शहरं
Join us  
Trending Stories
1
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
2
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
3
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
4
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
5
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
6
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
7
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
8
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
9
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
10
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
11
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
12
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
13
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
14
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
15
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
16
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
17
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
18
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
19
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
20
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
Daily Top 2Weekly Top 5

आग्र्यातील जामा मशिदीच्या पायऱ्याखाली श्रीकृष्णाची मूर्ती; जीपीआर सर्वेक्षणाची मागणी...

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 1, 2024 22:05 IST

जीपीआर सर्वेक्षण करण्यासाठी कोर्टात याचिका दाखल करण्यात आली आहे.

Mashid Survey : संभलच्या जामा मशीद आणि अजमेरच्य ख्वाजा मोईनुद्दीन चिश्ती दर्ग्यानंतर आता आग्राच्या जामा मशिदीच्या सर्वेक्षणाचे प्रकरण चर्चेत आले आहे. आग्राच्या जामा मशिदीखाली भगवान कृष्णाची मूर्ती असल्याचा दावा केला जातोय. ग्राउंड पेनेट्रेटिंग रडार (जीपीआर) वापरुन जामा मशिदीच्या पायऱ्यांचे सर्वेक्षण करण्याची मागणी करणारी याचिका न्यायालयात दाखल करण्यात आली असून, 23 डिसेंबरला सुनावणी होणार आहे.

काय दावा करण्यात आला आग्रा कोर्टात दाखल केलेल्या याचिकेत योगेश्वर श्री कृष्ण जन्मस्थान सेवा संघ ट्रस्ट आणि श्री कृष्ण जन्मभूमी संरक्षित सेवा ट्रस्टने म्हटले की, श्रीकृष्णाच्या मूर्ती आग्राच्या जामा मशिदीच्या पायऱ्यांखाली पुरल्या आहेत. सुप्रसिद्ध कथाकार देवकीनंदन ठाकूर यांच्याशी संबंधित या दोन ट्रस्टच्या याचिकेवर 23 डिसेंबर रोजी सुनावणी होणार आहे. जामा मशिदीच्या पायऱ्यांखाली गाडलेल्या मूर्ती बाहेर काढून ताब्यात द्याव्यात, अशी विनंती न्यायालयाला करण्यात आली आहे. सन 1670 मध्ये औरंगजेबाने केशवदेव मंदिर पाडून त्यात ठेवलेल्या मूर्ती आग्राच्या जामा मशिदीत पुरल्याचा दावा याचिकेत करण्यात आला आहे.

या आधारावर याचिका दाखल केलीफिर्यादीच्या वतीने वकील अजय प्रताप सिंग यांनी आपल्या याचिकेत एका पुस्तकाचा हवाला दिला आहे. त्यात त्यांनी म्हटले की, भारतीय पुरातत्व सर्वेक्षण (एएसआय) चे पहिले महासंचालक अलेक्झांडर कनिंगहॅम यांनी एक पुस्तक लिहिले आहे. 'अ टूर इन ईस्टर्न राजपुताना 1882-83' या पुस्तकात अलेक्झांडर यांनी औरंगजेबाने भगवान कृष्णाच्या मूर्ती जामा मशिदीच्या पायऱ्यांखाली पुरल्याचा दावा केला आहे 

ग्राउंड पेनिट्रेटिंग रडार म्हणजे काय?ग्राउंड पेनिट्रेटिंग रडार (GPR) ही एक भूभौतिकीय लोकेटिंग पद्धत आहे, ज्यामध्ये रेडिओ लहरींचा वापर जमिनीच्या पृष्ठभागाखालील प्रतिमा कॅप्चर करण्यासाठी केला जातो. त्याचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे, याद्वारे जमिनीखालील कोणतीही वस्तू जमिनीला कोणतीही हानी न होता दाखवता येते. ग्राउंड पेनिट्रेटिंग रडार इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रम वापरुन फोटो दाखवते. यामध्ये 10 MHz ते 2.6 GHz मधील मायक्रोवेव्ह वापरल्या जातात. हे सिग्नल जमिनीतून प्रसारित केले जातात अन् अँटेना या सिग्नल्सच्या रिटर्नमधील चढउतार कॅप्चर करतो. याद्वारे जमिनीतील प्रतिमा तयार केल्या जातात. 

टॅग्स :Courtन्यायालयMosqueमशिदTempleमंदिर