महाकुंभमेळ्यात सहभागी झालेली स्टीव्ह जॉब्स यांची पत्नी पडली आजारी; कैलाशानंद गिरींनी दिली माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 14, 2025 14:48 IST2025-01-14T14:47:41+5:302025-01-14T14:48:23+5:30

Mahakumbh 2025: लॉरेन या मकर संक्रांतीनिमित्त पवित्र महास्नानही करणार होत्या, परंतू त्यांनी स्नान केले नाही. यावर गिरी यांनी माहिती दिली आहे.

Steve Jobs' wife Laurene Powell falls ill after attending Mahakumbh Mela; Kailashanand Giri gives information | महाकुंभमेळ्यात सहभागी झालेली स्टीव्ह जॉब्स यांची पत्नी पडली आजारी; कैलाशानंद गिरींनी दिली माहिती

महाकुंभमेळ्यात सहभागी झालेली स्टीव्ह जॉब्स यांची पत्नी पडली आजारी; कैलाशानंद गिरींनी दिली माहिती

प्रयागराजमध्ये महाकुंभमेळ्यात अॅप्पल कंपनीचे सहसंस्थापक असलेले दिवंगत स्टीव्ह जॉब्स यांची पत्नी आली आहे. लॉरेन पॉवेल यांना गुरु स्‍वामी कैलाशानंद गिरी यांनी आपले गोत्र दिले आहे. तसेच त्यांना कमला हे नावही दिले आहे. कमला उर्फ लॉरेन पॉवेल जॉब्‍स यांनी पहिल्या दिवशी कुंभमेळ्याहा हजेरी लावली. परंतू, आज त्या आजारी पडल्या आहेत. 

"मला जगातील सर्वांत सुंदर म्हणणे चांगले वाटतेय, पण साध्वी..."; इन्फ्लुएंसर हर्षा रिछारिया नेमकी आहे तरी कोण...

लॉरेन या मकर संक्रांतीनिमित्त पवित्र महास्नानही करणार होत्या, परंतू त्यांनी स्नान केले नाही. यावर गिरी यांनी माहिती दिली आहे. लॉरेन यांना कुंभमेळ्याच्या दुसऱ्या दिवशी अॅलर्जी झाली आहे. यामुळे त्यांनी महास्नान केलेले नाही. परंतू, त्या थोड्या दिवसांत महास्नान करणार आहेत, असे गिरी यांनी सांगितले. गेली अनेक वर्षे त्या एवढ्या गर्दीत गेल्या नाहीत, असेही ते म्हणाले.

लॉरेन यांना काशी विश्वनाथच्या गाभाऱ्यात जाऊ दिले नाही. काशी विश्वनाथच्या गाभाऱ्यात अन्य धर्मियांना प्रवेश नसल्याने त्यांना प्रवेश नाकारण्यात आला. यामुळे लॉरेन यांनी बाहेरूनच दर्शन घ्यावे लागले. शुक्रवारी त्या गिरी यांच्यासोबत काशीला गेल्या होत्या. लॉरेन येथे कल्पवास देखील करणार आहेत.

यावेळी होणारा महाकुंभ हा एक दुर्मिळ खगोलीय घटना आहे आणि असा योगायोग १४४ वर्षांनंतर घडत आहे. महाकुंभातील लॉरेन पॉवेल जॉब्ससाठी खास महाराजा डिलक्स कॉटेजमध्ये राहण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. २९ जानेवारीपर्यंत निरंजनी आखाड्यातील आचार्य महामंडलेश्वर स्वामी कैलाशानंद यांच्या छावणीत त्या राहणार आहेत. 
 

Web Title: Steve Jobs' wife Laurene Powell falls ill after attending Mahakumbh Mela; Kailashanand Giri gives information

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.