शहरं
Join us  
Trending Stories
1
धमक्या कशाला देता? ४ जूनला जनताच तुम्हाला बघून घेईल - संजय राऊत
2
Sunita Kejriwal : "प्रत्येकजण हुकूमशाही हटवण्यासाठी आणि लोकशाही..."; सुनीता केजरीवाल यांचा रोड शो
3
काँग्रेसला मोठा धक्का; अरविंदर सिंग लवली यांचा राजीनामा
4
"रावणानं सीतेचं हरण केलं आणि नरेंद्र मोदी यांनी…” काँग्रेसच्या महिला नेत्याची बोचरी टीका
5
वर्षा गायकवाडांविरोधात कसं लढणार? उज्ज्वल निकम म्हणाले, ‘कोर्टात समोरच्याला…’
6
Sahil Khan : अभिनेता साहिल खानच्या अडचणीत वाढ; महादेव बेटिंग App प्रकरणी मुंबई पोलिसांची मोठी कारवाई
7
J P Nadda : "ही ममता बॅनर्जींची सर्वात मोठी चूक, तुम्ही बंगालचं काय केलं?"; जेपी नड्डा यांचा हल्लाबोल
8
नरेंद्र मोदी आज कर्नाटकात करणार वादळी प्रचार, दिवसभरात 4 सभांचे आयोजन
9
'आम्ही नरेंद्र मोदींचं तुतारी वाजवून स्वागत करू', पुण्यातील सभेवरून सुप्रिया सुळे यांचा टोला
10
‘अमित शाह, योगी आदित्यनाथ यांनी कोकणात यायच्या भानगडीत पडू नये, इथे आल्यास…’, भास्कर जाधव यांचा इशारा
11
"ते म्हणतात की, मी अपवित्र आहे, कारण...", कंगनाचा विक्रमादित्य यांच्यावर जोरदार हल्लाबोल
12
सांगलीच्या ‘करेक्ट’ कार्यक्रमामुळे राष्ट्रवादी काॅंग्रेसची घसरगुंडी !
13
प्रचाराच्या रणधुमाळीदरम्यान मुंबईतील भांडुपमधून तीन कोटींची रोकड जप्त, तपास सुरू
14
महायुतीची डोकेदुखी वाढली, पाच जागांचा तिढा कायम; आपसांतच रस्सीखेच
15
आजचे राशीभविष्य - २८ एप्रिल २०२४, सार्वजनिक जीवनात मान-प्रतिष्ठा वाढेल
16
आमिरला पहिल्या पत्नीने लगावली होती कानशिलात, नेमकं काय घडलं होतं? अभिनेत्याने केला खुलासा
17
ईश्वराप्पा यांच्या बंडाने शिवमोग्गात लढत रंगतदार; पक्षातून सहा वर्षासाठी हकालपट्टी
18
राज्यात पारा चाळिशी पार; मुंबई ३६, तर ठाणे ४१, उष्माघाताच्या रुग्णांची संख्या १८४ वर
19
या झोपडीत राहतो लोकसभेचा उमेदवार, रावेरमधून लढणार; लोकांनी वर्गणी काढून भरले डिपॉझिट
20
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 

पेट्रोल-डिझेल जीएसटीत आणण्यास राज्ये नाखूश - अरुण जेटली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 07, 2018 3:30 AM

नवी दिल्ली  : पेट्रोल-डिझेलला वस्तू व सेवा करामध्ये (जीएसटी) समाविष्ट करण्यास राज्य सरकारे तयार नाहीत, असे प्रतिपादन केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांनी केले. 

ठळक मुद्देअनुभवानंतर स्थिती बदलेल

लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली  : पेट्रोल-डिझेलला वस्तू व सेवा करामध्ये (जीएसटी) समाविष्ट करण्यास राज्य सरकारे तयार नाहीत, असे प्रतिपादन केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांनी केले. जीएसटीची अंमलबजावणी १ जुलैपासून देशात सुरू झाली असली, तरी रिअल इस्टेट, कच्चे तेल, जेट इंधन, नैसर्गिक वायू, डिझेल आणि पेट्रोल यांना मात्र जीएसटीबाहेरच ठेवण्यात आले आहे. या वस्तू व सेवांवर केंद्रीय उत्पादन शुल्क आणि व्हॅटसारखे कर सुरूच आहेत. अलीकडे पेट्रोल-डिझेलच्या किमती गगनाला भिडल्यामुळे या दोन्ही इंधनांना जीएसटीत आणण्याची मागणी जोरकसपणे पुढे आली आहे. या पार्श्‍वभूमीवर जेटली यांनी सांगितले की, आतापर्यंत तरी बहुतांश राज्ये या वस्तू व सेवांना जीएसटीमध्ये आणण्याच्यासाठी अनुकूल नाहीत. तथापि, मला खात्री आहे की, जीएसटीचा अनुभव जसा वाढत जाईल, तशी स्थिती बदलेल.नैसर्गिक वायू व रिअल इस्टेट त्यानंतर काही काळाने पेट्रोल, डिझेल आणि शक्यतो अल्कोहोलही जीएसटीमध्ये आणण्यासाठी आम्ही प्रयत्न करू. ते असेही म्हणाले, सर्व प्रकारच्या कर सवलती रद्द केल्यानंतरच कंपनी कर २५ टक्क्यांवर आणला जाऊ शकतो. सवलती तत्काळ रद्द करणे मात्र योग्य होणार नाही. कारण काही उद्योगांनी सवलतींच्या आधारावरच आपले प्रकल्प उभारलेले असू शकतात. सवलती अचानक रद्द केल्यास हे उद्योग अडचणीत येतील.

प्रभावी कर २२ % चजेटली यांनी २0१५ मध्ये कंपनी कर ३0 टक्क्यांवरून २५ टक्के करण्याचे आश्‍वासन दिले होते. त्याची अंमलबजावणी मात्र झालेली नाही. या संदर्भात जेटली म्हणाले की, २५0 कोटींपर्यंत उलाढाल असलेल्या कंपन्यांना कमी कर आहे. या करकक्षेत ९९ टक्के कंपन्या सामावलेल्या आहेत. ७ हजार बड्या कंपन्यांना वाढीव कर असला, तरी वेगवेगळ्या कर सवलती त्यांना दिल्या जातात. त्यामुळे त्यांचा प्रभावी कर दर २२ टक्केच होतो.

टॅग्स :Arun Jaitleyअरूण जेटलीPetrolपेट्रोल