शहरं
Join us  
Trending Stories
1
आधी सिंधू करार मोडला, आता पाकिस्तानच्या वरिष्ठ राजदूताला बोलावले, आणखी एक मोठी कारवाई
2
'माझ्या मुलाला कसं सांगू की त्याचे वडील आता परत येणार नाहीत', महिलेने विमानतळावर पोहोचताच फोडला टाहो
3
धर्म विचारून गोळी झाडण्याची ही काही पहिलीच वेळ नाही; याआधी कधी घडली होती घटना?
4
ना अदानी, ना अंबानी; 'या' भारतीय अब्जाधीशानं आतापर्यंत केली सर्वाधिक कमाई
5
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
6
Ather Energy चा IPO येणार, निश्चित झाला प्राईज बँड; 'या' तारखेपासून करता येणार गुंतवणूक, पाहा डिटेल्स
7
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
8
जम्मू-काश्मिरात अडकलेल्या पर्यटकांचे पहिले विमान आज मुंबईत येणार; ८३ जणांमध्ये कोणा-कोणाचा समावेश?
9
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
10
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
11
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
12
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
13
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
14
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा
15
‘जशास तसे’ व ‘लक्षात राहील’ असे उत्तर देणे; पाकिस्तानला धडा शिकवावा लागेलच, पण...
16
‘आपल्या’ इतकाच राग, तितकेच दु:ख ‘त्यांना’ही आहे; १९ वेळा दहशतवाद्यांनी मला उचलून नेले
17
स्वीडनमधील हे जोडपं देश सोडून पळालं, मात्र जाताना १५८ पिंप मानवी विष्ठा मागे ठेवले
18
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
19
काश्मीरला जाण्यासाठी अनेक महिने पैसे साठवले; आनंद, स्वप्न पूर्ण करायला गेले अन् घात झाला 
20
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...

Statue Of Unity - 'महापुरुषांचं कौतुक करणं हा मोठा गुन्हा आहे काय?'; मोदींनी विरोधकांना फटकारलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 31, 2018 12:03 IST

ऐक्याचे प्रतीक (स्टॅच्यू ऑफ युनिटी) म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सरदार वल्लभभाई पटेल यांच्या गुजरातमधील नर्मदा जिल्ह्यातील 182 मीटर उंचीच्या पुतळ्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते अनावरण झाले आहे.

नवी दिल्ली-  ऐक्याचे प्रतीक (स्टॅच्यू ऑफ युनिटी) म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सरदार वल्लभभाई पटेल यांच्या गुजरातमधील नर्मदा जिल्ह्यातील 182 मीटर उंचीच्या पुतळ्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते अनावरण झाले आहे. या समारंभाला अनेक राज्यांचे मुख्यमंत्री, तसेच अनेक नेते उपस्थित आहेत. या पुतळ्याचे काम 2013साली मोदी गुजरातचे मुख्यमंत्री असताना सुरू झाले होते, ते आता पूर्ण झाले आहे. या पुतळ्यासाठी 2,989 कोटींचा खर्च आला आहे. 

लॉर्सन अॅन्ड टुब्रो आणि राज्य सरकार संचालित सरदार सरोवर नर्मदा निगम लिमिटेडवर पुतळा उभारणीची जबाबदारी होती. 'स्टॅच्यू ऑफ युनिटी' हा जगातील सर्वात उंच पुतळा असून तो कमी वेळेत तयार करण्यात आला आहे. पुतळ्याची उंची ही न्यूयॉर्कच्या स्टॅच्यू ऑफ लिबर्टीच्या जवळपास दुप्पट आहे. तसेच चीनमधील गौतम बुद्धांच्या स्प्रिंग टेंपल येथील पुतळ्यापेक्षाही उंच आहे. 

लोखंड आणि तांबे यांच्या मिश्रणातून पुतळा तयार करण्यात आला आहे. 18,500 टन रेनफोर्स स्टील, 6,500 टन स्ट्रक्चरल स्टील, 1,700 टन आणि अनेक धातूंचा 'स्टॅच्यू ऑफ युनिटी' साठी वापर करण्यात आला आहे. भूकंप अथवा कोणत्याही नैसर्गिक आपत्तीमुळे 'स्टॅच्यू ऑफ युनिटी'चे नुकसान होणार नाही अशापद्धतीने संरचना करण्यात आली आहे. तसेच पुतळा तयार करण्यासाठी तब्बल दोन कोटी 25 लाख किलो सिमेंटचा वापर करण्यात आला आहे.Statue Of Unity Updates

- देशातील काही लोक आमची ही मोहीम राजकारणाशी जोडू पाहतात तेव्हा आश्चर्य वाटतं. सरदार पटेल यांच्यासारख्या महापुरुषांचं कौतुक केल्यावरही आमच्यावर टीका केली जाते, महापुरुषांचं कौतुक करणं हा मोठा गुन्हा आहे काय? :- सरदार वल्लभभाई पटेल यांच्यात कौटिल्याची कूटनीती अन् शिवाजी महाराजांचं शौर्य होतं- नरेंद्र मोदी- सरदार साहेबांच्या आवाहनावर देशाच्या शेकडो संस्थानांनी त्याग केला, त्यांचा त्याग विसरता येणार नाही- नरेंद्र मोदी- गुजरातच्या शेतकऱ्यांकडून या पुतळ्याच्या निर्मितीला जनआंदोलनाचं स्वरुप दिलं, त्यांच्याकडून मिळालेल्या अवजारांमुळे पुतळ्यासाठी शेकडो टन लोखंड मिळालं- मोदी- सरदार पटेल यांचा भव्य पुतळा देशाला समर्पित करण्याची संधी मिळाली हे माझं भाग्य- मोदी- देशाच्या इतिहासात आज महत्त्वाचा दिवस- नरेंद्र मोदी- देशाची एकता जिंदाबाद जिंदाबाद- नरेंद्र मोदी- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सरदार पटेल यांच्या स्टॅच्यू ऑफ युनिटीचं बटन दाबून अनावरण केले..

टॅग्स :Statue Of Unityस्टॅच्यू ऑफ युनिटीGujaratगुजरात