शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन पक्ष संपवण्याच्या प्रयत्नात भाजपलाच संपवलं; आदित्य ठाकरेंचा फडणवीसांना टोला 
2
इंडिया आघाडीचे सरकार स्थापन झाल्यावर बाहेरुन पाठिंबा देणार; ममता बॅनर्जींची मोठी घोषणा
3
घाटकोपर होर्डिंग्ज एजन्सीची मान्यता तत्काळ रद्द करून काळ्या यादीत टाका; अंबादास दानवेंचं मुख्यमंत्र्यांना पत्र
4
"दिल टूट गया है..", कॉमेडियन श्याम रंगीलाचा उमेदवारी अर्ज फेटाळला, वाराणसीतून लढवता येणार नाही निवडणूक!
5
'मुस्लिमांशी घट्ट नाते आहे' म्हणणारे पंतप्रधान मोदी मुस्लीम द्वेषावरच भाषण देतात, नाना पटोलेंची टीका
6
पंजाब किंग्सच्या गोलंदाजांसमोर RRच्या फलंदाजांची धडपड; रियान पराग एकटा लढला
7
एकहाती सत्तेपेक्षा 'मिलीजुली' सरकार देशहिताचं, जे सगळ्यांची 'मन की बात' ऐकेल; आदित्य ठाकरेंनी मांडला वेगळाच मुद्दा
8
"अरविंद केजरीवाल यांच्यासाठी माझ्याकडे एक वाईट बातमी आहे..."; काय म्हणाले अमित शाह?
9
स्लोव्हाकियाचे पंतप्रधान रॉबर्ट फिको यांच्यावर प्राणघातक हल्ला, रुग्णालयात दाखल 
10
Anil Desai, Congress: ठाकरे गटाच्या उमेदवाराशी आधी काँग्रेस कार्यकर्ते भिडले, मग खांद्यावरून घेऊन नाचले; गैरसमजातून वाद, नेमकं काय घडलं?
11
झारखंडचे मंत्री आलमगीर आलम यांना ईडीकडून अटक, सचिवाच्या नोकराच्या घरी सापडली होती कोट्यावधींची रोकड!
12
धक्कादायक! वाहन चालवत असतानाच फार्मासिस्टचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू
13
राहुल गांधींच्या पत्रिकेत पंतप्रधान बनण्याचा योग नाही; भाजप नेत्याचा खोचक टोला...
14
Neeraj Chopra : नीरज चोप्राने आणखी एक सुवर्णपदक जिंकले, महाराष्ट्राच्या पाटीलची 'उत्तम' कामगिरी
15
पती पत्नीचा असाही 'व्यवसाय'! ती ट्रक चालकांना जाळ्यात फसवायची अन् तो उकळायचा पैसे
16
इस्रायलचं टेन्शन वाढणार! दक्षिण आफ्रिकेची आंतरराष्ट्रीय कोर्टात याचिका; उद्या होणार सुनावणी
17
ज्या सत्तेला सोनिया गांधींनी नाकारले, त्या सत्तेवर मोदींचा डोळा; मल्लिकार्जुन खरगेंचा हल्लाबोल...
18
एका लग्नाची दुसरी गोष्ट! 75 वर्षीय वडिलांसाठी लेकीने निवडली 60 वर्षांची नवरी
19
स्टार क्रिकेटपटूची बलात्काराच्या प्रकरणातून निर्दोष मुक्तता; ट्वेंटी-२० वर्ल्ड कप खेळण्यास सज्ज
20
धक्कादायक! तरुणी झोपली होती, प्रियकरानं घरात घुसून केली हत्या, घटनेनं शहर हादरलं

Statue Of Unity: आता हेलिकॉप्टरमधून पाहता येणार स्टॅच्यू ऑफ युनिटी, जाणून घ्या तिकिटाचा दर

By ऑनलाइन लोकमत | Published: December 25, 2018 3:35 PM

पर्यटकांमध्येही स्टॅच्यू ऑफ युनिटीला पाहण्याची प्रचंड उत्कंठा आहे.

