर दगडफेक केली. ही रॅली अयोध्येत बांधण्यात येत असेल्या राम मंदिरासाठी निधी गोळा करण्यासाठी काढण्यात आली होती. ही रॅली एका गावातून दुसऱ्या गावात जात असताना दोन पक्षांमधील लोक आमने-सामने आले. त्यानंतर दगडफेकीस सुरुवात झाली. यात डझनभर लोक जखमी झाले. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. तसेच पोलिसांचा फौजफाटा गावात तैनात करण्यात आला.गावातून सकाळी काही कार्यकर्ते रॅली काढत होते. तेव्हा तिथे पोलीस उपस्थित होते. ही रॅली जेव्हा एका गावातून दुसऱ्या गावात जात होती. तेव्हा वाटेत एका धार्मिक स्थळाजवळ उभे राहून या कार्यकर्त्यांनी हनुमान चालिसा पठण करण्यास सुरुवात केली. हे कार्यकर्ते पुढे जात होते. तेवढ्यात काही जण तिथे आले. त्यानंतर वादास सुरुवात झाली. पोलीस परिस्थितीतीवर नियंत्रण मिळवणयसाठी प्रयत्न करत असतानाच दगडफेक सुरू झाली. दरम्यान, काही दिवसांपूर्वी उज्जैनमध्येही राम मंदिरासाठी देणगी गोळा करण्यासाठी निघालेल्या रॅलीवर दगडफेक झाली होती.

टॅग्स :Madhya Pradeshमध्य प्रदेशRam Mandirराम मंदिर