Mohan Bhagwat: मोहन भागवत प्रवास करत असलेल्या वंदे भारत ट्रेनवर दगडफेक, नेमकं काय घडलं?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2026 10:05 IST2026-02-20T10:03:07+5:302026-02-20T10:05:21+5:30

Vande Bharat Express Stone Pelting: उत्तर प्रदेशातील हरदोईजवळ एक खळबळजनक घटना समोर आली. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत प्रवास करत असलेल्या लखनौ-दिल्ली वंदे भारत एक्स्प्रेसवर अज्ञातांनी दगडफेक केली.

Stone Pelting on Vande Bharat Express Carrying RSS Chief Mohan Bhagwat; Coach C4 Window Broken Near Hardoi | Mohan Bhagwat: मोहन भागवत प्रवास करत असलेल्या वंदे भारत ट्रेनवर दगडफेक, नेमकं काय घडलं?

Mohan Bhagwat: मोहन भागवत प्रवास करत असलेल्या वंदे भारत ट्रेनवर दगडफेक, नेमकं काय घडलं?

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांना घेऊन जाणाऱ्या वंदे भारत एक्स्प्रेसवर शुक्रवारी अज्ञातांनी दगडफेक केली. लखनौहून दिल्लीला जाणाऱ्या या ट्रेनवर हरदोईजवळ हा हल्ला झाला. या घटनेत ट्रेनच्या सी४ कोचची काच फुटली असून, सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही.

मोहन भागवत यांना झेड प्लस श्रेणीची आणि अ‍ॅडव्हान्स्ड सिक्युरिटी लायझन सुरक्षा कवच आहे. अशा कडक बंदोबस्तात असलेल्या व्यक्तीच्या ट्रेनवर हल्ला झाल्याने खळबळ उडाली. हरदोई पोलिसांनी या घटनेची गंभीर दखल घेतली असून हल्लेखोरांचा शोध सुरू केला आहे. वंदे भारत ट्रेनवर दगडफेक होण्याची ही पहिली वेळ नसली तरी, एका अतिमहत्त्वाच्या व्यक्तीच्या प्रवासादरम्यान झालेल्या या कृत्यामुळे रेल्वे सुरक्षा दलासमोर मोठे प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.

मोहन भागवत हे पश्चिम उत्तर प्रदेशच्या दौऱ्यावर असून ते मेरठला जात होते. मोहन भागवत मेरठमध्ये दोन दिवस महत्त्वाच्या कार्यक्रमांत सहभागी होणार आहेत. आज दुपारी १२ ते ६ या वेळेत मेरठ आणि ब्रज क्षेत्रातील २८ जिल्ह्यांतील ५०० हून अधिक खेळाडू, प्रशिक्षक आणि शारीरिक शिक्षकांशी ते संवाद साधतील.  या कार्यक्रमात भारतीय क्रिकेटपटू सुरेश रैना, भुवनेश्वर कुमार, प्रवीण कुमार आणि कुस्तीपटू अलका तोमर यांना आमंत्रित करण्यात आले आहे. त्यानंतर उद्या (२१ फेब्रुवारी) वकील, डॉक्टर, चार्टर्ड अकाउंटंट, इंजिनिअर्स आणि उद्योजकांशी ते संवाद साधणार आहेत.

Web Title : मोहन भागवत की वंदे भारत ट्रेन पर पथराव: क्या हुआ?

Web Summary : हरदोई के पास आरएसएस प्रमुख मोहन भागवत को ले जा रही वंदे भारत एक्सप्रेस पर पथराव किया गया। एक खिड़की क्षतिग्रस्त हो गई, लेकिन कोई घायल नहीं हुआ। पुलिस मामले की जांच कर रही है। भागवत उत्तर प्रदेश के दौरे पर हैं और मेरठ में कार्यक्रमों में भाग लेंगे।

Web Title : Stone pelting on Mohan Bhagwat's Vande Bharat train: What happened?

Web Summary : Stones were thrown at the Vande Bharat Express carrying RSS chief Mohan Bhagwat near Hardoi. A window was damaged, but no one was injured. Police are investigating the incident. Bhagwat is on a tour of Uttar Pradesh and will attend events in Meerut.