ठळक मुद्देजगातील सर्वात भव्य प्रतिमा 'स्टॅच्यू ऑफ युनिटी’ पर्यटकांच्या आकर्षणाचं केंद्र ठरत आहे. पर्यटकांमध्येही स्टॅच्यू ऑफ युनिटीला पाहण्याची प्रचंड उत्कंठा आहे.जगातील सर्वात मोठी प्रतिमा असलेली स्टॅच्यू ऑफ युनिटी तुम्हाला हेलिकॉप्टरमधूनही पाहायला मिळणार आहे.

गुजरातः नर्मदा नदीकाठच्या सरदार सरोवरामध्ये उभारण्यात आलेली जगातील सर्वात भव्य प्रतिमा 'स्टॅच्यू ऑफ युनिटी’ पर्यटकांच्या आकर्षणाचं केंद्र ठरत आहे. त्यामुळे पर्यटकांमध्येही स्टॅच्यू ऑफ युनिटीला पाहण्याची प्रचंड उत्कंठा आहे. विशेष म्हणजे जगातील सर्वात मोठी प्रतिमा असलेली स्टॅच्यू ऑफ युनिटी तुम्हाला हेलिकॉप्टरमधूनही पाहायला मिळणार आहे.गेल्या काही दिवसांपूर्वीच स्टॅच्यू ऑफ युनिटीला पाहण्यासाठी हेलिकॉप्टर राइड लाँच करण्यात आलं आहे. हेलिकॉप्टरच्या माध्यमातून अवकाशातून तुम्हाला फक्त 10 मिनिटांत स्टॅच्यू ऑफ युनिटी पाहायला मिळणार आहे. परंतु त्यासाठी 2900 रुपये मोजावे लागणार आहेत.तसेच हेलिकॉप्टरमधून तुम्ही स्टॅच्यू ऑफ युनिटीशिवाय व्हॅली ऑफ फ्लॉवर आणि सरदार सरोवर बांध पाहू शकणार आहात. ही राइड स्टॅच्यू ऑफ युनिटीच्या हेलिपॅडपासून सुरू होणार आहे. स्टॅच्यू ऑफ युनिटीला अवकाशातून पाहण्यासाठी संधी हवाई सर्व्हिस हेरिटेज एव्हिएशननं उपलब्ध करून दिली आहे. या सेवेची सुरुवात करणारे ब्रीजमोहन म्हणाले, आतापर्यंत आम्ही उत्तराखंड, हिमाचल प्रदेशात लोकांना राइडवर नेलं होतं. परंतु आता गुजरात सरकारच्या मदतीनं सरदार सरोवर बांध आणि स्टॅच्यू ऑफ युनिटी दाखवणार आहोत. एका वेळी हेलिकॉप्टरमध्ये 6 ते 7 जण बसू शकणार आहेत. कसं कराल बुकिंगब्रीजमोहन सांगतात, हेलिकॉप्टर सुविधा सुरू केल्याच्या पहिल्याच दिवशी 55 जणांनी या राइडची मजा घेतली. पहिल्या टप्प्यात एकच हेलिकॉप्टर ठेवण्यात आलं होतं. जर प्रवासी जास्त असले तर दोन हेलिकॉप्टर उपलब्ध करून दिली जाणार आहेत. तसेच गुजरात टुरिझमच्या वेबसाइटवरूनही या राइडचं बुकिंग करता येणार आहे. सर्वसामान्य पर्यटकांमध्ये मात्र स्टॅच्यू ऑफ युनिटी आकर्षणाचे केंद्र बनला आहे. येथे उभारण्यात आलेली सरदार पटेल यांची भव्य प्रतिमा पाहण्यासाठी जगभरातून पर्यटक येथे येत आहेत. सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जगातील सर्वात उंच 182 मीटर उंचीच्या पुतळ्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते  31 ऑक्टोबर रोजी लोकार्पण झाले होते. मात्र या पुतळ्याची प्रवेश फी ही जगप्रसिद्ध ताहमहलच्या प्रवेश फीपेक्षा सातपट अधिक महाग असल्याने नाराजी व्यक्त करण्यात येत होती. तरीही येथे भेट देणाऱ्या पर्यटकांचे प्रमाण वाढत आहे. 

टॅग्स :Statue Of Unityस्टॅच्यू ऑफ युनिटीGujaratगुजरात