शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
5
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
6
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
7
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
8
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
9
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
10
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
11
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
12
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
13
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
14
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
15
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
16
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
17
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
18
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
19
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

पदोन्नतीतील आरक्षण संपुष्टात येणार?; काय आहे नेमकं या मागचं सत्य, जाणून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2020 19:22 IST

उत्तराखंड सरकारने एससी-एसटी समाजातील लोकांना आरक्षण न देता राज्यातील सर्व सरकारी पदे भरण्याचे आदेश ५ सप्टेंबर २०१२ रोजी अधिसूचना काढली

नवी दिल्ली - पदोन्नतीतील आरक्षणाच्यासर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचा हवाला देत काँग्रेस केंद्र सरकारवर निशाणा साधत आहे. पक्षाचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाला भाजपा आणि आरएसएसच्या विचारधारेशी जोडलं आहे. आरक्षण रद्द करण्याचा प्रयत्न भाजप-आरएसएस करीत आहे असा आरोप राहुल गांधींनी केला आहे. 

दुसरीकडे संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी आणि संरक्षणमंत्री राजनाथ सिंह म्हणाले की, उत्तराखंड सरकारने २०१२ मध्ये आरक्षणाशिवाय रिक्त सरकारी पदांच्या नियुक्तीसाठी अधिसूचना जारी केली होती. जी हायकोर्टाने रद्द केली होती. राज्य सरकारची अधिसूचना हायकोर्टाने फेटाळली होती. राज्य सरकारने या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले आणि सर्वोच्च न्यायालयाने उच्च न्यायालयाच्या निर्णयाला रद्दबातल करत ही अधिसूचना वैध असल्याचे आदेश दिले. 

नेमकं संपूर्ण प्रकरण काय आहे? हे कुठून सुरू झाले आणि का?उत्तराखंड सरकारने एससी-एसटी समाजातील लोकांना आरक्षण न देता राज्यातील सर्व सरकारी पदे भरण्याचे आदेश ५ सप्टेंबर २०१२ रोजी अधिसूचना काढली. उत्तराखंड सरकारने अधिसूचना जारी करताना म्हटलं होतं की उत्तर प्रदेश लोकसेवा (अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि इतर मागासवर्गीय आरक्षण) अधिनियम १९९४ च्या कलम ३(७) चा लाभ भविष्यात राज्य सरकारच्या पदोन्नतीच्या निर्णयाला वेळ देता येणार नाही.

कर विभागात सहाय्यक आयुक्त म्हणून कार्यरत असलेले उधम सिंह नगर येथील रहिवासी ज्ञान चंद यांनी उत्तराखंड सरकारच्या या आदेशाविरूद्ध उच्च न्यायालयाचा दरवाजा ठोठावला. अनुसूचित जातीचे ज्ञान चंद त्यानंतर उधमसिंह नगरातील खातिमा येथे कार्यरत होते. वास्तविक, ज्ञान चंद यांनी १० जुलै २०१२ रोजी उच्च न्यायालयाच्या निर्णयावर आधारित उत्तराखंड सरकारची ही अधिसूचना रद्द करण्याची मागणी केली. २०११ मध्ये दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी घेत उत्तराखंड उच्च न्यायालयाने हा आदेश दिला. यामध्ये याचिकाकर्त्याने उत्तर प्रदेश लोकसेवा (अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि इतर मागासवर्गीय) आरक्षण अधिनियम १९९४ च्या कलम ३(७) ला आव्हान दिले होते. उत्तराखंडच्या निर्मितीनंतर सरकारने नवीन राज्यातही हा कायदा स्वीकारला. 

उत्तराखंड उच्च न्यायालयाने असा युक्तिवाद केला की उत्तर प्रदेश लोकसेवा (अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि इतर मागासवर्गीयांचे आरक्षण) अधिनियम, १९९४ मधील कलम ३(७) सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाच्या विरोधात आहे.  आणि कलम ३(७) च्या १० जुलै २०१२ रोजी संपुष्टात आल्याचं म्हटलं होतं. त्याचसोबत सर्वोच्च न्यायालयाने आरक्षण सुनिश्चित करण्यासाठी एससी-एसटी समाजातील लोकांची संख्या किती याची आकडेवारी आवश्यक असल्याचं सांगितलं होतं. 

उच्च न्यायालयाने राज्य सरकारची अधिसूचना रद्द केली२०१९ मध्ये उत्तराखंड उच्च न्यायालयाने राज्य सरकारची २०१२ ची अधिसूचना रद्द करत सरकारला वर्गीकृत प्रवर्गांचे आरक्षण देण्याचे आदेश दिले. उत्तराखंड उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश रमेश रंगनाथन आणि न्यायमूर्ती एन.एस. प्रधान यांनी ही अधिसूचना रद्द केली होती, असे सांगून राज्य सरकार इच्छा असल्यास राज्यघटनेच्या कलम १६ (४ ए) नुसार कायदे करू शकते असं सांगितलं होतं. 

काय झालं सर्वोच्च न्यायालयात? सर्वोच्च न्यायालयाने आपल्या आदेशात म्हटलं आहे की राज्य सरकार पदोन्नतीमध्ये आरक्षण देण्यास बांधील नाही. पदोन्नतीमध्ये आरक्षणाचा दावा करण्याचा कोणालाही मूलभूत अधिकार नाही. राज्य सरकारला आरक्षण देण्याचे निर्देश कोर्टाला देता येणार नाही. सुप्रीम कोर्टाने इंदिरा साहनी जजमेंटचा हवाला देत सांगितले की, राज्य सरकार अनुसूचित जाती / जमाती प्रवर्गातील लोकांची संख्या शोधून काढेल, पुरेसे प्रतिनिधित्व आहे किंवा नाही याची आकडेवारी घेईल. त्यानंतर कलम १६(४) आणि कलम १६(४ए) अंतर्गत पदोन्नतीमध्ये आरक्षण दिले जाऊ शकते. राज्य सरकार प्रमोशनमध्ये आरक्षण देण्यास बांधील नाही. अशा परिस्थितीत पुरेसे प्रतिनिधित्व आहे की नाही हे शोधणे राज्य सरकार बंधनकारक नाही असं सांगत उत्तराखंड उच्च न्यायालयाचा आदेश फेटाळून लावला आणि हा आदेश कायद्याच्या विरोधात आहे अशी टीप्पणी दिली.  

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालयcongressकाँग्रेसCentral Governmentकेंद्र सरकारState Governmentराज्य सरकारreservationआरक्षण