तरीही ७० वर्षांपासून काश्मीरची भीक मागताय, गंभीरने शाहीद आफ्रिदीला सुनावलं

By ऑनलाइन लोकमत | Published: May 17, 2020 04:10 PM2020-05-17T16:10:34+5:302020-05-17T16:20:37+5:30

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओच्या सुरुवातीला शाहिद आफ्रिदी कोरोना व्हायरसबाबत बोलत आहे. पण, त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि काश्मीरबाबत बोलत आहे

Still begging for Kashmir for 70 years, Gautam gambhir react on Shahid Afridi MMG | तरीही ७० वर्षांपासून काश्मीरची भीक मागताय, गंभीरने शाहीद आफ्रिदीला सुनावलं

तरीही ७० वर्षांपासून काश्मीरची भीक मागताय, गंभीरने शाहीद आफ्रिदीला सुनावलं

Next

मुंबई - पाकिस्तान क्रिकेट संघाचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदीने पुन्हा एकदा काश्मीर आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींविरोधात राग आवळल्याचे दिसून आले. भाजपा प्रवक्ते संबित पात्रा आणि सिनेमा निर्माते अशोक पंडीत यांनी हा व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यात आफ्रिदी पंतप्रधान नरेंद्र मोदींबद्दल बरेच काही बोलत आहेत. हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. त्यानंतर, भारतीय संघाचा माजी फलंदाज आणि भाजपा खासदार गौतम गंभीरने शाहिद आफ्रिदीला चांगलेच सुनावले. तसेच, १६ वर्षाचा म्हणून आफ्रिदीची खिल्लीही उडवली आहे. 

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओच्या सुरुवातीला शाहिद आफ्रिदी कोरोना व्हायरसबाबत बोलत आहे. पण, त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि काश्मीरबाबत बोलत आहे. या व्हिडिओत आफ्रिदी म्हणतो की, कोरोनापेक्षा मोठा रोग मोदी यांच्या मनात आणि डोक्यात आहे. तो आजार धर्माचा आहे. त्या आजारावर ते सत्ता चालवत आहेत. आमच्या काश्मिरी लोकांवर अत्याचार करत आहे, याचे उत्तर त्यांना द्यावचं लागेल असं तो व्हिडीओत म्हणत आहे.

त्यानंतरही, आफ्रिदीने काश्मीर प्रश्नावरुन संताप व्यक्त केला. नरेंद्र मोदी सर्वात डरपोक माणूस आहे. मोदींनी काश्मीरमध्ये भारताचे सात लाख सैनिक तैनात केले आहेत. इतके सैनिक आमच्या संपूर्ण पाकिस्तानच्या सैन्यात आहेत. परंतु त्यांना हे माहित नाही की, त्या ७ लाख सैनिकांच्या मागे आणखी २२-२३ कोटी सैन्य आहे आणि आम्ही आमच्या पाकिस्तानी सैन्यासोबत आहोत असंही आफ्रिदीने म्हटले होते. आफ्रिदीच्या या वक्तव्याचा गौतम गंभीरने चांगलाच समाचार घेतला आहे. 

गंभीरने शाहिद आफ्रिची खिल्ली उडवत, पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्यासह पाकिस्तानचे लष्करप्रमुख कमर बाजवा यांच्यावर निशाणा साधला. गौतमने पाकिस्तानच्या या तिन्ही महाशयांचा उल्लेख जोकर म्हणून केला आहे. पाकिस्तानजवळ ७ लाख सैन्य असून २० कोटी लोकं या सैन्याच्या पाठीशी आहेत, असं १६ वर्षीय शाहिद आफ्रिदीने म्हटलंय. तरीही ७० वर्षांपासून काश्मीरसाठी भीक मागत आहेत, असे कडक उत्तर गंभीरने दिले आहे. आफ्रिदी, बाजवा आणि इम्रान खानसारखे लोकं पंतप्रधान नरेंद्र मोदींबद्दल विष पसरवण्याचा काम करतात. ज्यातून पाकिस्तानी लोकांना मूर्ख बनवत आहेत, पण निर्णय येईपर्यंतही काश्मीर तुम्हाला मिळणार नाही. बांग्लादेश लक्षात आहे ना?, असे म्हणत गौतमने आफ्रिदीचा गंभीरतेने समाचार घेतला. 
 

Web Title: Still begging for Kashmir for 70 years, Gautam gambhir react on Shahid Afridi MMG

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.